
Sign up to save your podcasts
Or


आळशी म्हणतो, "बाहेर सिंह आहे! भर रस्त्यावर मी ठार होईन!" (नीतिसूत्रे 22:13)
मी अपेक्षा केली नव्हती कीं नीतिसूत्र असें म्हणेंल. मी अपेक्षा केली होती कीं ते असें म्हणेंल, "भेकड व्यक्ति म्हणतो, "बाहेर सिंह आहे! भर रस्त्यावर मी ठार होईन!" पण इथे "आळशी" म्हंटलें आहे "भेकड" नाहीं. त्यामुळें इथे नियंत्रित करणारी (विल्हेवाट लावणारी) भावना आळशीपणा आहे, भीती नाहीं.
पण आळशीपणाचा आणि रस्त्यावर असणार्या सिंहाच्या धोक्याच्या काय संबंध? आपण नेंहमी असें म्हणत नाहीं कीं, "हा माणूस इतका आळशी आहे कीं तो बाहेर कामं करायला जाऊ शकत नाहीं, कारण रस्त्यात सिंह आहे."
मुद्दा हा आहे कीं, आळशी माणूस आपल्यांला काम करावे लागू नये म्हणून, मनात काल्पनिक परिस्थिति निर्माण करतो, आणि त्याच्या आळशीपणा वरून लक्ष विचलित करण्यासाठीं सिंहाचा धोका असल्याचे कारण देतो. त्याचे दिवसभर घरी बसणें कोणीच मान्य करणार नाहीं. पण रस्त्यात सिंह आहे म्हंटल्यावर ते त्याची परिस्थिती समजू शकतील.
इथे एक गहन पवित्र शास्त्रीय शिकवण जी आपण शिकायला पहिजे ती ही कीं, आपलें मन त्याला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठीं आपल्यां बुद्धीला भ्रष्ट करते. आपल्यां अंतकरणातील खोल इच्छा आपल्यां बुद्धीच्या तर्कशुद्धपणाच्या गाभाऱ्यात जातात आणि आपल्यां इच्छा जरी चुकींच्या असल्या, तरी त्या चांगल्या आहेत असें आपल्यां बुद्धीला पटवतात.
हेच आळशी व्यक्ति करत आहे. त्याची हीच इच्छा आहे कीं, आपण काहीं काम न करता घरीच बसायचे. पण घरी बसायला त्याच्याकडें काहींच योग्य कारण नसते. मग, तो काय करतो? तो त्याच्या चुकींच्या इच्छांवर, आळशी पणावर मात करतो का? नाहीं, तो त्याच्या इच्छांचे समर्थन करण्यासाठीं मनात खोट्या परिस्थिति निर्माण करतो.
येशू म्हणाला, "निवाडा हाच आहे कीं, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती" (योहान 3:19). आपल्यांला अंधकार प्रिय आहे कारण आपण न उघडकींस येता आपल्यांला जे हवे ते करूं शकतो. ह्या परिस्थिति मध्यें आपलें मन हे अंधकाराचा कारखाना बनून जातो - अर्ध्यसत्य, शंका, दिशाभूल, कुचराई आणि असत्याचा झरा बनतो - आणि आपल्यां मनातील दुष्ट विचार उघडकींस येण्यापासून आणि नाश होण्यापासून रक्षण करूं पाहतो.
विचार करा आणि सुज्ञ व्हा.
" प्रभुजी, आम्हांला प्रार्थना करण्यास शिकवा." ( लूक 11:1)
देव पापी लोकांच्या प्रार्थनांचे उत्तर देतो, परिपूर्ण लोकांच्या नाहीं. आणि तुमच्यां प्रार्थनां दुर्बळ असूं शकतात, जर तुम्हीं तुमचे लक्ष क्रूसाकडें करून याची जाणीव केली नाहीं तर.
मी तुम्हांला जुन्या करारातून अनेक उदाहरणं देऊन हे सिद्ध करूं शकतो जिथे देव त्याच्या पापी प्रजेच्या प्रार्थना ऐकत आहे, जे लोक त्यांचाच पापामुळें संकटात सापडलें आहेत आणि आता ते त्यातून सुटण्याकरिता देवाकडें धावा करत आहेत (उदा., स्तोत्र 38:4, 15; 40:12-13; 107:11-13). पण मी तुम्हांला हे लूक 11 मधून दोन प्रकारे दाखवू शकतो :
प्रभूच्या प्रार्थनें मध्यें (लूक 11:2-4), येशू म्हणतो, "तुम्हीं प्रार्थना कराल तेव्हां असें म्हणा ...." आणि पुढे वचन 4 मध्यें अशी विनंती आहे कीं, "आम्हांला आमच्यां पापांची क्षमा कर." मग जर तुम्हीं प्रार्थनेंचे सुरूवातीचे वाक्य या मधल्या वाक्या सोबत जोडलें तर, तो म्हणतो कीं, "तुम्हीं प्रार्थना कराल तेव्हां असें म्हणा..... आम्हांला आमच्यां पापांची क्षमा कर."
