Solid Joys

Solid Joys

By Alethia4India
Download on the App Store

Solid Joys episodes

  • 20 June : कृपा ही क्षमा आहे – आणि सामर्थ्य

    तरी जो काहीं मी आहे तो देवाच्या कृपेनें आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असें नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेनें केलें. (1 करिंथ 15:10)

    कृपा ही आम्हीं पाप केल्यांनंतर मिळणारी केवळ दया नव्हे. कृपा पाप न करण्यासाठीं सामर्थ्य देणारे देवाचे कृपादान आणि सामर्थ्य आहे. कृपा ही सामर्थ्य आहे, केवळ पापक्षमा नव्हे.

    हे स्पष्ट आहे, उदाहरणार्थ, 1 करिंथ 15:10 मध्यें पौल कृपेचे वर्णन त्याच्या कार्याचे समर्थ बनविणारे सामर्थ्य म्हणून वर्णन करतो. त्याच्या पापांची ती केवळ क्षमा नाहीं; आज्ञाधारकपणांत पुढे वाढत जाण्याचे ते सामर्थ्य आहे. “परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असें नाहीं, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेनें केलें.

    म्हणून, देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठीं जी धडपड आपण करतो ती आम्हीं आपल्यां स्वतःच्या शक्तीनें केलेंला प्रयत्न नसतो, “देवानें दिलेंल्या शक्तीनें - ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारें व्हावा” (1 पेत्र 4:11). हे विश्वासाचे आज्ञापालन होय. आम्हीं जे केलें पाहिजे ते करण्यासाठीं आम्हांला सामर्थ्य पुरविणारी देवाची क्षणाक्षणाला प्रकट होणारी कृपापूर्ण शक्ती.

    याची पुष्टी पौल 2 थेस्सल 1:11-12 मध्यें करतो आणि आमच्यां चांगुलपणाच्या सर्व कार्यांस तो “विश्वासाचे कार्य” म्हणतो, आणि तसे म्हणण्याद्वारें येशूला जे गौरव प्राप्त होते ते “आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेनें” आहे कारण हे त्याच्या “सामर्थ्यानें” घडते. खालील सर्व वाक्प्रचार ऐका :

    ह्याकरता तर आम्हीं तुमच्यांसाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्यां देवानें तुम्हांला झालेंल्या ह्या पाचारणाला योग्य असें मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्यानें पूर्ण करावे; ह्यासाठीं कीं, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेनें आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्यां ठायी व तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा.

    ज्या आज्ञाधारकपणामुळें देवाला आनंद होतो तो विश्वासाद्वारें देवाच्या कृपेच्या सामर्थ्यानें उत्पन्न होतो. ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक पातळीवर हीच शक्ती कार्य करते. विश्वासाद्वारें तारणारे देवाच्या कृपेचे सामर्थ्य (इफिस 2:8) देवाच्या कृपेचे तेच सामर्थ्य आहे जे विश्वासाद्वारें पवित्रहि करते.

    3 min
  • 19 June : मनुष्याचे भय धरण्याचा अपराध

    तेव्हां शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केलें आहे; मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्यां शब्दाचे उल्लंघन केलें आहे; कारण मी लोकांना भिऊन त्यांचे म्हणणें ऐकलें. (1 शमुवेल 15:24)

    शौलानें देवाचे म्हणणें ऐकण्याऐवजी लोकांचे म्हणणें का ऐकलें? कारण त्याला देवाऐवजी लोकांची भीती होती. त्याला अवज्ञेच्या दैवीय परिणामांची जितकीं भीती होती त्यापेक्षा अधिक भीती आज्ञापालनानें पुढे मानवीय परिणाम काय होतील याची होती. देवाच्या नाराजीपेक्षा त्याला लोकांच्या नाराजीचे अधिक भय होते. आणि हा देवाचा फार मोठा अपमान आहे.

    वस्तुतः, यशया म्हणतो कीं देवाच्या अभिवचनांकडें दुर्लक्ष करून मनुष्य काय करूं शकतो याची भीती धरणें एक प्रकारचा अहंकार आहे. तो ह्या मर्मभेदी प्रश्नानें देवाचे शब्द उद्धृत करतो: “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण? परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस?” (यशया 51:12-13).

