विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले - ज्ञानेश्वर माऊली समग्र विश्वाचे दुख: यथार्थाने जाणते, कारण आपल्या तीनही भावंडांसह त्यांनी पराकोटीचे दुख: काय असते हे व्यक्तीगत जीवनात त्यांनी वारेमाप अनुभवले आहे. अवहेलना , सामाजिक बहिष्कार या सार्यातून ते गेले. " विश्व रागे झाले वन्ही, संते सुखे व्हावे पाणी , योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा " इथपर्यंत ही चारही भावंडे पोचली. व्यक्तीगत दुःखाच्याही पलीकडे असलेल्या अभूतपूर्व शांति , समाधान अन आनंदाच्या स्थितीला पावली. म्हणुनच आता अवघ्या विश्वाचे दुख: पहाताना आर्त होते माऊली. आंतरिक कारुण्याने प्रवाहीत होते माऊली. इतरांचे दाहक दुख: जाणून, पाणी पाणी होते माऊली. तहानलेल्या समग्र विश्वाला तृप्त करण्यासाठी जसे आभाळ दाटून यावे जलभारीत ढगांनी, अगदी तसेच या माऊलीचे झालेय. पण वर्षाव करण्याआधी तहानल्या विश्वाला सांगावा धाडते माऊली. माऊलीची आर्तता इथे प्रकाशित होते विजेच्या रूपाने आणि तहानल्या विश्वाला सांगते " वर्षावाची घडी नजीक येतेय , तृप्तिची वेळ दूर नाही आता". एवढेच नाही तर माऊलीची हीच आर्तता , तहानल्या विश्वाला कळीत करते, गडगडणार्या ढगांच्या आवाजाने. "आता बरसात होणार". चला तर आता ऐकू या " विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले - भाग २ "