मी याचा अर्थ असा घेतो कीं, आपण जसे तुझें नाम पवित्र मानिलें जावो म्हणतो, तितक्याच वेळा आपण हे देखील म्हटलें पाहिजे. म्हणजेंच येशू हे गृहीत धरत आहे कीं, आपण प्रत्येक वेळी प्रार्थना करतो तेव्हां आपण आपल्यां पापांची क्षमा मागितली पाहिजे.
दुसर्या शब्दात सांगायचे झालें तर, आपण सर्वदा मूळ पापाच्या अवस्थेंत असतो. आपण जे काहीं करतो ते परिपूर्ण नसते. जसे मार्टिन लुथर यांनी त्यांच्या मृत्यूशय्ये वर असताना म्हटलें, "आपण सर्वजण भिकारी आहोत, हेच सत्य आहे." जरी आपण प्रार्थना करण्यापूर्वी काहीं अंशी आज्ञापालन केलें असेल तरी, आपण देवाकडें पापी म्हणूनच येतो- सर्वजणच. आणि देव अशा पापी लोकांच्या प्रार्थना ऐकण्यापासून पाठमोरा होत नाहीं, जेव्हां ते अशा प्रकारे प्रार्थना करतात.
दुसरे ठिकाण जिथे आपण हे पाहू शकतो ते लूक 11:13 मध्यें आहे, 'तुम्हीं वाईट असताही तुम्हांला आपल्यां मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”
येशू त्याच्या शिष्यानां "वाईट" म्हणतो. खूपच कठोर भाषा आहे ही. आणि तो असें म्हणत नव्हता कीं ते त्याच्या सहभागितेमध्यें नव्हतें. तो असें म्हणत नाहीं कीं त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहींत.
तो असें म्हणत होता कीं, जो पर्यंत हे पतित जग राहील, त्याचे शिष्य देखील जे काहीं करतील, त्यांचा ओढा भ्रष्टतेकडें राहील, पण जो पर्यंत ते त्याच्या कृपेवर व त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून आहेत तो पर्यंत ते जें चांगलें तें करत राहतील.
आपण एकाच वेळी दुष्ट आणि तारलेलें असें आहोत. आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानें हळूहळू दुष्टते वर मात करत आहोत. पण आपली पापीवृत्ती तारणानंतर देखील नष्ट झालेंली नाहीं.
आपण पापी आहोत आणि भिकारी आहोत. आणि आपल्यांला ह्या पापाची ओळख पटली तर आपण त्याचा त्याग करायचा, त्याच्याशी लढायचे आणि ख्रिस्ताच्या क्रूसाला आपली आशा समजून बिलगुन राहावें, मग देव आपल्यां प्रार्थना ऐकेल आणि त्यांचे उत्तर देईल.
कारण तुम्हीं मोलानें विकत घेतलेलें आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारें देवाचा गौरव करा. ( 1 करिंथ 6:20)
"भक्ती" हा तो शब्द आहे ज्याचा उपयोग आपण अंतकरण, मन आणि शरीराची सर्व कार्य दर्शविण्यासाठीं करतो, ज्याचा हेतु देवाचे असीम मोल व्यक्त करणें आहे. आपण यासाठींच बनवलें गेलें आहोत. ते काम मंडळीमध्यें गीते गाणें असूं शकते. ते स्वयंपाक करणें किंवा लादी पुसणें असूं शकते.
भक्ती किंवा उपासना म्हंटल्यावर केवळ मंडळीमध्यें दर रविवारी सामूहिकरीत्या होणाऱ्या भक्तीचा विचार करूं नका. हा एक मोठा गैरसमज किंवा “भक्ती” या शब्दाची मर्यादित व्याख्या आहे जी पवित्र शास्त्रात नाहीं. आपलें सर्व जीवनच देवाची भक्ती असायला हवे.
