"राज"कारण " Rajkaran

"राज"कारण " Rajkaran

Download on the App Store

"राज"कारण " Rajkaran episodes

  • RAJ'KARAN PODCAST : 'पायलट' नातवाने 'मुख्यमंत्री' आजोबांच्या वर्चस्वाचं विमान जमिनीवर आणलं...

    माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध विमानाचे कॉकपिट सोडून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणारा त्यांचाच सख्खा नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई संपूर्ण राज्याने बघितली. सत्तेच्या वारशाच्या वादाने, विचारांच्या लढायांनी उंबरठे ओलांडले आणि बघता बघता निलंग्याचा राजवाडा 2 राजकीय भागात विभागला गेला.

    18 min
  • RAJ'KARAN PODCAST : विलासरावांनी निलंगेकरांविरोधात पुकारलेलं बंड राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता...

    शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख या दोन दिग्गज मुख्यमंत्र्यांमधील हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील वाद नव्हता, तर जिल्ह्याची नाडी कोणाच्या हातात राहणार आणि राज्याच्या सिंहासनावर कोणाचे वर्चस्व असणार, याचा ऐतिहासिक लढा होता. एकेकाळी मार्गदर्शक असलेल्या निलंगेकरांच्या विरोधात विलासरावांनी पुकारलेले हे बंड म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता.

    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Latur Politics, Vilasrao Deshmukh, Shivaji Patil Nilangekar, Congress

    9 min
  • RAJ'KARAN PODCAST : बलाढ्य काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला... बाळासाहेबांनी मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेचा 'महापौर' बसवला!

    मुंबई महापालिकेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. आधी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे असणारे चित्र आता शिवसेना विरुद्ध भाजप असे झाले आहे. विरोधक बदलले असले तरीही शिवसेना या लढाईत गेल्या 60 वर्षांपासून लढत आहे. पण शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिका कधी जिंकली? पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर कसा झाला? त्याचाच हा इतिहास

    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BMC Election, Shivsena, BJP, Congress

    14 min
  • RAJ'KARAN PODCAST : कोल्हे - विखे संघर्षाचा वणवा तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसतोय... सहकारातून सुरू झालेले 'महायुद्ध'

    सहकाराच्या मातीत पेरलेले राजकारण जेव्हा सत्तेच्या संघर्षात रूपांतरित होते, तेव्हा अहिल्यानगरच्या राजकारणात दोनच नावे गाजतात ते म्हणजे कोल्हे आणि विखे-पाटील! ही केवळ दोन घराण्यांची लढाई नाही, तर कोपरगाव आणि राहाता या दोन साम्राज्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे.


    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shivsena, NCP, BJP, Congress, Kolhe Vs Vikhe, Radhakrishna Vikhe Patik, Sujay Vikhe Patil, Vivek Kolhe

    17 min
  • RAJ'KARAN PODCAST : किंगमेकर' विरुद्ध 'जायंट किलर'! गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधील वर्चस्वाच्या लढाईचा धगधगता इतिहास

    गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये तीन दशकांपूर्वी पडलेल्या वादाची ठिणगी आजही शमलेली नाही. प्रस्थापितांची गढी रोखण्यापासून ते थेट आव्हान देण्यापर्यंतचा हा थरार आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. एकाच पक्षात असूनही त्यांच्यातील कोल्ड वॉर संपलेले नाही. त्यांच्या भुतकाळातील संघर्षांचे मूळ निवडणुकीतील टक्कर आणि राजकीय वर्चस्वात आहे, ज्यामुळे हे वारंवार चर्चेत राहिले आहेत. या टोकाच्या संघर्षाची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली? पाहुया आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये...

    13 min
  • RAJ'KARAN PODCAST : रस्त्यावर भिडणाऱ्या नारायणला लीलाधर डाकेंनी शिवसेनेत आणलं... एक दिवस बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं!

    नारायण राणेंची राजकारणातील जुनी आणि सुरुवातीची ओळख सांगायची तर अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता अशी होती. मुंबईत शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचे नाव पुढे असायचे. हेच राणे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले.


