Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
June 28, 2022Soybean sowing: देशात सोयाबीनचा पेरा केवळ २६ टक्केदेशात यंदा आतापर्यंत सुमारे ३१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ २६ टक्के आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)ने ही माहिती दिली आहे...more7minPlay
June 27, 2022Export ban, प्रतिकूल Climate मुळे जगावर अन्न संकट ओढवणारजगातील प्रमुख देशांत प्रतिकूल हवामानामुळे शेतीमालाचे उत्पादन घटेल. तसेच निर्यातबंदीच्या पवित्र्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून जगाला भीषण अन्नसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे....more6minPlay
June 25, 2022Oilseeds and Pulses Import थांबविण्याची मागणी | Soybean Bajarbhav | ॲग्रोवनसरकार तेलबिया आणि कडधान्य आयातीवर दरवर्षी मोठा निधी खर्च करते. त्यामुळे सरकराने आयातीवर खर्च करण्यापेक्षा देशातील शेतकऱ्यांनाच उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली. त्यासाठी त्यांनी सरकारला दोन उपाय उचविले. ते उपाय कोणते आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
June 24, 2022अनेक देशांत Wheat Production Decrease होणार |Wheat Bajarbhav|ॲग्रोवनचालू हंगामात गव्हाची टंचाई असल्याने जागतिक बाजारात दर जवळपास ४० टक्क्यांनी वाढले. मात्र युएसडीएसह महत्वाच्या संस्थांनी पुढील हंगामातही गहू उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली. पुढील हंगामात गहू उत्पादनाचा अंदाज काय आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
June 23, 2022Excess Chana Stock मुळे NAFED ची गोची?|Chana Bajarbhav|ॲग्रोवनसरकारकडे सध्या कडधान्याचा अतिरिक्त साठा आहे. अन्नसुरक्षेसाठी २३ लाख टनांची गरज असताना नाफेडकडे ३६ लाख टन कडधान्य असल्याची माहिती आहे. त्यातही हरभरा सर्वाधिक आहे. त्यामुळे हा हरभरा सरकार बाहेर काढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बाजारावर त्याचा काय परिणाम होईल? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
June 22, 2022International Market मध्ये Cotton, Turmeric Rate मोठ्या प्रमाणात घटले | Cotton Bajarbhav | ॲग्रोवनजागतिक महागाईमुळे अनेक वस्तुंची मागणी हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दरही नरमले. २०२२ मधील उच्चांकी दराच्या तुलनेत कापूस आणि हळदीच्या दरात मोठी घसरण झाली. या शेतीमालांचे दर नेमके किती कमी झाले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
June 21, 2022Cotton and Soybean Sowing खरिपात आघाडीवर |Kharif Sowing|ॲग्रोवनदेशात अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या गेल्यावर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मात्र आत्तापर्यंत झालेल्या पेरणीमध्ये सोयाबीन आणि कापूस आघाडीवर आहे. त्यातही कोणत्या पिकाची लागवड आघाडीवर आहे? आंतरराष्ट्रीय बाजारात या पिकांच्या दराची काय स्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
June 20, 2022Chana Export Subsidy ची केंद्राकडे मागणी | Chana Bajarbhav |ॲग्रोवन देशात यंदा हरभऱ्याचे १३९ लाख टनांचे विक्रमी उत्पादन झाले. सरकराने मात्र २३ लाख टनांचीच खरेदी केली. त्यामुळे बाजारात सध्या हमीभावापेक्षा १००० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने निर्यात अनुदान दिल्यास बाजारातही दर वाढतील, असे व्यापारी आणि निर्यातदारांनी म्हटले आहे. पण खरंच याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल का? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
June 18, 2022Cotton Import in India यंदा वाढण्याची शक्यता नाही | Kapus Bajarbhav | ॲग्रोवन चालू हंगामात कापूस उत्पादनात मोठी घट आली. देशातील कापूस उत्पाद ३१५ लाख गाठींवरच स्थिरावेल, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे. तर कापूस वापर आणि आयात कशी राहील? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
June 17, 2022Wheat Flour Export भारतातून अचानक वाढला |Gahu Bajarbhav|ॲग्रोवन देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले. निर्यात चांगली झाल्याने खुल्या बाजारात दर वाढले. परिणामी सरकारची खरेदी कमी झाली. त्यामुळे सरकारने गहू निर्यातबंदी केली. मात्र यानंतर गहू पिठाची निर्यात वाढली. त्यामुळे सरकार पीठ निर्यातीवर निर्बंध आणू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र ही परिस्थिती का निर्माण झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.