तुमच्यां न्याहारीचाच विचार करा, 1 करिंथ 10:31 सांगते, "म्हणून तुम्हीं खाता, पिता किंवा जे काहीं करता ते सर्व देवाच्या गौरवासाठीं करा." आता खाणें किंवा पिणें हे सर्वात मूलभूत आहे. खाणें आणि पिणें याच्यापेक्षा खरे किंवा साधे काय असू शकते? आणि पौल असें म्हणतो कीं आपलें सर्व खाणें आणि पिणें भक्ती प्रमाणें असावे.
किंवा पती-पत्नी मधील परस्पर शारीरिक संबंधच पहा, पौल असें म्हणतो कीं जारकर्माला पर्याय भक्ती आहे,
जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्यां शरीराबाबत पाप करतो. (1 करिंथ 6:18-20)
म्हणजें, तुम्हीं तुमच्यां शरीराद्वारें तुमची लैंगिक इच्छा कशी हाताळता त्यातून तुमची भक्ती व्यक्त होते.
किंवा मरणाकडें एक शेवटचे उदाहरण म्हणून पाहा. आपल्यांला शरीरामध्यें मरणाचा अनुभव होणार आहे. तस पहायला गेलें तर, आपल्यां शरीराद्वारें घडणारे ते शेवटचे कार्य आहे. आपलें शरीर जगाचा निरोप घेते. मग आपण आपल्यां ह्या शेवटच्या कृती द्वारें भक्ती कशी करणार? याचे उत्तर फिलिप्पै 1:20-21 मध्यें आहे. पौल म्हणतो कीं त्याची आशा आहे कीं ख्रिस्त गौरवला जावा - त्याच्या मरणाच्या शरीराद्वारें त्याची भक्ती व्हावी, आणि तोच योग्य आहे हेच प्रतीत व्हावे. मग तो पुढे म्हणतो, "माझ्यासाठीं .... मरणें हे लाभ आहे." आपण आपलें मरण हे लाभ आहे असें जेव्हां म्हणतो तेव्हांच ख्रिस्ताचे अनंत मोल व्यक्त करतो.
होय तुम्हांला शरीर आहे. पण ते तुमचे नाहीं. "तुम्हीं मोलानें विकत घेतलेलें आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारें देवाचा गौरव करा"
तुम्हीं नेंहमीच मंदिरात आहात. नेंहमी भक्ति करा.
मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेंला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असें नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझें जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगानें आहे; त्यानें माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिलें. (गलती 2:20)
विश्वास हा देवाच्या भावी कृपे बरोबर तंतोतंत सुसंगत आहे. तो कृपेचा पुरेसेपणा आणि त्याद्वारें मिळालेलें स्वातंत्र यांबरोबर अनुरूप आहे. तो देवाच्या गौरवी विश्वासार्हतेकडें आपली दृष्टि लावण्यांस सांगतो.
या निष्कर्षाचा एक महत्वपूर्ण संकेत म्हणजें हा कीं जो विश्वास आम्हांला नीतिमान ठरवतो आणि जो विश्वास आमचे पवित्रीकरण करतो तो वेग-वेगळा विश्वास नाहीं. "पवित्र केलें जाण्याचा" सरळ अर्थ म्हणजें पवित्र होणें किंवा ख्रिस्ताच्या स्वरूपाचे होणें. हे सर्व कृपे मुळें आहे.
म्हणून, हे देखील विश्वासाद्वारें असलें पाहिजे. कारण विश्वास हा आमच्यां अंतकरणाची कृती आहे, आणि तो कृपे बरोबर जोडला जातो, तिला मान्य करतो, आणि तिच्याद्वारें आज्ञाधारकतेचे सामर्थ्य मिळवितो, आणि कृपेला मानवी आढ्यतेमुळें रद्द होण्यापासून सुरक्षित ठेवतो .
पौल विश्वास आणि पवित्रीकरण यांमधील संबंध गलती 2:20 मध्यें स्पष्ट करतो ("मी विश्वासानें जगतो"). पवित्रीकरण हे आत्म्याचे आणि विश्वासचे कार्य आहे. म्हणजें हे कृपा आणि विश्वासाद्वारें आहे असें म्हणण्या प्रमाणें आहे. आत्मा हा "कृपेचा आत्मा आहे" (इब्रि 10:29). देव आपल्यांला ज्यां मार्गानें पवित्र करतो तो मार्ग आत्म्याद्वारें आहे; पण आत्मा सुवार्ते वरील विश्वासाद्वारें कार्य करतो.
