भक्ति सुंदर आहे, अति सुंदर. Beautiful आहे. तशी ती अगदी निर्भय अन सामर्थ्यवान आहे. ब्युटिफुल तशी बोल्डही आहे. पण म्हणून ती प्रदर्शन मांडत नाही. किंबहुना भक्ताला स्वताच्या अंतरंगात होणारे भगवंताचे दर्शन, त्याच्या अंग प्रत्यंगातून सहज स्वाभाविकतेने प्रकट होत असते. यासाठी मी भक्ति बोल्ड आणि ब्युटिफुल म्हणतो. विशेष करून भक्तीला बोल्ड म्हणायचे तर ही भक्ति मानवी अहंकार, स्वभाव, मान्यता, बुद्धी, समज, स्मृति , राग लोभ, तिरस्कार , वासना, भय या सार्यांचाच क्लीन बोल्ड करते आणि स्वता मात्र निर्विवादपणे नाबाद रहाते. अशा या भक्तितून अचंबितपणे असे काही उद्भवून येते की भक्त अवाक होतो. माझ्या बाबतीत अशीच एक गझल स्फुरून आली. अशी ही गझल अखेरीला स्पष्ट सांगते " मागे कुठे केव्हातरी , सांडला संसार माझा | शृंगार लेवूनी या घडीला रंगतो संन्यास माझा || ". तेव्हा चला तर ऐकू या " शृंगार लेवूनी या घडीला रंगतो संन्यास माझा" .