    मनुष्याचे भय गर्वासारखे वाटत नसेल, पण देव म्हणतो कीं ते आहे, “तू  मनुष्याला, मानवपुत्राला भितेस अशी तू कोण! परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस?”

    मुद्दा हा आहे : जर तुम्हीं मनुष्याचे भय धरता, तर तुम्हीं देवाच्या आणि त्याचा पुत्र, येशू याच्या पवित्रतेचा, त्याच्या मूल्याचा नाकार करणें सुरू केलें आहे. देव मनुष्यापेक्षा अतिशय बलवान आहे. तो अत्यंत बुद्धीमान आणि प्रतिफळ आणि आनंद यांनी अमर्यादपणें परिपूर्ण आहे.

    मनुष्य काय करूं शकतो या भीतीनें त्याजकडें पाठमोरे होण्याचा अर्थ देव जे त्याचे भय बाळगतात त्यांच्यासाठीं जे अभिवचन देतो ते सर्व फेटाळून लावणें होय. हा मोठा अपमान आहे. आणि अशा अपमानामुळें देव प्रसन्न होऊ शकत नाहीं.

    दुसरीकडें, जेव्हां आपण देवाची अभिवचनें ऐकतो आणि आमच्यां अविश्वासामुळें देवाची निंदा होईल या भीतीनें त्याच्यावर धैर्यानें विश्वास ठेवतो, तेव्हां त्याला खूप आदर मिळतो. आणि त्यात त्याला खूप खूप आनंद होतो.

    3 min
  • 18 June : विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठीं विनंती कशी करावी?

    बंधुजनहो, त्यांच्याविषयीं माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे कीं, त्यांचे तारण व्हावे. (रोम 10:1)

    पौल प्रार्थना करतो कीं देवानें इस्राएलाचे तारण करावे. तो त्यांच्या तारणासाठीं प्रार्थना करतो. तो अशी प्रार्थना करीत नाहीं जिचा प्रभावीपणा परिणामशून्य आहे, तर तो अशी प्रार्थना करतो जी प्रभावशाली आहे. आणि आम्हीं देखील अशीच प्रार्थना केली पाहिजे.

    आपण देवाच्या नवीन कराराची अभिवचनें घेऊन देवाजवळ विनवणी केली पाहिजे कीं त्यानें ती विनंती आमच्यां मुलांमध्यें आणि आमच्यां शेजार्ंयामध्यें आणि जगाच्या सर्व मिशन क्षेत्रांत पूर्ण करावी.

    • परमेश्वरा, त्यांच्या शरीरातून पाषाणहृदय काढून त्यांस मांसाचे नवीन हृदय दे. (यहेज्केल 11:19)
    • त्यांच्या हृदयाची सुंता कर यासाठीं कीं त्यांनी तुजवर प्रीती करावी! (अनुवाद 30:6).
    • पित्या, त्यांच्याठायी तुझा आत्मा घाल आणि तुझ्या नियमांत त्यांस चालव. (यहेज्केल 36:27)  
    • त्यांस पश्चाताप आणि सत्याचे ज्ञान दे यासाठीं कीं त्यांनी सैतानाच्या पाशातून सुटावे (2 तीमथ्य 2:25-26)
    • त्यांची अंतःकरणें उघड यासाठीं कीं त्यांनी सुवार्तेवर विश्वास करावा! (प्रेषितांची कृत्ये 16:14)
    • जेव्हां आपण देवाच्या सर्वाभौमत्वावर विश्वास ठेवू - कठोर पातकीं लोकांस निवडण्याच्या आणि मग त्यांना विश्वास आणि तारणाप्रत आणण्याच्या देवाच्या अधिकारावर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवू - तेव्हां आपण विसंगतीवाचून, आणि हरविलेंल्यांच्या परिवर्तनासाठीं पवित्र शास्त्रातील थोर अभिवचनांच्या खात्रीनें  प्रार्थना करण्यात समर्थ होऊ.