विश्वास जो नीतिमान ठरवतो आणि विश्वास जो पवित्रीकरण करतो तो एकच आहे आहे स्पष्ट कारण हे कीं नीतिमान ठरवलें जाणें आणि पवित्रीकरण हे दोन्ही सार्वभौम कृपेची कार्ये आहेत. आणि हा विश्वास कृपेबरोबर कार्य करतो. नीतिमान घोषित करणें आणि पवित्रीकरण हे दोन्ही एकाच प्रकारचे कार्य नाहींत (कारण नीतिमान घोषित केलें जाणें हे नीतिमान गणिलें जाणें आहे, तर पवित्रीकरण हे त्या नीतीमत्वाचे दर्शक आहे) आणि ही दोन्ही कृपेची कार्ये आहेत. पवित्रीकरण आणि नीतिमान ठरवलें जाणें ही "कृपे वर कृपा आहे" ( योहान 1:16).
विश्वास हा देवाच्या विनामूल्य कृपेचा मनुष्यामध्यें घडून येणारा परिणाम आहे. जर नीतिमान घोषित केलें जाणें आणि पवित्रीकरण ही दोन्ही कृपेची कार्य आहेत तर, ती दोन्हीही विश्वासाद्वारेंच आहेत हे स्पष्ट आहे.
जे तुम्हीं पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनानें वैरी झाला होता, 'त्या तुमचा आता त्यानें स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारें समेट केला आहे, ह्यासाठीं कीं त्यानें तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असें आपणासमोर उभे करावे. (कलसै 1:21-22)
जगातील सर्वात चांगली बातमी ही आहे कीं देवा बरोबर असलेंला आमचा परकेपणा व वैर संपलेलें आहे आणि आता आपला या विश्वाच्या न्यायाधीशा सोबत समेट झाला आहे. देव आता आपल्यां विरुद्ध नाहीं तर, आपल्यां सोबत आहे. सर्वसमर्थाची प्रीति आपल्यां बाजूनें असल्यानें आपल्यां आत्म्याला कवच प्राप्त होते. जीवन हे स्वतंत्र आणि धाडसी बनते जेव्हां विश्वातली सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती आपल्यां बाजूनें असतो.
पण जे कलस्सै 1:21 मध्यें सांगण्यांत आलेलें रोग-निदान नकारतात, पौलाचा तारणाचा संदेश त्यांच्यासाठीं चांगली बातमी नाहीं. तो म्हणतो, "तुम्हीं परके व दुष्कर्मे करत मनानें वैरी झाला होता."
तुम्हीं अशा किती लोकांना ओळखता जे असें म्हणतात कीं, "मजवर जर देवानें कृपा केली नाहीं तर मग मी मनानें देवाचा वैरी आहे"? , "मी देवाचा द्वेष करतो. असें क्वचितच लोक म्हणतात. मग पौलाचे काय म्हणणें आहे जेव्हां तो म्हणतो कीं येशूच्या रक्ताद्वारें समेट होण्यापूर्वी सर्व लोक"देवाचे वैरी आहेत"?
मला वाटते कीं खर्या देवाबद्दल लोकांच्या मनात वैर आहे, पण लोक खर्या देवाचा विचार करण्याचा प्रयत्न करत नाहींत. त्यांना वाटते कीं देव अगदी त्यांच्या कल्पनेंप्रमाणें आहे, ज्या मध्यें आपण देवाचे वैरी आहोत असा विचार त्यांना क्वचितच पडत असेल.
पण खरा देव जो अस्तित्वात आहे त्याच्याविषयीं विचार करायचा झाल्यास - तो देव जो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो, आजार आणि आपत्तीवर ही -आपण सर्व त्याचे वैरी होतो, पौल म्हणतो आपण मनानें त्याचे सामर्थ्य आणि अधिकार याचा द्वेष करत होतो.
आणि जे आपलें तारण झालें आहे ते या अढ्भुत सत्यामुळें कीं ख्रिस्तानें त्याच्या मरणानें आम्हांसाठीं कृपा प्राप्त केलीं आहे ज्या द्वारें देवानें आपल्यां मनाचा ताबा घेतला आणि एकेकाळी ज्याचा आपण द्वेष करत होतो, ते आपण आता त्याच्यावर प्रीति करण्यास प्रवृत्त झालो.
आज पुष्कळ लोग असें आहेत जें देवाबरोबर आपलें कसेही वैर नसावे हे शिकत आहेत. हे चांगलें आहे कीं तो एक असा रोगी आहे ज्याच्या वाट्याला शेवटी गौरव आहे.
