
Sign up to save your podcasts
Or


पंतप्रधानांनी दावा केलाय - जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल. ही आकडेवारी कशी ठरते? तर जीडीपीच्या वाढीच्या दरावर. गेल्या 9 वर्षांत भारताचा जीडीपी 83 टक्क्याने वाढला असला तरी तुमच्यातले काही लोक म्हणतील की आमचा पगार आणि खर्च याची सांगड पूर्वी होती तशीच आहे किंवा त्यापेक्षा वाईट आहे. आमची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. हे कसं? देशाची अर्थव्यवस्था वाढणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या वाढलेल्या उत्पन्नाचं वाटप आणि वितरण कसं आहे? जीडीपीच्या बाबतीत भारत आज जगात पाचव्या क्रमांकावर आहे,पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचं स्थान जगातील पहिल्या 100 देशांमध्ये नाही. असं का?
लेखन - अनंत प्रकाश
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
मणिपूर - गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून आपण सातत्याने हे एक नाव बातम्यांमध्ये ऐकतोय, पाहतोय. पण आजही मणिपूर अशांत आहे.
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी गावावर 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली. किमान 100 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जातेय, मृतांचा आकडा वाढतोच आहे.
लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
DES -
भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय.
23 जूनला बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि PDPसह अनेक विरोधी पक्षांचे नेते पाटण्यात एकत्र आले होते. आणि आता दुसरी बैठक बंगळुरूत पार पडली.
पण विरोधकांही ही आघाडी मोदींना आव्हान देऊ शकेल, याविषयी अनेकांच्या मनात शंका आहे. पाहू यात अशा 4 गोष्टी ज्या या आघाडीच्या निर्मितीत अडथळे निर्माण करू शकतात...
वार्तांकन – कीर्ति दुबे, बीबीसी हिंदी
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय.
वार्तांकन – प्रियंका, बीबीसी हिंदी
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत ट्रेन्स सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. चकचकीत दिसणाऱ्या या आधुनिक ट्रेन्स भारतात सोशल मीडियावर तर लोकप्रिय झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात अनेक मार्गांवर या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे.
लेखन – चंदन जजवाडे
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,591 Listeners

1,039 Listeners

5,515 Listeners

1,805 Listeners

1,800 Listeners

1,031 Listeners

1,994 Listeners

3,223 Listeners

721 Listeners

1,006 Listeners

1 Listeners