      अशाप्रकारे, देवाला या प्रकारच्या प्रार्थनेंत प्रसन्नता वाटते कारण त्याद्वारें त्याला स्वतंत्र आणि सार्वभौम परमेश्वर म्हणून, जो तो तारण आणि निवडीबाबत आहे, अधिकार व आदर प्राप्त होतो.

      3 min
    • 17 June : देवाला कशाप्रकारची प्रार्थना प्रसन्न करते

      “पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचनें ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडें मी पाहतो.” (यशया 66:2)

      दीन व भग्न अंत:करणाची प्रथम ओळख ही आहे कीं ते देवाचे वचन ऐकून कंपायमान होते.

      यशया 66 अशा कांही लोकांना संबोधून आहे ज्यांपैकीं काहीं अशाप्रकारे उपासना करतात जी देवाला प्रसन्न करते, आणि काहीं जे अशाप्रकारे उपासना करतात ज्यानें तो प्रसन्न होत नाहीं. तिसरे वचन अशा दुष्ट मनुष्याचे वर्णन करते जो असें अर्पण घेऊन येतो : “जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय.” त्यांच्या यज्ञार्पणांचा देवाला तिटकारा आहे - जे मनुष्यवधासमान आहेत. का?

      चौथ्या वचनात देव स्पष्ट करतो, “कारण मी हाक मारली तेव्हां कोणी उत्तर दिलें नाहीं, मी बोललो तेव्हां त्यांनी माझें ऐकलें नाहीं.” त्यांच्या यज्ञार्पणांचा देवाला तिटकारा होता कारण त्या लोकांनी त्याच्या वाणीकडें दुर्लक्ष केलें. पण त्या लोकांचे काय ज्यांच्या प्रार्थना देवानें ऐकल्या? देव दुसऱ्या वचनात असें म्हणतो, “पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचनें ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडें मी पाहतो.”

      या वचनावरून मी असा निष्कर्ष काढतो कीं सरळ अंत:करण असलेंल्या मनुष्याची, ज्याच्या प्रार्थना देवाला प्रसन्न करणार्या असतांत, प्रथम ओळख ही आहे कीं तो वचन ऐकून कंपायमान होतो. हेंच ते लोग आहेत ज्यांच्याकडें परमेश्वर पाहतो.

      म्हणून, सरळ मनुष्याची प्रार्थना जी देवाला प्रसन्न करते ती अशा अंतःकरणातून येते जे सर्वप्रथम परमेश्वराच्या सान्निध्यात कंपायमान होते. देवाचे वचन ऐकून ते कंपायमान होते, कारण त्याला देवाच्या आदर्शापासून दूर असल्यासारखे आणि त्याच्या निर्णयापुढे अत्यंत दुर्बळ असल्यासारखे आणि अतिशय लाचार असल्यासारखे वाटते आणि आपण अपयशी आहोत याची त्याला खंत जाणवते.

      दावीदानें स्तोत्र 51:17 मध्यें अगदी हेच म्हटलें, “देवाचे यज्ञ म्हणजें भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहींस.” पहिली गोष्ट जिच्यामुळें प्रार्थना देवाला स्वीकारणीय होते ती म्हणजें प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचे भग्नहृदय आणि नम्रता. तो त्याचे वचन ऐकून कंपायमान होतो.

      3 min
    • 16  June : तहानलेल्यां अंत:करणानें देवाची सेवा करा

      म्हणून आम्हीं गृहवासी असलो किंवा दूर आलेलें असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. (2 करिंथ 5:9)

      काय होईल जर तुम्हांला असें आढळून आलें (जसे परूश्यांना आढळलें) कीं तुम्हीं तुमचे संपूर्ण जीवन देवाला प्रसन्न करण्यात  घालविलें होते, पण त्याचवेळी तुम्हीं अशा गोष्टी सुद्धा करत होता ज्या देवाच्या दृष्टीत किळसवाण्या आहेत (लूक 16:14-15)?

      कोणी यावर आक्षेप घेऊन असें म्हणू शकतो, “मला नाहीं वाटत कीं हे शक्य आहे; जो मनुष्य आयुष्यभर देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करित होता तो त्या व्यक्तीचा अव्हेर करणार नाहीं.” पण असा आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीनें काय केलें आहे ते तुम्हीं पाहता का? देवाला काय प्रसन्न करेल या विषयींची त्याची खात्री देव कसा असावा या त्याच्या कल्पनेंवर आधारित आहे. अगदी याच कारणास्तव आपण सर्वप्रथम पवित्र शास्त्रात प्रगट झालेलें देवाचे चरित्र समजून घेतलें पाहिजें.

      देव पर्वतावरील झरा आहे, पाण्याचे द्रोण नाहीं. पर्वतवरील झरा स्वतः भरणारा असतो. तो सतत ओसंडून वाहतो आणि इतरांस पाणी पुरवितो. पण पाण्याचे द्रोण एकतर पंपानें भरावे लागते किंवा बादलीनें भरावे लागते. म्हणून, मोठा प्रश्न हा आहे: तुम्हीं झऱ्याची सेवा कशी करता? आणि: तुम्हीं पाण्याच्या द्रोणाची सेवा कशी करता? देवानें स्वत:ला जसें वास्तविकपणें प्रकट केलें आहे त्या ज्ञानाला शोभेल तसे तुम्हीं त्याचे गौरव कसे कराल?

      जर तुम्हांला पाण्याच्या द्रोणाच्या मोलाचे गौरव करायचे असेल, तर तुम्हीं ते परिपूर्ण आणि उपयोगी ठेवण्यासाठीं कठोर परिश्रम करता. पण जर तुम्हांला एखाद्या झऱ्याच्या मोलाचे गौरव करायचे असेल, तर तुम्हीं ते करण्यासाठीं हात टेकून आणि गुडघे टेकून आपल्यां मनाचे समाधान होईपर्यंत त्यांतून पिता, जोपर्यंत तुम्हांला ताजेतवानें वाटत नाहीं आणि परत खोर्यात जाऊन लोकांना हे सांगत नाहीं कीं तुम्हांला काय आढळलें आहे.

      एक नाऊमेद पापी म्हणून माझी आशा पवित्र शास्त्रातील या सत्यावर टिकलेंली आहे : कीं परमेश्वर असा परमेश्वर आहे जो मी देऊ करायच्या असलेंल्या एका गोष्टीनें प्रसन्न होईल : माझी तहान. म्हणूनच देवाचे सार्वभौम स्वातंत्र्य आणि त्याचे स्वतःमध्यें परिपूर्ण असणें या गोष्टीं माझ्यासाठीं खूप मूल्यवान आहेत: ते माझ्या आशेचा आधार आहेत कीं देव बादली ब्रिगेडच्या साधनसंपत्तीनें नव्हे तर जेव्हां भग्नहृदयी पातकीं कृपेच्या झऱ्याजवळ पिण्यासाठीं खाली वाकतो, तेव्हां प्रसन्न होतो.

      आम्हीं सर्व प्रकारे परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आज आणि सर्वकाळ. पण आपलें संपूर्ण जीवन देवाला कोणती गोष्ट प्रसन्न करते या विषयींच्या चुकींच्या दृष्टिकोनावर आधारित असल्याचे सिद्ध होत असेल तर आम्हास धिक्कार असो. परमेश्वर त्या लोकांवर प्रसन्न होत नाहीं जे त्याच्याशी गरजू पाण्याचे द्रोण म्हणून वर्तन करतांत, तर एक तो त्यांच्यावर प्रसन्न होतो जें त्याच्याकडें अक्षय, सर्वप्रकारे संतुष्ट करणारा झरा म्हणून त्याच्याशी वर्तन करतांत. स्तोत्र 147:11 म्हणते, “जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.”

      4 min
    • 15  June : कधीही न संपणारा मधुचंद्र

      नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. (यशया 62:5)

      जेव्हां देव त्याच्या लोकांचे कल्याण करतो, तेव्हां ते असें नसते कीं एखादा न्यायाधीश नाखुशीनें त्याला घृणा वाटणार्‍या गुन्हेगाराला नाईलाजानें दया दाखवत आहे. ते असें असते जसे नवरा मुलगा त्याच्या नवरीला आपुलकीं दाखवत असतो.

