सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • ऑनलाईन फँटसी गेम्सवर 28 टक्के GST, कुणाला फटका बसणार? BBC News Marathi

    तुम्ही कधी ऑनलाईन गेम्स खेळले आहेत का? म्हणजे असे ऑनलाईन फँटसी गेम्स, जे Dream 11, MPL, Rummy Circle, A23, PokerBaazi सारख्या ॲप्सवर खेळले जातात. जर हो, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.

    सरकारने आता यावर 28 टक्के GST लावला आहे. 10 जुलैला GST काउंसिलच्या 50व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा फटका नेमका कुणाला आणि कसा बसेल? समजून घेऊ या
    वार्तांकन - निखिल इनामदार आणि हिमांशु भयाणी
    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • नासा चारच दिवसांत चंद्रावर, मग चंद्रयान 3ला 40 दिवस का लागणार? BBC News Marathi
    भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एका चांद्र मोहिमेसाठी सज्ज आहे. चंद्रयान-3 ही भारताची आजवरची सर्वांत किचकट आणि सर्वांत महत्त्वाची अंतराळ मोहीम मानली जातेय.
    हे यान अवकाशात उड्डाण केल्यावर चंद्रावर पोहोचायला 40 दिवस लागतील.
    पण याआधी 1969 साली मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं, तेव्हा नासाच्या अपोलो 11 यानाने चंद्रापर्यंतचा प्रवास अवघ्या 4 दिवसात पूर्ण केला होता. मग चंद्रयानला पृथ्वीच्या उपग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी एवढा वेळ का लागतो आहे?
    जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    वार्तांकन – श्रीकांत बक्षी, बीबीसी तेलुगू
    लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – अरविंद पारेकर
    6 min
  • वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला धक्का, आता काय होणार? BBC News Marathi

    वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला, असे आरोप गेल्या वर्षी आपण ऐकले होते. पण आता या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली आहे.

    त्यावरूनही राजकारण सुरू झालंय. काय होता हा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं?

    आणि तो आता रद्द झाल्यानंतरही मोदी सरकार आशावादी का आहे?
    जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • जीवघेणे क्लस्टर बाँब अमेरिका युक्रेनला का देतेय? BBC News Marathi

    क्लस्टर बाँब किंवा क्लस्टर म्युनिशनचा हवेतून जमिनीवर मारा केला जातो. हा बाँब म्हणजे अनेक लहान लहान बाँब्सचा संच असतो. तो जेव्हा टाकला जातो तेव्हा त्यातून असे अनेक लहान लहान बाँब्स जमिनीवर कोसळतात. यातले काहींचा लगेच स्फोट होतो पण काही मात्र तसेच राहतात. जगातील 100 पेक्षा अधिक देशांनी याचा वापर न करण्याचा करार केला आहे.

    लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    4 min
  • थ्रेड्स ॲप ट्विटरशी स्पर्धा करणार की त्याला मागे टाकणार? BBC News Marathi

    काही फरक सोडले तर थ्रेड्स ॲप ट्विटरसारखंच आहे हे आपण पाहतोय. थ्रेड्स ट्विटरशी मैत्रीपूर्ण स्पर्धा करेल असंही मेटाच्या टॉप मॅनेजमेंटने म्हटलंय. पण ट्विटरला ही गोष्ट रुचलेली नाही. मेटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचारही ट्विटरच्या मॅनेजमेंटने बोलून दाखवलाय. इलॉन मस्कने म्हटलं की “स्पर्धा ठीक आहे पण फसवणूक नाही.”

    लेखन - निवेदन - सिद्धनाथ गानू

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    4 min
  • इस्रायली सैन्य जेनिनमध्ये का घुसलं? BBC News Marathi

    3 जुलै 2023 रोजी शेकडो इस्रायली सैनिक, ड्रोन्स आणि बुलडोझर्सच्या सोबत जेनिनमध्ये घुसले. दोन दिवस ही कारवाई चालली आणि यादरम्यान चकमकी उडाल्या. त्यात 12 पॅलेस्टिनी मारले गेले आणि एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला.

    पण जेनिनमध्ये भडका का उडाला? हा रेफ्युजी कँप नेमका कुठे आहे आणि तिथल्या घडामोडींचे काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात.

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • चंद्रयान-3 मोहीम कशी असेल? BBC News Marathi

    जुलै महिन्याच्या मध्यावर चंद्रयान-3 अवकाशात झेपावेल असं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं जाहीर केलं आहे. चंद्रयान-3 हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे.

    या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही मोहीम कशी असेल आणि ती का महत्त्वाची आहे?
    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • SCO परिषद भारतासाठी का महत्त्वाची? BBC News Marathi

    शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद यंदा भारताकडे असून दिल्लीत 4 जुलै 2023 रोजी या संघटनेच्या व्हर्च्युअल परिषदेत सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते.

    पण ही संघटना कशी स्थापन झाली आणि ती नेमकं काय काम करते? भारत त्यात का सहभागी झाला आहे? जाणून घेऊयात.
    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • एका तरुणाच्या मृत्यूनंतर का पेटलाय फ्रान्स? BBC News Marathi

    17 वर्षांचा नाहेल M नावाचा एक तरुण पॅरिसजवळच्या नॉनटेअर उपनगरात गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याची गाडी अडवली. पोलिसांनी त्याच्यावर बंदूक रोखली, पण त्या तरुणाने गाडी पळवली, त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गाडी पुढे जाऊन धडकली, पण तोवर नाहेलच्या छातीत गोळी घुसली होती.

    उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सध्या पॅरिसभोवतीचा भाग पेटला आहे. एका किशोरवयीन मुलाच्या अशा मृत्यूनंतर लोक रस्त्यांवर उतरून आंदोलनं करू लागले. काय झालं नेमकं, की एका तरुणाच्या मृत्यूवरून फ्रान्स पेटला आहे?

    पाहा ही सोपी गोष्ट.

    लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • समान नागरी कायदा आला तर हिंदूंचंही नुकसान होऊ शकतं का? BBC News Marathi

    Uniform Civil Code अर्थात समान नागरी संहिता देशात लागू करण्यावरून सध्या राजकारण तापलंय.

    भाजप आणि उजव्या विचाराच्या संघटना आक्रमक झालेल्या दिसतायत तर दुसरीकडे याला विरोध करणारेही जोरात आहेत.
    UCC आला तर इतर धर्मांचे पर्सनल लॉ हद्दपार होतील हा एक भाग. पण यामुळे हिंदू समाजाचंही नुकसान होऊ शकतं का? यावरून काय राजकारण चाललंय? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    वार्तांकन – शौतिक बिस्वास, प्रियंका झा
    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,591 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,039 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,515 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,800 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,031 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,994 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

721 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners