स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 168: मध्यमवर्गा... जागा हो!

    मध्यम वर्ग म्हणलं, की खाऊन-पिऊन सुखी, प्रामाणिकपणे काम करून कुटुंबाला आनंदात ठेवणारा समाजातील एक मोठा आणि महत्त्वाचा घटक आपल्या डोळ्यासमोर येतो. आयुष्यात कितीही अडथळे आले आणि कितीही अवघड परिस्थितीचा सामना करायची वेळ आली तर विनातक्रारपणे तोंड देणारा हा मध्यमवर्ग नक्की कसा आहे, मध्यमवर्गाची मनःस्थिती नक्की काय असते, मध्यमवर्गात नक्की कोण मोडतं, मध्यमवर्गीयांच्या समस्या काय आणि मध्यमवर्गाला आपली मतं समर्थपणे कधी मांडता येतील या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत सक्रिय कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ‘Sunday With देशपांडे’ या पॉडकास्टमध्ये!

    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    37 min
  • 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...

    महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतिदिन... पण आपल्यातले अनेक चाहते आजचा दिवस मानत नाहीत, कारण पुलं आपल्यातून गेलेच नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं, ते तितकंच खरंही आहे. पुलंच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांनी त्या दोघांच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट क्षणांना एकत्रित करत 'आहे मनोहर तरी' ही सुंदर कलाकृती साकारली. याच कलाकृतीचा सुमधूर अंश आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. ज्येष्ठ साहित्यिका अरूणा ढेरे यांचा आवाज या कलाकृतीला लाभला आहे... तेव्हा नक्की ऐका हा 'पुल'कित कट्टा...

    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.

    'आहे मनोहर तरी' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/998791-Aahe-Manohar-Tari

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    35 min
  • 165: कोरोना काळात मदत कशी करावी?

    संकटकाळात केलेल्या कोणत्याही प्रकारच्या मदतीचं मोल खूप असतं. कोरोना काळात अशा मदतीचे कोणते मार्ग असू शकतात, कोणाकोणाला मदतीची गरज असू शकते, त्यासाठी नेमकं काय करावं अशा तुमच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं आम्ही संकलित केली आहेत. ती आपणापर्यंत पोहोचवत आहोत, तेव्हा नक्की ऐका!

    'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
    https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    11 min
  • 166: बालविश्वाची श्रवणीय सफर!

    बालसाहित्य हे वाचायला जितकं रंजक तितकंच लेखकांना लिहिण्यासाठी ते आव्हानात्मक... मात्र हे आव्हान मराठीतील अनेक दिग्गज लेखकांनी पेललं आणि आपल्या लेखणीतून अजरामर कलाकृती साकारल्या. अनेक पिढ्या या लेखकांची पुस्तकं वाचून मोठ्या झाल्या. याच बालसाहित्याचा खजिना स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. बालसाहित्य कसं लिहावं, त्यासाठी काय आव्हानं आहेत या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत लेखिका आर्या नाईक आणि सुमेधकुमार इंगळे यांनी ऐकू आनंदे या स्टोरीटेलच्या विशेष कार्यक्रमात. त्यांना बोलतं केलं आहे पब्लिशर सई तांबे हिने. तेव्हा नक्की ऐका हा विशेषपॉडकास्ट! 

    आर्या नाईक यांचे बालसाहित्य ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/authors/189082-Aryaa-Naik

    स्टोरीटेलवरील किड्स झोन ऐका -
    https://www.storytel.com/in/en/categories/1-Children

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    50 min
  • 164: चला, कोरोनावर मात करूया!

    कोरोना आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण अगदी बिनधास्त वावरत असतो. पण याच कोरोनाने जर तुमच्या घरात शिरकाव केला तरा? तर घाबरून जाण्याची गरज नाही… आम्ही खास तुमच्यासाठी ‘कोरोना गाईड’ घेऊन आलो आहोत, नक्की ऐका!

    'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
    https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    23 min
  • 163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं?

    या कोरोना काळात माणूस शारिरीकरित्या तर खचतोच, पण मानसिकरित्याही खचतो. मग या मानसिक ताणातून बाहेर कसं पडायचं, मानसिक आव्हानांना कसं तोंड द्यायला हवं, शारिरीक व मानसिकरित्या कसं निरोगी राहावं या व अशा आपल्या मनातील अनेक शंकांचे निरसन, नक्की ऐका!

    'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
    https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    13 min
  • 162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??

    कोरोना होऊन गेल्यानंतर नक्की काय करायला हवं, कशी काळजी घ्यायला हवी, न खचता पुन्हा भरारी घेण्यासाठी कसं सज्ज व्हावं, बिनधास्तपणे वावरणं किती धोक्याचं आहे याबाबतचे मार्गदर्शन नक्की ऐका!

    'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
    https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    14 min
  • 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

    कोरोना आणि त्याच्या साईड इफेक्ट्सने लोकांना भंडावून सोडलं आहे. मात्र अशा काळात खचून न जाता पुन्हा उभारी कशी घ्यायला हवी यावर स्टोरीटेलच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर सिरीज सुरू करण्यात आली. 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजमध्ये तज्ञ्ज डॉक्टरांनी आपला मोलाचा सल्ला दिला आहे, तर दिग्गज कलाकारांनी ते आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. या सिरीजमध्ये कोरोन होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी, कोरोनावर मात कशी करावी, कोरोना काळात मानसिक आरोग्य कसं अबाधित ठेवावं, इतरांना मदत कशी करावी अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. तेव्हा प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा असा हा महत्त्वाची पॉडकास्ट अजिबात चुकवू नका! या पॉडकास्टमध्ये स्टोरीटेल प्रस्तुत 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजची झलक ऐकायला मिळेल, तर संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व आरोग्यसाक्षर व्हा!

    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.

    'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
    https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    39 min
  • 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

    आपल्या काकाच्या रहस्यमयी मृत्यूचा शोध घेण्यासाठी निघालेल्या सौभद्रला कोणकोणत्या भयानक घटनांना सामोरं जावं लागतं... आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक भयंकर कारस्थान समोर येतं अशा कथानकावर बेतलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी एका वेगळ्याच पातळीवरील दर्जेदार साहित्यकृती ठरते. या कादंबरीत साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा, ठिकाणांचे बारकावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं उत्कृष्ट चित्रण आपल्या समोर उभं केलेले लेखक वसंत वसंत लिमये यांना संतोष देशपांडे यांनी स्टोरीटेल कट्ट्यावर बोलतं केलं आहे. २०१२ ला प्रकाशित झालेल्या या कादंबरी लेखनाची प्रक्रिया कशी होती, ती कशी साकारली या सर्व प्रवासाबद्दल लिमये यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. नुकतीच ही कादंबरी स्टोरीटेलवर ऑडिओबुकच्या स्वरूपात रिलीज झाली आहे, तेव्हा ही कादंबरी ऐका आणि थरार अनुभवा!

    याशिवाय स्टोरीटेलने नवीन सिलेक्ट हा प्लॅन सुरू केला आहे. यात ११ भारतीय भाषांमधील साहित्य ऐकायला मिळेल. सध्या २९५ रूपयांत हा प्लॅन उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे, ही माहिती दिली आहे स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगश दशरथ यांनी. तेव्हा लगेच स्टोरीटेल सबस्क्राईब करा.

    'लॉक ग्रिफिन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/2369103-Loch-Griffin

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    1 hr 6 min
  • 159: बेस्ट ऑफ 'सुशि'!

    दुनियादारी, अमर विश्वास यांच्या पलीकडचे सुहास शिरवळकर कसे होते, त्यांचं विपुल साहित्य, त्यांची गजब शैली, त्यांच्या चाहत्यांचं त्यांच्यावरचं निस्सीम प्रेम, वैयक्तिक आयुष्यातले सुशि, आजच्या जमान्यातले सुशि अशा अनेक इंटरेस्टिंग विषयांवर गप्पा मारल्या आहेत सम्राट शिरवळकर, योगेश दशरथ, रमा नाडगौडा आणि अजिंक्य विश्वास यांनी... ऐकू आनंदे या सदरात बेस्ट ऑफ सुशि हे चर्चासत्र चांगलंच रंगलं आणि सुशिंच्या आठवणींना उजाळा मिळाला... तेव्हा आवर्जून ऐका हा कट्टा.   

    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.

    सुहास शिरवळकरांच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-suhas+shirvalkar

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    52 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.