      कधी कधी आपण चेष्टा करत विवाहा बाबत म्हणतो कीं, "मधुचंद्र आता संपला आहे." याचे कारण आपल्यांला मर्यादा आहेत. आपण मधुचंद्राचा अग्नी आणि जिव्हाळा टिकवून ठेवू शकत नाहीं. पण देव म्हणतो कीं त्याचा त्याच्या लोकांकरिताचा आनंद एखाद्या नवऱ्यामुलाचा  त्याच्या नवरी वरील आनंदा प्रमाणें आहे. याचा अर्थ असा नाहीं कीं ते त्या प्रकारे सुरू होते आणि कालांतरानें त्याच्यात घट होत जाते.

      तो मधुचंद्रात असलेंला अग्नी, सुख, जोम, उत्साह आणि आनंद या बद्दल बोलत आहे. तो आपल्यां मनाला हे सांगू पाहतो कीं जेव्हां देव आपल्यांसाठीं पूर्ण मनानें हर्ष करतो तेव्हां त्याचा अर्थ काय आहे. यिर्मया 32:41 - "मी त्यांच्याविषयीं आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावानें त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन." सफन्या 3:17 - "परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयीं आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयीं त्याला उल्लास वाटून तो गाईल."

      देवाचा मधुचंद्र कधीच संपत नाहीं. त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान आणि कल्पकता अनंत आहे, त्यामुळें पुढच्या अनंतकाळच्या अब्जावधी वर्षामध्यें देखील आपल्यांला कंटाळ येणार नाहीं.

      2 min
    • 14  June : देव तुम्हांला कितीं आशीर्वादित करू इच्छितो

      "परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठीं तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल." (अनुवाद 30:9)

      देव आपल्यांला अनिच्छेनें आशीर्वादित करत नाहीं. देव आपल्यांवर उपकार करावयांस आवेशी असतो. आपण त्याच्याकडें जावें अशी तो वाट पहात नाहीं. तो आपला शोध करतो कारण त्याचा आनंद आपलें कल्याण करण्यात आहे. देव आपली वाट पाहत बसत नाहीं, तो आपल्यां पाठी येत असतो. स्तोत्र 23:6 चा खरे तर शब्दश: अनुवाद असा आहे कीं "खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस कल्याण व दया माझा पिच्छा करतील.

      देवाला दया करायला आवडते. मी हे परत सांगतो. देवाला दया करायला आवडते. त्याच्या लोकांचे कल्याण करण्याच्या त्याच्या इच्छे मध्यें संकोच, संदिग्धता किंवा संभावीतपणा नसतो. तो मंदक्रोध आहे आणि करुणा करण्याच्या बाबतींत तत्पर आहे. सिनाय पर्वतावर उतरल्या वर मोशेला तो हेच म्हणाला, "परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर आहे" (निर्गम 34:6). हेच तो यिर्मया 9:24 मध्यें म्हणतो, "मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्यात मला संतोष आहे, असें परमेश्वर म्हणतो.”

      देव कधीच वैतागलेंला आणि तणावात नसतो. तो शीघ्रकोपी नाहीं. उलट त्याच्यात त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा अनंत, अमर्याद आणि न संपणारा उत्साह आहे.

      याचे आकलन करणें आपल्यां करिता कठीण आहे, कारण प्रत्येक दिवसाला यशस्वी होणें तर सोडाच पण नुसते तोंड देण्याकरिता आपल्यांला विश्रांतीची गरज असते. आपल्यां भावना वर खाली होत असतात. आपल्यांला एक दिवस कंटाळा येतो आणि निराश वाटते, तर दुसर्‍या दिवशी आपल्यांला आशावादीपणा आणि उत्साह जाणवतो.

