स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • धमाल सुट्टी, कमाल ऑडिओबुक्स!!!

    या उन्हाळी सुट्टीची सुरवात करा रोज दुपारी एक धमाल गोष्ट ऐकून. स्टोरीटेल घेऊन आलंय प्राण्यांची पार्टी, कोडं घालणारा मासा, जादूची बाग, हावरट भूत, लांडगोबाची फजिती आणि आशा अनेक मजेदार गोष्टींचा खजिना!!! आणि या सगळ्या गोष्टींमागच्या गोष्टी आपल्याला सांगणार आहे स्टोरीटेल मराठीची पब्लिशर सई तांबे... 
    याशिवाय ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा.

    स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    Https://tinyurl.com/yck7rn27   

    43 min
  • बच्चेकंपनीसाठी 'मे' मेजवानीचा...

    स्टोरीटेल नेहमीप्रमाणेच याही आठवड्यात विविधरंगी, विविधढंगी ऑडिओबुक्स घेऊन येतंय, या आठड्यात म्हणजेच मे महिन्याची सुरवातच यावेळी स्टोरीटेलने श्रवणीय केली आहे. या आठवड्यात बच्चेकंपनीसाठी तर धम्माल गोष्टी येत आहेत, आणि या केवळ ऑडिओस्वरूपत नसून व्हिडिओ रूपातही स्टोरीटेल मराठीच्या युट्युब चॅनेलवर बघता येतील. याशिवाय, सुशिंची 'समांतर', अमिष त्रिपाठीची 'धर्म' या गाजलेल्या कादंबऱ्या स्टोरीटेलवर ऐकायला मिळतील.
    याशिवाय ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा.

    स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    Https://tinyurl.com/yck7rn27   

    19 min
  • स्टोरीटेलवर पुस्तकखजिना...

    या आठवड्यात स्टोरीटेलवर काय नवीन येणार याची उत्सुकता सर्वांनाच असते... त्याचप्रमाणे याही आठड्यात दर्जेदार ऑडिओबुक्स श्रोत्यांच्या भेटीला येत आहेत. तेव्हा ऐका या आठवड्यात स्टोरीटेलवर काय काय येतंय, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा.

    स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    Https://tinyurl.com/yck7rn27

    8 min
  • गोष्टींच्या दुनियेत 'कूल' होताना...

    स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी ऑडिओबुक्सची मेजवानीच या आठवड्यात आहे. स्टोरीटेल नेहमीच आपल्या श्रोत्यांसाठी नवनवीन आणि दर्जेदार पुस्तकं घेऊन येतं... हा आठवडाही अगदी तसाच आहे. याशिवाय या आठवड्यात म्हणजेच २२, २३, २४ एप्रिलला ९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे रंगणार आहे... 
    तेव्हा या आठवड्यात स्टोरीटेलवर काय काय येतंय, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा.

    स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    Https://tinyurl.com/yck7rn27

    13 min
  • होय... भारताची 'राष्ट्रीय दिनदर्शिका' आहे!

    स्टोरीटेल कट्ट्यावर ऐका एक मुक्त संवाद ज्येष्ठ पत्रकार व विज्ञान विश्वचे संपादक अभिजित मुळ्ये यांच्याशी. स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, हे ऐकतानाच जाणून घ्या आजवर दुर्लक्षित अशा राष्ट्रीय संकल्पनेविषयी. ती म्हणजे, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका. विज्ञानाच्या पायावर आधारित भारताची अधिकृत कालमापन पद्धत कशी विकसित झाली आणि त्यातून साकारलेल्या देशाच्या अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिकेविषयी अभिजित मुळ्ये यांनी दिलेली रंजक माहिती आपल्या सर्वांच्या ज्ञानात निश्चितच भर घालते.

    स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    Https://tinyurl.com/yck7rn27

    32 min
  • नववर्ष करा श्रवणीय!

    गुढी पाडव्याच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा!
    हिंदु नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात स्टोरीटेलवर अनेक श्रवणीय पुस्तकं, कथा येत आहेत. तेव्हा या नववर्षांत ऐकण्याचा संकल्प करा आणि स्टोरीटेल भरभरून ऐका...
    या आठवड्यात कोणकोणती पुस्तकं येत आहेत, याचा आढावा घेतला आहे संतोष देशपांडे यांनी, तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा...   

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    9 min
  • स्टोरीटेलवर मार्चएंड धमाका!

    स्टोरीटेलवर या आठवड्यात नेहमी प्रमाणे काही जबरदस्त नवी पुस्तके आपल्या भेटीला येत आहेत. ती कोणती आणि त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती ऐका संतोष देशपांडे यांच्या आवाजात.

    मागील भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
    https://open.spotify.com/episode/3LpKjMkpNfvrbhAKSHYJ84?si=S8bzvY8fSvSmNcC6RG8OYw

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    7 min
  • झलक - समर्पण

    अपार कष्ट करण्याची तयारी आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तर अशक्य भासणारे कोणतेही ध्येय गाठता येऊ शकते. टिटवाळा येथील अद्ययावत श्रीमहागणपती रुग्णालयाचा प्रकल्प हे त्याचं आदर्श उदाहरण. चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित राहिलेल्या या भागात लोकसहभागातून रुग्णसेवेचा मोठा प्रकल्प उभा करण्याचा विक्रांत बापट यांनी केवळ संकल्प सोडला नाही तर त्याच्या सिद्धीसाठी अव्याहत प्रयत्न केले. एक प्रकारचा हा जीवनसंघर्षच; जो ऐकणाऱ्या प्रत्येकास नवी प्रेरणा देऊन जातो. समाजासाठी समर्पित भावनेतून काही करण्याची तळमळ मनात जागवतो. उदय सबनीस यांच्या समर्थ आवाजातून उलगडत जाणारी ही प्रभावी, प्रवाही आणि प्रेरक कहाणी `समर्पण` शब्दाची नेमकी ओळख करुन देते... ऐका या समर्पणची झलक...
    त्यासोबतच ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

    समर्पण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/samarpan-1581340

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    28 min
  • युक्रेन युद्धापासून काय शिकावं?

    रशिया-युक्रेन युद्ध अजूनही थांबण्याच्या स्थितीत नसल्याने साऱ्या जगाचे लक्ष हे युद्ध कधी संपेल आणि स्थिरता कधी येईल याकडे लागले आहेत. या युद्धापासून भारतासह जगाने काय धडा घ्यावा, या युद्धानंतर देशांचे एकमेकांशी संबंध कसे राहतील, आर्थिक संबंध कसे राहतील यावर सविस्तर चर्चा केली आहे ज्येष्ठ लेख संजय सोनवणी यांनी. तसेच सोनवणी यांनी सुहास शिरवळकरांची एक छानशी आठवणही कट्ट्यावर सांगितली आहे. तेव्हा जरूर ऐका हा कट्टा...
    त्यासोबतच ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    34 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.