    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Narayan Rane, Shivsena, BJP, Nitesh Rane, Nilesh Rane

    15 min
  • RAJ'KARAN PODCAST - मुंडेंनी ताकद दिली अन् मिटलेली भांडणं पुन्हा पेटली : व्याही बनले एकमेकांचे कट्टर दुश्मन

    बीडच्या गेवराईतील पवार–पंडित घराणं. एकमेकांशी सख्ख्या नातेसंबंधात असलेले आणि स्वतःला घरंदाज म्हणवणारे हे लोक जेव्हा एकमेकांना मारायला उठतात, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावतात. नगरपालिकेच्या निवडणुकांनी गेवराईत पवार–पंडितांचं रस्त्यावरचं भांडण राज्यभर चर्चेचं बनलं.


    पण हे आजच पहिल्यांदाच झालंय का? तर नाही. गेवराईत यापूर्वीदेखील असे राडे झाले आहेत. गोदाकाठच्या या मतदारसंघाचं राजकारण खूप इंटरेस्टिंग आहे. मागच्या तीन–चार पिढ्यांचा मागोवा घेतला तर हा विषय नक्कीच तुम्हाला लक्षात येईल.


    KEYWORDS :


    Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, NCP, BJP, Congress, Beed, Beed politics, Shivajirao Pandit, Amarsinh Pandit, Vijaysinh Pandit, Laxman Pawar, Balraje Pawar

    10 min
  • RAJ'KARAN PODCAST : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण

    एकनाथ गणपतराव खडसे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षांचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसले. पण मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपाचेच नेते खडसे यांना 'कोण होतास तू? काय झालास तू? अशा शब्दांमध्ये हिणवत आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे तो एक शिवसैनिक. याच शिवसैनिकांने खडसेंचं राजकारण जवळपास संपवत आणलं आहे. अर्थात याला भाजपमधील छुपा पाठींबाही होताच. नेमकं खडसे यांचा राजकारणाचा उदय कसा झाला आणि कसं एका शिवसैनिकांने त्यांचं राजकारण संपवतं आणलं तेच आपण आज पाहूया...


    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BJP, Shivsena, Jalgaon Politics, Eknath Khadse, Chandrakant Patil, Raksha Khadse, Rohini Khadse, Girish Mahajan

    11 min
  • RAJ'KARAN PODCAST : केशरकाकूंनी निर्माण केला दबदबा... क्षीरसागर कुटुंबाने 70 वर्षे गाजवलं बीडचं राजकारण

    राज्यात काही मोठी राजकीय घराणी आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. त्यामध्ये बीडच्या क्षीरसागर घराण्याचाही महत्वाचा समावेश आहे. काँग्रेस नेत्या आणि बीडच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. या कुटुंबाची सात दशकांची राजकीय परंपरा आजही कायम आहे.


    केशरकाकूंना चार मुले — जयदत्त, रविंद्र, भारतभूषण आणि पवित्रा. या चौघांसह त्यांच्या कुटुंबातील तीसहून अधिक व्यक्ती आजही एकाच बंगल्यात राहतात. सध्या घर एकच असले तरी तीन भाऊ वेगवेगळ्या पक्षांमध्ये सक्रिय आहेत. हेच या राजकीय घराण्याचे वैशिष्ट्य आहे.


    KEYWORDS:

    Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Congress, NCP, BJP, Beed, Beed Politics, Kesharkaku Kshirsagar

    22 min
  • RAJ'KARAN PODCAST : राजारामबापूंनंतर एका बॅगेवर आलेले जयंत पाटील… राजकारणात कशी झाली एन्ट्री?

    राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे वय केवळ २१ वर्षेही पूर्ण झाले नव्हते. इस्लामपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या भावाऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले. मुंबईत जाताना ते फक्त एका बॅगेवर आले होते आणि चार महिने मुंबईत राहतील, असे ठरले होते. त्यानंतर येथील नागरिकांची मागणी कमी झाली की ते अमेरिकेला शिक्षणासाठी रवाना होतील, अशी योजना होती. पण पुढे ते राजकारणात कसे सक्रिय झाले? जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास कसा होता? याचा हा आढावा…


    KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics, 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Rajarambapu Patil, Jayant Patil, NCP

    12 min

About "राज"कारण " Rajkaran

From the publisher's feed

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.