      आपण त्या पाण्याच्या कारंज्या प्रमाणें आहोत, जो कधी कमी, कधी जास्त आणि अनियमित असतो. पण देव त्या विशाल नायग्राच्या धबधब्या प्रमाणें आहे - तुम्हीं प्रत्येक मिनिटाला 1,86,000 टन पाणी वरून खाली पडताना पाहता आणि विचार करता - नक्कीच हे पाणी ह्या जोरानें वर्षानूवर्षे खाली पडत नसणार. होय ते तसेच पडत आलेलें आहे.

      अशाच प्रकारे देव आपलें कल्याण करण्याबाबत असतो. त्याला त्याचा कधी थकवा येत नाहीं. ते त्याला कधीच कंटाळवाणें वाटत नाहीं. त्याच्या नायग्राच्या कृपेच्या धबधब्याला अंत नाहीं.

      3 min
    • 13  June : येशूचा वध कोणी केला?

      ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला सर्वकाहीं कसे देणार नाहीं? (रोम 8:32).

      माझा एलनोईस या ठिकाणी एक मित्र होता जो पाळक होता, तो खूप वर्षापूर्वी पवित्र आठवड्यात एका तुरुंगात कैद्यानां वचन सांगत होता. वचन सांगताना तो थांबला व त्यानें विचारलें कीं येशूचा वध कोणी केला हे त्यांना ठाऊक आहे का?

      काहीं लोकं बोललें त्याला सैनिकांनें मारलें. काहीं म्हणालें यहुद्यांनी मारलें. तर काहीं म्हणालें पिलातानें. नंतर शांतता झाल्यावर, माझा मित्र सहजपणें म्हणाला, "त्याचा वध त्याच्या पित्यानें केला."

      रोमकरांस पत्र 8:32 चा पहिला भाग हेच सांगत आहे : देवानें त्याच्या पुत्राला सुद्धा राखून ठेवलें नाहीं तर मरणाच्या स्वाधीन केलें." तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्यां स्वाधीन झाल्यावर तुम्हीं त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारलें." (प्रेषित 2:23). यशया 53 हे जास्त ठळकपणें सांगते, "तरी त्याला ताडन केलेलें, देवानें त्याच्यावर प्रहार केलेलें व त्याला पिडलेलें असें आम्हीं त्याला लेंखलें.... त्याला ठेचावे असें परमेश्वराच्या (त्याच्या पित्याच्या!) मर्जीस आलें. त्यानें त्याला पिडलें" ( यशया 53:4, 10).

      किंवा जसे रोम 3:25 म्हणते, "त्याच्या रक्तानें विश्वासाच्या द्वारें प्रायश्‍चित्त होण्यास देवानें त्याला पुढे ठेवलें." ज्याप्रमाणें अब्राहामानें त्याचा पुत्र इसहाकाला मारायला चाकू उचलला, पण नंतर त्याच्या मुलाला सोडून दिलें कारण त्याला झुडपात एक कोकरा दिसला, अगदी त्याप्रमाणें देव जो पिता यानें त्याच्या स्वत:च्या पुत्राच्या - येशूच्या छातीवर चाकूनें वार केला, त्यानें त्याला राखून ठेवलें नाहीं कारण तो कोकरा होता, आमच्यां जागी मरणारा आमचा प्रतिनिधी होता.

      देवानें आपल्यां स्वत:च्या पुत्राला देखील राखून ठेवलें नाहीं कारण तोच एक मार्ग होता ज्याद्वारें तो आपल्यांला वाचवू शकत होता आणि तरी देखील तो एक पवित्र आणि न्यायी देव म्हणून राहू शकणार होता. आपल्यां दुष्कर्माचा दोष, आपल्यां पापांची शिक्षा, आपल्यां पापांच्या शापामुळें आपल्यांला नरकाच्या नाशापासून सुटका मिळाली नसती. पण देवानें आपल्यां पुत्राला देखील राखून ठेवलें नाहीं; त्यानें त्याला आमच्यां अपराधांमुळें घायाळ केलें, आपल्यां दुष्कर्मामुळें ठेचलें आणि आपल्यां पापांमुळें क्रूसावर खिळलें.