"तर तुम्हीं पहिल्यानें देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजें त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील." (मत्तय 6:33)
देवाच्या संपन्न भावी कृपे विषयीं असलेंल्या सर्वात सामर्थ्यशाली साक्षींपैकीं एक म्हणजें "विश्वासाचा नियम" ज्यांवर पुष्कळ मिशनऱ्यांच्या जीवनाची वाटचाल आधारलेंली होती, विशेषता: ओवर्सीज मिशनरी फेलोशिप (ओ एम एफ) या संस्थेच्या मिशनऱ्यांचे जीवन.
इतरांच्या कार्य-पद्धतीचा निषेध न करता, विश्वासाचा हा नियम त्यां लोकांचे जीवन-तत्व होते जे हडसन टेलर आणि जॉर्ज मुलर यांच्या पथ-चिन्हांवर चालून, लोकांकडें निधि न मागता थेट देवाकडें विनवणी करित असत कीं दान देण्याकरिता लोकांच्या मनात त्यानेंच कार्य करावें.
जेम्स एच, टेलर जे ओ एम एफ च्या संस्थापकांचे पणतू होते, स्पष्ट करतांत कीं भावी काळातील कृपेवर असलेंला हा विश्वास, जो गत काळात झालेंल्या कृपेत मूळांवलेंला असतो, तो कसा देवाचे गौरव करतो.
“आम्हीं ..... विश्वासापासून सुरुवात करतो. आम्हीं विश्वास ठेवतो कीं देव आहे. अनेक मार्गानी आम्हांला याची खात्री पटली आहे, पण आम्हीं सर्वांनी देवाच्या कृपेचा अनुभव घेतला आहे कीं आम्हीं येशू ख्रिस्ता द्वारें आणि आत्म्याच्या नवीन जन्माद्वारें त्याला ओळखू शकतो. येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुनरुत्थानाचा इतिहासातील पुरावा हा त्याच्यावर विश्वास ठेवण्यास भक्कम पाया आहे; जो बोलला कीं तो मरेल आणि पुन्हा जीवंत होईल आणि तो झाला, तो सर्वच बाबतीत विश्वासार्ह आहे. त्यामुळें, आम्हीं त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार आहोत, केवळ आमच्यां आत्म्याच्या सार्वकालिक तारणासाठींच नाहीं तर, आमच्यां रोजच्या भाकरीसाठीं आणि आर्थिक पुरवठयासाठीं सुद्धा.
ओ एम एफ नें आपल्यां मासिकांत देवाच्या अढ्भुत भावी पुरवठा करणार्या त्याच्या गौरवीपणा बद्दल आणि त्याच्या विश्वासूपणा बद्दल अशी साक्ष प्रकाशित केली : "आम्हांला हे दर्शवायचे आहे कीं देव जे सांगतो कीं तो जे करील, ते करण्याबाबत तो विश्वासू आहे. तो सामान्य गरजा जसे कीं विमानाचे टिकिट, अन्न, दवाखान्याचा खर्च आणि ख्रिस्ती गटाच्या नेंहमीच्या गरजांचा पुरवठा शंभर वर्षाहून अधिक काळ तो करत आला आहे."
ओ एम एफ त्यांच्या संदेशामधून आणि त्यांच्या पद्धतीमधून, देवाच्या विश्वासूपणाचा गौरव करण्यात समर्पित आहे. हडसन टेलर असें म्हणतात : "एक जीवंत देव आहे. आणि तो पवित्र शास्त्रात आपल्यांशी बोललेंला आहे. आणि तो ज्या गोष्टींचे अभिवचन देतो, त्या गोष्टी तो पूर्णहि करतो."
विश्वासावर चालणारे जीवन हे देवाच्या भरवश्याचा आरसा आहे.
पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजें स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात; ह्यामुळें आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाहीं; कारण त्यानें त्यांच्यासाठीं नगर तयार केलें आहे. (इब्री 11:16)
देव जे अब्राहाम, इसहाक व याकोबाबद्दल बोलला ते त्यानें माझ्या बद्दल देखील बोलावे असें मला खूप वाटते, कीं "मला तुमचा देव म्हणवून घ्यायलालाज वाटत नाहीं "
हे जरी जोखमीचे वाटत असलें तरी, याचा अर्थ असा नाहीं आहे का, कीं देवाला तो माझा देव असण्याबद्दल खरेच "गर्व" वाटत असावा? सुदैवानें ही अद्भुत शक्यता (इब्री 11:16 मध्यें) त्याच्या कारणांनी वेढलेंली आहे : एक आधी आणि एक नंतर.
पहिलं कारण म्हणजें : "आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाहीं; कारण त्यानें त्यांच्यासाठीं नगर तयार केलें आहे."
त्याला आपला देव म्हणून घेण्यास लाज वाटत नाहीं याचे पहिलें कारण जे तो देतो ते हे कीं त्यानें त्यांच्यासाठीं काहीं तरी केलें आहे. त्यानी त्यांच्यासाठीं एक नगर बनवलें आहे - स्वर्गीय नगर जे "देवानें योजलेलें व बांधलेलें आहे " (इब्री 11:10). यास्तव त्याला त्यांचा देव म्हणवून घेण्यास लाज वाटत नाहीं याचे पहिलें कारण हे कीं त्यानें त्यांच्यासाठीं कार्य केलें आहे. ना कीं आपण त्याच्यासाठीं काहींतरी केलें आहे.
आता, तो पुढे काय कारण देतो ते पहा. ते अश्या प्रकारे आहे : "पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजें स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. त्यामुळें देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला लाज वाटत नाहीं."
"ह्यामुळें" निर्देशित करते कीं, आताच कारण दिलें गेलें आहे कीं का देवाला आमचा देव म्हणवून घेण्यास लाज वाटत नाहीं. याचे कारण आहे कीं ते उत्कंठा धरतात. ते चांगल्या देशाची इच्छा करतात - म्हणजेंच ते आता ज्या भौतिक राष्ट्रात राहत आहेत त्यापेक्षा जास्त चांगल्या देशाची ते उत्कंठा धरतात, स्वर्गीय शहर जेथे देव आहे.
जेव्हां आपण हे जग आपल्यांला जे देईल त्यापेक्षा, त्या स्वर्गीय नगराची उत्कंठा धरतो - जे देवाचे निवासस्थान आहे - तेव्हां देवाला आपला देव म्हणवून घेण्यास लाज वाटत नाहीं. देव आपल्यांला जे काहीं देऊ करणार आहे त्या अभिवचनांना आपण जेव्हां महत्व देतो तेव्हां, देवाला आपला गर्व वाटतो. ही चांगली बातमी आहे.
म्हणून, एका चांगल्या देशाकडें तुमची नजर वळवा, जे नगर देवानें आपल्यांकरिता बनवलें आहे, आणि पूर्ण अंत:करणनें त्याची उत्कंठा धरा. देवाला तुमचा देव म्हणवून घेण्यास लाज वाटणार नाहीं.
परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; 'आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. ( रोम 4:20-21).
विश्वास भविष्यातील देवाच्या कृपेचा गौरव करितो हे मानण्याकरिता पौलाकडें विशेष कारण होते. सरळ शब्दात सांगायचे झालें तर, याचे कारण म्हणजें देवाला गौरव देणारा विश्वास हा भविष्यातील अभिवचनांविषयीं देवाचा विश्वासूपणा आणि त्याचे सामर्थ्य आणि त्याचे ज्ञान यांत असणारी खात्री आहे.
अब्राहामानें देवाच्या अभिवचनांना कसा प्रतिसाद दिला याचे उदाहरण देऊन पौल हे स्पष्ट करतो : कीं तो अनेक राष्ट्रांचा पिता होणार जरी तो वयस्कर झाला होता आणि त्याची पत्नी वांझ होती तरीही. '“तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणें त्यानें ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्यानें आशेनें विश्वास ठेवला. (रोम 4:18) म्हणजेंच देवाच्या अभिवचनांत असलेंल्या भविष्यातील कृपेवर त्याचा विश्वास होता, जरी सर्व भौतिक पुरावे प्रतिकूल असलें तरी.
तथापि विश्वासानें दुर्बळ न होता, आपलें निर्जीव झालेलें शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्यानें लक्षात घेतली; 'आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; 'आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. ( रोम 4:19-20)
अब्राहामाचा विश्वास देवाच्या या अभिवचनांवर होता कीं देव त्याला अनेक राष्ट्रांचा पिता बनविल. हा विश्वास देवाला गौरवणारा विश्वास होता कारण त्याद्वारें देवाच्या सर्वसमर्थ, अलौकिक संसाधंनें जे तो सर्व अभिवचनें पूर्ण करण्यासाठीं पुरवणार होता त्याच्यावर लक्ष केंद्रीत करणारा होता.
