
Sign up to save your podcasts
Or


देशातून एप्रिल ते जून या तिमाहीत तेलबिया पेंड निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली. यात मोहरीपेंडचा वाटा सर्वाधिक आहे. मात्र सोयापेंड निर्यात ३६ टक्क्यांनी कमी झाली. सोयापेंड निर्यात कमी होण्यामागे काय कारणे आहेत? त्याचा बाजारावर काय परिणाम झाला? पाहुयात आजच्या मार्केट पॉडकास्टमधून..
Listen today’s #Shetmarketpodcast to know the oil seeds export status from India. In April to June India's oil seeds export increased by 39 percent. In this export mustard meal has a huge share. But the soymeal export sluggish by 36 percent. Why did soymeal export slashed? How has this impacted the market?
जगातील प्रमुख हरभरा उत्पादक देशांमध्ये यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दुष्काळ, पूरस्थिती, मालवाहतुकीतील अडचणी, वाहतुक भाडेवाढ अशी विविध कारणं आहेत. त्यामुळे जागतिक हरभरा उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात हरभऱ्याच्या दरावर या सगळ्यांचा काय परिणाम होईल, ते जाणून घेऊया..
Listen today’s #ShetmarketPodcast to know the global chana production estimates. Experts predicted that the drought condition, flood, freight shortage and high transportation fare affecting chana production and supply worldwide. Watch the video to know the details about how much chana production will reduce? Will this have an effect on the chana market?
मागील वर्षात सरकारने विक्रमी तूर आयात केली होती. परिणामी देशात उत्पादन घटूनही दर दबावात राहीले. सरकारने आताही तूर आयातीसाठी पाच वर्षांचे करार केले. तर हे कारार कोणत्या देशांशी केले? किती तूर आयात होणार आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले. तर मागील पंधरा दिवसांतील दरातील घट मोठी आहे. मात्र तरीही आयातीवर अवलंबून असलेल्या भारताची मागणी वाढली नाही. हे का घडल? देशातील खाद्यतेल बाजाराची स्थिती काय आहे? पाहुयात आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून.
Listen today’s #Shetmarketpodcast to know the world edible oil market status. The rate in the international market has collapsed in the last 15 days. But Demand of import dependent India is stagnant.
देशात २०२१-२२ मध्ये खाद्यतेल उत्पादनात घट झाल्यानं दरात तेजी आली होती. मात्र पुढील हंगामात जागतिक तेलबिया उत्पादन वाढेल, तसेच खाद्यतेल उत्पादनही वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. पण सोयाबीन उत्पादनाची काय स्थिती राहील? खाद्यतेलाचे दर काय राहतील? पाहुयात आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून.
Listen today’s #ShetmarketPodcast to know the world oil seeds production estimates of USDA. Global oil seeds and edible oil production will be increased next season. Then what will be the soybean production?
देशात जून महिन्यात पाऊस कमी होता. त्यामुळे मागील आठवड्यापर्यंत सोयाबनची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा कमी होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने सोयाबीन पेरणीने मुसंडी मारली. मग देशात सोयाबीन पेरणी किती झाली? सोयाबीनचा पेरा किती टक्क्याने वाढला? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
मागील वर्षभरात पामतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळं देशात सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयात वाढली. तसेच देशात सोयाबीन दरही तेजीत होते. मात्र सध्या पामतेल स्वस्त झालं आणि सोयाबीनमधील तेजी कमी झाली. मग पामतेल आणि सोयाबीनचा संबंध काय? देशात सोयाबीनचे दर काय आहेत? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
देशात विक्रमी मका उत्पादन झाले होते. मात्र सोयापेंडमधील तेजीमुळे मक्याचे दर वाढले. परिणामी इतर देशांच्या तुलनेत दर जास्त असल्याने निर्यात घटली. या परिस्थितीत मक्याचा बाजार कसा राहू शकतो? दरात आणखी वाढ होईल का? सध्याचा बाजारभाव काय आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Listen today’s #marketbulletin to know the maize market status in the country. Maize rates are higher than other countries in India. After the price rise maize exports are down. In this situation what will happen? How would the Maize rate?
चालू हंगामात शेतकऱ्यांनी माल रोखल्याने सोयाबीन आणि कापसाचे दर सुधारले होते. मात्र हरभरा दर सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विक्री करण्याचे ठरविले. परंतु तरीही खुल्या बाजारात हरभरा आवक वाढली होती. बाजारात आवक वाढण्यामागे कोणती कारणे आहेत? शेतकऱ्यांनी हरभरा का रोखला नाही? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Listen today’s #ShetmarketPodcast to know the Chana Arrival in the open markets. In the current season chana arrival in open markets increased. The rate of Chana is ruling below MSP till now.
मागील खरिपात तूर उत्पादनात मोठी घट झाली. मात्र विक्रमी आयातीमुळे दर दबावात होते. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावही मिळाला नाही. परंतु तुरीच्या दरात आता वाढ झाली. पण या दरवाढीची कारणे काय आहेत? तुरीला सध्या काय दर मिळत आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Watch today’s market bulletin to know the status of Tur market. In the last kharif tur production decreased by huge quantities. But the rates were in pressure due to record imports. But now the rate has been increased.
From the publisher's feed