      रोम 8:32 - हे वचन माझ्यासाठीं पवित्र शास्त्रातील सर्वात मोलवान वचन आहे कारण ते देवाच्या भावी कृपेच्या सर्व-समावेशक अभिवचनांचा पाया आहे, कीं देवाच्या पुत्रानें माझी सर्व शिक्षा, माझा सर्व दोष, माझी सर्व दंडाज्ञा,  माझ्या सर्व चुका आणि माझी सर्व भ्रष्टता त्याच्या शरीरावर घेतली, जेणें करून मला त्या महान आणि पवित्र देवापुढे क्षमा पावलेंला, समेट झालेंला, नीतीमत्व प्राप्त झालेंला, स्वीकारलेंला असें उभें राहता यावे आणि त्याच्या उजव्या हाताशी असणार्‍या सर्वकाळाच्या आनंदाच्या अभिवचनाचा लाभार्थी होणें शक्य व्हावें. 

      4 min
    • 12 June : माझा अविश्वास घालवून टाका

      कारण मला प्राप्त झालेंल्या कृपादानांवरून मी तुमच्यांपैकीं प्रत्येक जणाला असें सांगतो कीं, आपल्यां योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानूं नकां, तर देवानें प्रत्येकाला वाटून दिलेंल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेनें स्वतःला माना. (रोम 12:3)

      ह्या वचनाच्या पार्श्वभूमी मध्यें पौलाला काळजी वाटत होती कीं काहीं लोक स्वत:ला "त्यांच्या योग्यते पेक्षा अधिक समजत होते". ह्या गर्वाचा शेवटचा उपाय म्हणजें ही गोष्ट जाणणें कीं आपल्यांला प्राप्त झालेंली आत्मिक दानेंच केवळ देवाच्या मोफत कृपेमुळें नाहींत तर ती दानें वापरण्यासाठींचा विश्वास देखील देवाच्या कृपेमुळें आहे. "तर देवानें प्रत्येकाला वाटून दिलेंल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेनें स्वतःला माना."

      याचा अर्थ असा कीं स्वत:विषयीं फुशारकीं मारावी असा प्रत्येक संभाव्य निकष आपल्यांतून काढून टाकण्यांत येतो. आपण कशी आढ्यता मिरवू शकतो जेव्हां ती आत्मिक कृपादानें घेण्याकरिता लागणारी पात्रता सुद्धा आपल्यांला कृपादान म्हणूनच मिळाली आहे?

      ह्या सत्याचा आपल्यां प्रार्थनें वर गाढ परिणाम होतो. येशू आपल्यांला लूक 22:31-32 उदाहरण देतो. पेत्रानें येशूचा तीन वेळा नकार केला त्यापूर्वी येशूनें त्याला म्हटलें, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानानें मागणी केली; 'परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठीं मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.”

      येशू पेत्राच्या नकाराच्या पापा नंतर सुद्धा त्याचा विश्वास टिकून रहावा म्हणून प्रार्थना करतो, कारण त्याला ठाऊक आहे कीं आपल्यांला देवच विश्वास देऊ करतो. म्हणून येशूनें जशी प्रार्थना केली तशी आपण देखील केली पाहिजे - आपल्यां स्वतःकरिता आणि इतरांच्या करिता, कीं देव आपला विश्वास टिकवून ठेवील. 

      या करिताच त्या भूतग्रस्त मुलाच्या पित्यानें डोळ्यांत आसवे आणून अशी विनंती केली कीं, "प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका” (मार्क 9:24). ही एक चांगली प्रार्थना आहे. ती हे मान्य करते कीं आपण जसा विश्वास ठेवायला पाहिजे तसा विश्वास आपण देवाच्या कृपादानावांचून ठेऊ शकत नाहीं.

      तर मग, आपण रोज ही प्रार्थना करूंया, "हे परमेश्वरा, माझ्यांत देऊं केलेंल्या विश्वासाबद्दल मी तुझा आभारी आहे. त्याला टिकवून ठेव. बळकट कर. अधिक ढृढ कर. अपयशी होऊ देऊ नकोस. त्याला माझ्या जीवनाचे सामर्थ्य कर, अशासाठीं कीं मी जे काहीं करीन त्याचा गौरव, सर्व गोष्टींचा दाता म्हणून तुलाच मिळेल. आमेन."