अब्राहाम हा वयस्कर झाला होता आणि सारा वांझ होती. इतकेच नाहीं तर : तुम्हीं एक किंवा दोन मुलां द्वारें "अनेक राष्ट्र" कशी बनवू शकता, ज्या बद्दल देवानें अब्राहमाला वचन दिलें होते? हे सर्व अशक्यप्राय होते.
त्यामुळें, अब्राहामाचा विश्वास देवाचा गौरव करणारा विश्वास होता, कीं देव जे मनुष्याला अशक्य ते शक्य करूं शकतो आणि तो ते करणार. आपल्यांला देखील अश्याप्रकारे विश्वास ठेवण्यास बोलावलें आहे. आपण जे आपल्यांसाठीं करूं शकत नाहीं ते देव आपल्यांसाठीं करील.
“तुझ्या द्वारें पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ती 12:3)
जे तुम्हीं ख्रिस्तामध्यें आशा ठेवता आणि आज्ञाधारकपणें त्याला अनुसरता, ते तुम्हीं अब्राहामाचे वंशज आहात आणि त्याच्या कराराच्या अभिवचनांचे वारस आहात.
उत्पत्ती 17:4, मध्यें देव अब्राहामाला म्हणाला, '“पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील." पण उत्पत्तीच्या पुस्तकांतून हे स्पष्ट होते कीं अब्राहाम हा पृथ्वीवरील सर्व कुळांचा जनक झाला तो ते शारीरिकरित्या किंवा राजकींयरित्या नाहीं. म्हणूनच देवाच्या ह्या अभिवचनाचा अर्थ असा असण्याची शक्यता आहे कीं, अनेक राष्ट्रे, जरी ते देहानुसार अब्राहामाच्या रक्ताचे नसलें तरी ते कोणत्या तरी प्रकारे त्याचे पुत्र म्हणून आशीर्वादीत होतील.
उत्पत्ती 12:3 मध्यें देव जे अब्राहामाला बोलला, "तुझ्या द्वारें पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील” तेव्हां हांच त्याचा अर्थ होता यांत काहींच शंका नाहीं. सुरुवातीपासूनच देवाचा मानस होता कीं येशू ख्रिस्ताचा जन्म अब्राहामाच्या वंशात व्हावा आणि जे सर्व ख्रिस्तामध्यें विश्वास ठेवतात त्यांनी अब्राहामाला दिलेल्यां आशीर्वादांचे वारस व्हावे. गलती 3:29 मध्यें पौल म्हणतो, 'आणि तुम्हीं जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहां.'
4,000 हजार वर्षापूर्वी जेव्हां देव अब्राहामाला बोलला, '“पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील" तेव्हां देवानें त्या द्वारें आपल्यांकरिता मार्ग मोकळा केला, आपण परराष्ट्रीय असलो तरी आपण अब्राहामाची संतान बनू शकतो आणि देवाच्या अभिवचनांचे वारस बनू शकू. आपल्यांला इतकेच करायचे आहे कीं आपल्यांला अब्राहामा सारखाच विश्वास ठेवायचा आहे- म्हणजें देवाच्या अभिवचनांवर भाव ठेवायचा आहे, तो इतका कीं, जर या आज्ञाधारकपणात आपल्यांला प्रिय असणार्या गोष्टी देखील बलिदान करण्याची तयारी ठेवावी लागेल जसे अब्राहामानें इसाकाला.
आपण अब्राहामाच्या अभिवचनांचे वारीस कोणतेही कर्म केल्यां द्वारें होऊ शकत नाहीं, तर देव स्वतः आपल्यां करिता कार्य करतो या गोष्टीची खात्री ठेवून आपण वारीस होऊ शकतो. "[ अब्राहाम ] परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; 'आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.' ( रोम 4:20-21). यामुळेंच अब्राहाम देवाची आज्ञा पाळू शकला जरी आज्ञापालन व्यर्थ वाटत असलें तरी. देव अशक्य ते शक्य करूं शकतो यावर त्यानें भरवसा ठेवला - जसे कीं त्याच्या मुलाला मरणातून पुन्हा जीवंत करणें.
