
Sign up to save your podcasts
Or


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायदेशीर पुन्हा चर्चेत आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांची चौकशी सुरू आहे.
पण या सगळ्याचा ट्रंप यांना तोटा होईल की फायदा? ट्रंप यांना तुरुंगात जावं लागेल का आणि शिक्षा झाली, तर ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का? जाणून घेऊयात.
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकांना लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण याचा संदर्भ ऐकून माहिती असेल. सव्वाशे वर्षांपूर्वी वेदोक्ताच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप यांमुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं. पण हे प्रकरण नेमकं काय होतं?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
पगार येतो, पण पुरतंच नाही असं तुमचं होतं का? प्रयत्न करूनही व्यवस्थित गुंतवणूक होत नाही, त्यावर मनासारखा परतावा मिळत नाही? जवळपास सगळ्याच सर्वसामान्य लोकांचं असं होत असतं. कितीही ठरवलं तरी आर्थिक गणित जमत नसेल तर हा आजची सोपी गोष्ट खास तुमच्यासाठीच आहे.
संशोधन – आयव्हीबी कार्तिकेय
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन नेत्यांची तुलना सध्या सोशल मीडियावर होते आहे. कारण आहे, इस्रायलमध्ये सुरू असलेलं आंदोलन. नेमकं इस्रायलमध्ये काय सुरू आहे आणि भारताशी त्याची तुलना का केली जाते आहे.
संशोधन - सर्वप्रिया सांगवान, जान्हवी मुळे
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – शरद बढे
25 मार्चला पंजाबच्या फझिल्कामध्ये आणि अमेरिकेच्या मिसीसीपी राज्यालाही टोरनॅडो वादळांचा मोठा तडाखा बसला आणि त्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पण टोरनॅडो म्हणजे नेमकं काय असतं? हे वादळ कशामुळे येतं? आणि भारताला, विशेषतः महाराष्ट्राला त्यापासून किती धोका आहे, जाणून घेऊयात.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – शरद बढे
गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस आता आपल्यासाठी 'अवकाळी' राहिला नाहीये. खरंतर ऋतूंच टाइमटेबलच बदललेलं दिसतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं नियमित चक्र पाहायला मिळत नाही... या बदलाची कारणं काही असो, पण अवकाळी पाऊस येऊ दे की उष्णतेची लाट...हवामान विभागावर खापर फुटतंच...कार्टून्स, मीम्स, व्हॉट्स फॉरवर्ड...हवामान विभागाची खिल्ली उडवायचा चान्स लोक सोडत नाहीत. पण किती जणांना हवामान विभाग काम कसं करतो, ते माहितीये. या विभागाची स्थापना कधी आणि कशी झाली? हवामानाचे अंदाज ते लावतात कसे?
लेखन, निवेदन – विशाखा निकम
दरवर्षी 20 मार्चला वर्ल्ड हॅपिनेस डे म्हणजे जागतिक आनंद दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं संयुक्त राष्ट्रांतर्फे वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स तयार केला जातो. दरवर्षी त्यावरून चर्चा आणि वादही होतात. हा कसला निर्देशांक आहे? तो कसा तयार करतात आणि त्यात भारत कुठल्या स्थानावर आहे? जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
गेल्या काही आठवड्यांत भारतात आणि महाराष्ट्रातही इन्फ्लुएंझा म्हणजे फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते आहे. यात H3N2 या फ्लूच्या विषाणूसोबतच H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. त्यातच राज्यात आणि विशेषत: मुंबईत कोव्हिडची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढतेय. याशिवाय देशात काही ठिकाणी विशेषतः लहान मुलांमध्ये अॅडिनो विषाणूचाही प्रादुर्भाव जाणवतोय. पण हा अॅडिनोव्हायरस काय आहे? त्याची लक्षणं कोरोना विषाणू आणि इन्फ्लुएन्झापेक्षा किती वेगळी आहेत? तिन्ही व्हायरसपासून संरक्षणासाठी काय करावं? जाणून घेऊया.
अमृतपाल सिंग आणि खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणारी वारिस पंजाब दे ही त्याची संघटना सध्या चर्चेत आहेत. अमृतपालच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्यापासून त्याचे पडसाद पंजाबच्या आणि देशाच्या राजकारणात आणि अगदी लंडनमध्येही उमटलेले पाहायला मिळाले. पण हा अमृतपाल सिंग कोण आहे? वारिस पंजाब दे ही संघटना चर्चेत का आहे?
महाराष्ट्रातले सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी पेन्शनसाठी संपावर गेलेत, आणि अशात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय – आमदारांना किती पेन्शन मिळतं? याच प्रश्नाचं उत्तर आणि हे पेन्शनचं गणित समजून घेणार आहोत, आजच्या सोपी गोष्टमध्ये.
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,586 Listeners

1,043 Listeners

5,514 Listeners

1,804 Listeners

1,802 Listeners

1,034 Listeners

1,990 Listeners

3,226 Listeners

724 Listeners

1,006 Listeners

1 Listeners