      3 min
    • 11  June : भावी काळाकरिता विश्वास

      देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो. (2 करिंथ 1:20)

      जर "देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या [येशूच्या] ठायी होय हे आहे" तर मग आता वर्तमानसमयी त्याच्यावर भरवसा ठेवणें म्हणजें हा विश्वास ठेवणें कीं त्याची अभिवचनें पूर्ण होऊन ती खरी सिद्ध होतील.

      त्याच्यावर भरवसा ठेवणें आणि त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणें - हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास नाहींत. येशू वर विश्वास ठेवणें - तारणासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणें - म्हणजेंच विश्वास ठेवणें कीं तो त्याचा शब्द पाळतो. वधस्तंभावर खिळलेंला आणि मरणातून पुन्हा उठलेंल्या ख्रिस्तामध्यें समाधानी असणें म्हणजें असा विश्वास ठेवणें कीं भावी काळातील प्रत्येक क्षणापासून ते  सर्वकालिकते पर्येंत त्याच्या प्रीति पासून आपल्यांला कोणतीही गोष्ट विभक्त करूं शकणार नाहीं, आणि सर्व गोष्टी आपल्यां कल्याणाकरिता कार्य करण्यापासून त्याला कोणीच थांबवू शकणार नाहीं. आणि ते "कल्याण" म्हणजें परमेश्वराला ख्रिस्तामध्यें आपलें सर्वोच्च धन मानणें व त्याचे सौंदर्य न्याहाळणें होय.

      आमचे हे सर्व-समाधानकारक कल्याण सर्वकाळासाठीं आहे हा विश्वास आम्हांवर झालेंल्या गतकाळातील गौरवी कृपेवर आधारलेंला आहे, विशेषत: त्यां कृपेवर कीं देवानें आपल्यां स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरिता दिलें (रोमकरांस 8:32).

      आता आपण देवानें भूतकाळात जें जें साध्य केलें - विशेषकरून आपल्यां पापांकरिता ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान या द्वारें- आणि त्याच्या सर्व अभिवचनांमध्यें त्याचे अध्यात्मिक सौंदर्य चाखलें पाहिजे. भूतकाळात झालेंल्या कृपेत मुळावलेंला आपला देवावरील भरवसा या गोष्टीना दृढ धरून राहतो कीं देव पुढल्या क्षणी आम्हांबरोबर राहील, व तो तसाच पुढच्या महिन्यात आणि अनंत सार्वकालिकतेसाठीं आम्हांबरोबर असेल.

      तोच आणि केवळ तोच आपल्यां आत्म्याचे भावी समयामध्यें समाधान करील. आणि जर आपण मुळावलेलें ख्रिस्ती म्हणून जगण्याकरिता ख्रिस्त आपल्यांला बोलवत असेल तर आपल्यांला आपल्यां भावी जीवनाबद्दल हींच खात्री वाटायला हवी.

      ख्रिस्तांत असलेंला आमचा वर्तमान समयीचा आनंद– म्हणजें आमचा वर्तमान विश्वास- जर देवाच्या सर्व अभिवचनांना होय व आमेन म्हणत नसेल, तर मग देव (भविष्यातील प्रत्येक क्षणी) जे सामर्थ्य पुरवेल त्या सामर्थ्यात मुळावलेंली सेवा घडू शकणार नाहीं (1 पेत्र 4:11).

      माझी प्रार्थना अशी आहे कीं आपल्यांवर जी भावी कृपा केलीं जाईल तिच्या विश्वासाचे स्वरूप काय आहे यावर अशाप्रकारे चिंतन केल्यांनें आपल्यांला देवाच्या वचनांवर जो विश्वास ठेवायचा आहे त्याविषयींची वरवरची, अतिसरळ विधानें टाळण्यास त्यानें सहाय्य पुरवावें. ही खूप गहन आणि सुंदर गोष्ट आहे.  

      3 min