देवाच्या अभिवचनांमध्यें विश्वास ठेवणें - किंवा आज आपण म्हणू शकतो कीं, ख्रिस्तावर विश्वास ठेवणें, जो देवाच्या अभिवचनाची पूर्तता आहे - त्याच्यावर विश्वास ठेवणें हा अब्राहामाची संतान होण्याचा मार्ग आहे; आज्ञापालन या गोष्टीचा पुरावा आहे कीं आपला विश्वास हा खरा आहे ( उत्पत्ती 22:12-19). म्हणून येशू योहान 8:39 मध्यें म्हणतो, “जर तुम्हीं अब्राहामाची मुलें आहात तर अब्राहामाची कृत्ये करा."
अब्राहामाची संतान ही सर्व राष्ट्रातील ती लोकं आहेत ज्यांनी त्यांची आशा येशू ख्रिस्तामध्यें ठेवली आहे, आणि त्यामुळें जशी अब्राहामानें मोरीया पर्वतावर आशा ठेवली, त्याप्रमाणें त्यांचा सर्वात मोलवान जगीक ठेवा देखील त्यांच्या आज्ञाधारकतेला रोखू शकत नाहीं.
जे तुम्हीं येशू ख्रिस्तामध्यें आशा ठेवता आणि विश्वासाचे आज्ञापालन करून त्याला अनुसरता, ते तुम्हीं अब्राहामाचे वंशज आहात आणि त्याच्या कराराच्या अभिवचनाचे वारस आहात.
मी देवाची कृपा व्यर्थ करत नाहीं. (गलती 2:22)
मी लहानपणी समुद्रकिनारी असताना एका मोठ्या लाटेमुळें पाय सटकून पडलो, तेव्हां मला वाटलें कीं मी क्षणातच समुद्रात ओढला जाणार आहे.
ती खूप भीतीदायक गोष्ट होती. मी माझा तोल सावरू लागलो आणि पाहू लागलो कीं उभे कसे राहता येईल. पण लाटेचा जोर इतका शक्तिशाली होता कीं मी पोहू देखील शकत नव्हतो, आणि मी माझें पाय जमिनीवर ठेवू शकत नव्हतो. शिवाय, मी चांगला पोहू पण शकत नव्हतो.
मी भीतीच्या त्या अवस्थेंत असतांना मला एकच विचार आला : कोणी माझी मदत करील का? पण पाण्याच्या आतून मी कुणाला हाक पण मारू शकत नव्हतो.
जेव्हां माझ्या वडिलांनी माझ्या हाताला मजबुतीनें पकडलें, तो माझ्या जीवनातला सर्वात मधुर क्षण होता. मी त्यांच्या ताकती पुढे स्वता:ला पूर्णपणें आत्म-समर्पण केलें. मला उचलून धरण्याची त्यांची जी इच्छा होती तिचा मी आनंद घेऊ लागलो. मी त्यांचा प्रतिकार केला नाहीं.
माझ्या मनात हा विचार आला नाहीं कीं मी असें दाखवावे कीं स्थिति इतकीं पण वाईट नव्हती, आणि माझ्या वडीलांच्या हाताला मी पण माझी ताकत लावावी. मला इतकेच वाटत होते कीं, होय! मला तुमची गरज आहे! मी तुमचा आभारी आहे ! मला तुमचे सामर्थ्य आवडलें! मला तुमचा पुढाकार आवडला! मला तुमची पकड आवडली! तुम्हीं महान आहां!
आत्म-समर्पणाच्या त्या प्रीतिमध्यें कोणी आढ्यता मिरवू शकत नाहीं. आत्म-समर्पणाच्या त्या प्रीतिला मी "विश्वास" असें मानतो. आणि पाण्यात बुडत असताना मला ज्या साहाय्याची गरज होती, म्हणजें माझें वडील, ते देवाच्या भावी कृपेची प्रचिती होते, व हेच साहाय्य मला हवे होते. हाच तो विश्वास आहे जो कृपेला उंचवितो.
ख्रिस्ती जीवन कसे जगायचे याचा जेव्हां आपण विचार करतो तेव्हां ह्या विचाराला प्रथम स्थान दिलें गेलें पाहिजे कीं : मी देवाच्या कृपेला व्यर्थ न ठरवता तिला कसे उंचावू शकतो? याचे उत्तर पौल गलती 2:20:21 मध्यें देतो. "मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेंला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असें नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझें जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगानें आहे; त्यानें माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिलें. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाहीं."
त्याचे जीवन देवाची कृपा व्यर्थ करणारे का नव्हते? कारण तो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवणारे जीवन जगत होता. विश्वास सर्व लक्ष कृपेकडें निर्देशित करतो, ना कीं ती व्यर्थ करतो.