
Sign up to save your podcasts
Or


दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्या चेहऱ्यांमागचे कलाकार तुम्हाला क्वचितच ठाऊक असतील. उमेदवारांच्या आणि नेत्यांच्या नावावर प्रचार होतो, तो करण्यासाठी जसे पक्षाचे कार्यकर्ते असतात तसेच प्रोफेशनल कार्यकर्तेही असतात. हे राजकीय सल्लागार किंवा पॉलिटिकल कन्सल्टंट्स कोण असतात? खरंच राजकीय सल्लागार निवडणुका जिंकण्या – हरण्यात इतकी महत्त्वाची भूमिका बजावतात का?
लेखन - आशय येडगे
निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा ठरवताना कोणत्या कायद्याचा आधार घेतं? निवडणूक प्रक्रियेच्या तारखा ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? पाहुया आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - आशय येडगे
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
नोव्हेंबरच्या दोन दिवसांत महाराष्ट्रात असा पाऊस पडला की 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं, त्यापूर्वी 55 वेळा वीज पडून 70 लोकांचा जीव गेला तर पूर आणि दरड कोसळून 103 लोक दगावले. हे नेमकं काय घडतंय? हवामान बदलाबद्दल आपण अनेकदा बोलतो पण हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. भारतात जानेवारी ते सप्टेंबर 2023 या 9 महिन्यांमध्ये जवळपास दर दिवशी तीव्र हवामानाची एकादी घटना घडते आणि यात अपरिमित हानी झालीय. गेल्या 9 महिन्यांत भारताला बसलेल्या हवामानाच्या या तडाख्याची ही सोपी गोष्ट.
अखेर 17 दिवसांनंतर उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले मजूर बाहेर आले. खरंतर त्यांच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या यंत्रणा आणि मोठाली यंत्रं एकत्र काम करत होती, पण अखेरच्या टप्प्यात जेव्हा यंत्रंही निकामी व्हायला लागली, तेव्हा शेवटचे काही मीटर खोदण्याची जबाबदारी रॅट होल मायनर्सनी पार पाडली.
उंदराच्या बिळावरून नाव पडलेल्या या खाणकामाच्या पद्धतीवर देशात बंदी आहे, पण उत्तरकाशीत त्यामुळेच एवढे जीव कसे वाचले? मुळात हे रॅट होल मायनिंग काय आहे? देशात ते कुठे-कुठे वापरलं गेलंय आणि त्याच्यावर बंदी का आली? पाहूया, आजच्या सोपी गोष्टमध्ये
संकलन – आशय येडगे
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे सध्या महाराष्ट्रात शेतीचं बरंच नुकसान झालं आहे. पण अवकाळी पाऊस म्हणजे नेमका कोणता पाऊस? तो पडण्यामागची कारणं काय आणि त्यामुळे होणारं नुकसान कसं टाळता येईल?
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,591 Listeners

1,039 Listeners

5,515 Listeners

1,805 Listeners

1,800 Listeners

1,031 Listeners

1,994 Listeners

3,223 Listeners

721 Listeners

1,006 Listeners

1 Listeners