सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • इम्रान खान यांच्यावर काय आरोप आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान चर्चेत आहेत. (यांना पोलिसांनी अटक केली आहे). 14 मार्चला लाहोर पोलीस इम्रान खान यांना जमान पार्क येथील निवासस्थानी अटक करण्यासाठी गेले, तेव्हा खान यांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तेव्हापासून जगाचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं. पण इम्रान खान यांना पोलीस अटक करायला का आले? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं तोशाखाना प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.

    संशोधन – टीम बीबीसी
    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सिलिकॅान व्हॅली बॅंक का बुडली? त्याचा भारतावर काय परिणाम? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    स्टार्ट-अप्समध्ये लोकप्रिय असलेली सिलिकॉन व्हॅली बँक अर्थात SVB 10 मार्च 2023 रोजी बुडली आणि त्याचा फटका भारतातल्या स्टार्ट-अप्सनाही बसला. असं का घडलं?सिलिकॉन व्हॅली बँक महत्त्वाची का होती? या घटनेचे भारतीय कंपन्यांवर काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात.

    संशोधन - विनीत खरे
    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • ऑस्कर पुरस्कार कोण देतं? कसे दिले जातात? भारतात आजवर कुणाला मिळालेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    जगातले सर्वांत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार नेमके कोण देतं? तिथे कोणते आणि कसे सिनेमे पाठवले जातात? भारतात आजवर कुणा-कुणाला ऑस्कर पुरस्कार मिळालेत? आणि 'स्लमगडॉग करोडपती'साठी ए आर रहमानला दोन पुरस्कार कसे मिळाले होते?

    समजून घेऊ या, या सोपी गोष्टमध्ये
    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – निलेश भोसले

    9 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : इस्राएलमध्ये लोक एवढे का चिडले आहेत?

    इस्राएलमध्ये लाखो लोक सरकारविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरले. गेले दहा आठवडे तिथे निदर्शनं सुरू आहेत आणि या विरोधाचं कारण आहे, पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मांडलेला न्यायव्यवस्थेतल्या बदलांचा प्रस्ताव.

    नेमके हे बदल काय आहेत? त्याला विरोध का होतो आहे आणि या घडामोडींवर जगानं का लक्ष ठेवायला हवं, जाणून घेऊयात

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : गर्भसंस्कारांचा फायदा होतो का?

    RSS ची महिला संघटना राष्ट्र सेविका समितीशी निगडित असलेल्या संवर्धिनी न्यास या संस्थेने गरोदर महिलांसाठी गर्भ संस्कार अभियानाची सुरुवात केली आहे. मात्र गर्भावस्थेतले मूल खरंच शब्द किंवा भाषा शिकू शकतो का गर्भावस्थेत मूल काही आवाजांना प्रतीक्रिया देतं, पण त्या ध्वनीचा अर्थ बाळांना कळतो का? ? विज्ञानात याबाबत मतमतांतरं आहेत.

    संशोधन – सुशीला सिंग

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – निलेश भोसले

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतात एवढ्या महिला घराबाहेर का पडत नाहीत?

    बाबा रोज घराबाहेर पडतात. आई दिवसभर बहुदा घरातच राहते आणि क्वचितच, आठवड्यातून एकदा वगैरे बाहेर जाते असं चित्र भारतात अनेक घरांमध्ये दिसतं. काही मोजक्या शहरांचा, प्रदेशांचा अपवाद सोडला तर भारतीय शहरांमध्ये महिलांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे, असं एका नव्या अभ्यासातून पुन्हा समोर आलं आहे. नेमकी यामागची कारणं काय आहेत आणि ही परिस्थिती बदलणं का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन – सौतिक बिस्वास

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – शरद बढे

    6 min
  • जांभळा रंग महिला दिनाचं प्रतीक कसा बनला ? BBC News Marathi

    दरवर्षी 8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो. या दिवसामागे महिला हक्कांसाठी लढ्याची एक शतकाहून अधिक जुनी परंपरा आहे. तसंच महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये, सेलिब्रेशन किंवा आंदोलनामध्ये जांभळ्या रंगाचा वापर केला जातो. यामागची कारणं काय आहेत? पुरुष दिवसही कधी साजरा केला जातो का? जाणून घेऊयात.

    संशोधन – टीम बीबीसी

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : धुळवडीचे रंग साफ कसे करायचे?

    होळी, धुळवड आणि रंगपंचमीला रंग खेळताना जरा सावधच राहा असा इशारा डॉक्टर्स देतात. पण म्हणजे नेमकी काय काळजी घ्यायची, याविषयी आम्ही त्वचारोगतज्ज्ञांना विचारलं. रंग साफ कसे करायचे, कुठल्या परिस्थित डॉक्टरांची मदत घ्यायची, जाणून घ्या.

    संशोधन – बुशरा शेख

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : सभागृहाचा हक्कभंग म्हणजे काय?

    विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यावरून विधानसभेत खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यावर नेमकं पुढे काय होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण यानिमित्तानं विधिमंडळाचे विशेषाधिकार आणि हक्कभंग पुन्हा चर्चेत आले आहेत. हक्कभंग म्हणजे नेमकं काय असतं, त्याची प्रक्रिया काय आहे आणि संजय राऊतांवर काय कारवाई होऊ शकते, जाणून घेऊयात.

    संशोधन – टीम बीबीसी

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • EPS अंतर्गत EPFOची वाढीव पेन्शन कशी मिळवायची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    तुम्ही किंवा तुमचे आईबाबा, किंवा आणखी कुणीही नोकरी करत असेल, तर एक प्रश्न नेहमी चर्चेत असतो – 60नंतर काय? पेन्शन आहे का? आपल्यापैकी काही जणांना पेन्शन मिळतही असेल किंवा काही जण पेन्शनसाठी झगडत असतील.

    पण आता सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळे काही आजी-माजी कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. ही EPS, EPF, EPFO ची भानगड आहे तरी काय? लाखो आजी-माजी कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढण्यासाठी 3 मार्च ही तारीख का महत्त्वाची आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
    वार्तांकन – टीम बीबीसी
    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,586 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,043 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,514 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,804 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,034 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,990 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,226 Listeners

Americast by BBC News

Americast

724 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners