Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
May 24, 2022सरकारकडून 100 Lakh Tonnes Sugar Export ची मर्यादा|Sugar Export|ॲग्रोवनभारतातून ८५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले. तर त्यापैकी जवळपास ७१ लाख टनांची निर्यातही झाली आहे. ही निर्यात सरकारच्या अनुदानाशिवाय होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी मजबूत आहे. असे असतानाही सरकारने साखर निर्यातीवर १०० लाख टनांची मर्यादा लावली. सरकारने हा निर्णय का घेतला? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 23, 2022सरकारचा Soybean Production Estimate उद्योगाला मान्य नाही | Soybean Production | ॲग्रोवनकेंद्र सरकारने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या तिसऱ्या अंदाजात सोयाबीन उत्पादन १३८ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र उद्योगाला हा अंदाज मान्य नाही. साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएलाही सोयाबीन उत्पादन यापेक्षा कमीच असल्याचे म्हटले आहे. मग एसईएच्या मते देशात सोयाबीन उत्पादन किती झाले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 21, 2022Wheat Stock 20.66 Lakh Tonnes भारतीय बंदरांवर पडून | Wheat on Ports | ॲग्रोवनकेंद्र सरकारनं गहू निर्यातबंदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गहू बंदरांवर पडून आहे. जाणकारांच्या मते भारतीय बंदरांबवर १६ मे पर्यंत जवळपास २० लाख ६६ हजार टन गहू पडून होता. परंतु यापैकी किती गव्हाला लेटर ऑफ क्रेडिट मिळाले, याची माहिती उपलब्ध नाही. कोणत्या बंदरांवर गव्हाचा किती साठा आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 20, 2022Palm Oil Rate वाढल्याने Soybean Oil Import वाढण्याची शक्यता | Soybean Oil Import |ॲग्रोवनइंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी उठवण्याची निर्णय घेतला. मात्र पामतेलाचे दर तेजीत आले आहेत. त्यामुळे भारतात सोयाबीन तेलाचीची आयात अधिक होण्याची शक्यता आहे. सोयाबीन तेल आयातवाढीमागे आणखी कोणती कारणे आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 19, 2022North India मध्ये Cotton Sowing 15%ने वाढण्याची शक्यता | Cotton Sowing | ॲग्रोवनचालू हंगामात कापासाला विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे चालू खरिप हंगामात देशात कापूस लागवड वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर भारतातातील हरियाना आणि राजस्थानमध्ये १० ते १५ टक्यांनी कापूस लागवडीत यंदा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मग दराची स्थिती काय राहू शकते? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 18, 2022युक्रेनमध्ये Sunflower Sowing ३० टक्क्यांनी घटली | Soybean Bajarbhaav | ॲग्रोवनयुक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पेरणी सुरु आहे. आत्तापर्यंत येथे ७० टक्के पेरा पूर्ण झाला. पण काही भागांत खतांसह इंधानाची टंचाई भासत आहे. तसेच सूर्यफुल आणि सोयाबीनची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. याचा काय परिणाम होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
May 17, 2022Cotton Market Rate वाढल्यानं Textile Industry धोक्यात?|Cotton Bajarbhav|ॲग्रोवनचालू हंगामच्या सुरुवातीपासूनच देशात कापसाची साठेबाजी सुरु आहे. बाजारात आणखी ९० लाख गाठी कापसाची आवक व्हायची आहे. असे असताना बाजारात कापसाची मोठी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालावं अशी मागणी कापडे उद्योगाने केली. कापड उद्योगाने सरकारकडे आणखी काय मागण्या केल्या? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
May 16, 2022Wheat Export Ban मुळे मध्य प्रदेशातील Traders आक्रमक|Wheat Export Ban|ॲग्रोवनकेंद्र सरकारने अचानक गहू निर्यातबंदी केल्याने स्थानिक बाजारात दर नरमले. यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान होत आहे. तसेच निर्यातीच्या प्रक्रियेत अडकलेल्या मालामध्ये मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांचा माल जास्त आहे. त्यामुळे येथील व्यापारी आक्रमक झाले. या निर्णयाचा मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना किती फटका बसू शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 14, 2022Cattle Fodder Production वाढीसाठी हरियाना देणार आर्थिक मदत | Fodder Demand | ॲग्रोवनदेशात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तर काही राज्यांत गोवंश हत्याबंदीमुळे मोकाट जनावरांसाठी चारा मिळणे दुरापस्त झाले. हरियान सरकारने या जनावरांसाठी गोशाळा बांधल्या. मात्र चारा कमी पडत आहे. त्यामुळे हरियाणा सरकारने गोशाळांना चारा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी १० हजार रुपये मदत जाहिर केली. ही योजना नेमकी काय आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 13, 2022देशात Record Tur Import मुळे बाजारभाव दबावात | Tur Bajarbhav | ॲग्रोवनसरकारने चालू हंगामात तूर आयातीसाठी पायघड्या घातल्या. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट तूर आयात झाली. या आयातीचा देशातील तूर बाजारभावावर दबाव आला. देशात यंदा किती तूर आयात झाली? महिनानिहाय आयातीची स्थिती काय होती? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.