"गीत तू, संगीत तू, या मैफिलीचा मीत तू " - हे गीत कोणते? , हे संगीत कोणते ? या मैफिलीचा हा मित कोण? ही मैफिल कुठे संपन्न होते? हे सारेच अनुभव भक्ताचे आहेत. जगण्याला जोपर्यंत नाद, लय, ताल आणि सूर लाभत नाहीत, तोपर्यंत या मैफिलीचा अनुभव नाही. हे नाद , सूर, लय सर्व काही लाभते केवळ ईश्वराच्या आत्यंतिक भक्तीपोटी. म्हणूनच अशा भगवंताला भक्त सखा म्हणतो. हा सखाच भक्तासाठी गीत होतो, संगीत होतो, आत रंगलेल्या मैफिलीचा मित होतो. या उत्कट अनुभवाचे प्रत्यंतर या गझल मधून होत आहे. तेव्हा ऐकू या - " गीत तू संगीत तू, या मैफिलीचा मीत तू "