सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : ग्रीन कॉमेट कसा पाहता येईल?

    ग्रीन कॉमेट नावानं ओळखला जाणारा धूमकेतू जगभरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण तब्बल 50 हजार वर्षांनी तो पृथ्वीच्या जवळ आला आहे. म्हणजे याआधी हा धूमकेतू आला होता, तेव्हा इथे पृथ्वीवर निअँडरथल्स या आदिमानवाचा वावर होता आणि या धूमकेतूची एक फेरी पूर्ण होईपर्यंत आधुनिक मानवाची अख्खी प्रजाती विकसित झाली. हा धूमकेतू कसा, कुठे, कधी पाहता येईल आणि धूमकेतूंचा अभ्यास महत्त्वाचा का असतो? जाणून घेऊयात.

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • क्रीडा क्षेत्रातील लैंगिक छळ : कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत? : सोपी गोष्ट पॉडकास्ट

    क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंचा लैंगिक छळ होत असतो अशा चर्चा नेहमीच कानावर येत येतात. पण याबद्दल भारतीय कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपीगोष्टमध्ये.

    5 min
  • मोदी सरकार फेक न्यूजला आळा घालणार की माध्यम स्वातंत्र्याला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    आता सरकार एक असा नियम आणू पाहतंय, ज्यामुळे एखादी गोष्ट, बातमी किंवा सोशल मीडिया पोस्ट खरी आहे की खोटी हे ठरवण्याचे अधिकार सरकारलाच असतील. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2021च्या नियमांमध्ये प्रस्तावित दुरुस्तीच्या दस्तावेजात म्हणण्यात आलंय की कुठल्याही सोशल मीडियावर आणि ऑनलाईन पोर्टर्ल्सवर अशा मजकुराला स्थान देण्यात येऊ नये, ज्या मजकुरास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या Press Information Bureauच्या फॅक्ट चेक युनिटने फेक किंवा खोटं म्हटलेलं आहे.

    यामुळे माध्यम स्वातंत्र्यावरच गदा येईल, अशी भीती का व्यक्त केली जातेय? खरंच यामुळे फेक न्यूजचा प्रश्न सुटेल की आणखी किचकट होईल? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग – निलेश भोसले

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे?

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक आर्थिक परिषद म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडच्या दावोस इथे गेले आहेत.

    फक्त शिंदेच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस बोम्माई यांच्यासह देशातले मोठे उद्योगपतीही या परिषदेला जाणार आहेत.

    पण दावोसमध्ये जाऊन हे लोक नेमकं काय करतात? ही परिषद काय आहे? त्यातून कुणाचा फायदा होतो आणि त्यावर टीका का होते आहे?

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवसेनेत पक्षप्रमुख कसा निवडला जातो?

    उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून मुदत येत्या 23 जानेवारीला संपत आहे. यासाठी पक्षांतर्गत प्रक्रिया पार पाडण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

    10 जानेवारीला पार पडलेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने लाखो कागदपत्रं पुरावे म्हणून सादर केली आहेत. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनाबाह्य पद्धतीने तयार केलं असा शिंदे गटाचा आरोप आहे.

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : वातावरणातलं हे भगदाड माणूस कसं बंद करतोय?

    पृथ्वीभोवतीचं ओझोनचं आवरण वाचवण्याच्या माणसाच्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणेच यश आलं आहे.पुढच्या काही दशकांतच या आवरणाला पडलेलं भगदाड भरून निघेल असं संयुक्त राष्ट्रांनी एका ताज्या अहवालातून जाहीर केलं आहे.

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : परदेशी विद्यापीठांची भारतीय केंद्रं

    सरकार परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांची केंद्रं उघडण्यासाठी आमंत्रण देण्याच्या विचारात आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अर्थात यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगानं त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा 5 जानेवारीला जाहीर केला.पण यामुळे खरंच विद्यार्थ्यांचा फायदा होईल का?

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • ब्राझीलच्या राजधानीत हिंसाचार का उसळला? सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi

    8 जानेवालीला ब्राझीलच्या राजधानीत संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांचे हजारो समर्थक चालून गेले. काहींनी संसदेत तोडफोड केली तर काहींनी अध्यक्षांच्या खुर्चीवर चढून नव्या राष्ट्राध्यक्षांचा विरोध केला. ब्राझीलमध्ये हे सगळं का घडतंय? या वादाचं मूळ कुठेय? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मधून.

    निवेदन - विशाखा निकम
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • ग्रीन हायड्रोजन मिशन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    मोदी सरकारने ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा केलीय. त्यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. पण काय आहे हे मिशन? हायड्रोजनपासून ऊर्जा मिळवणं शक्य आहे का? आणि जर हो, तर आपण आजवर या तंत्रज्ञानाचा वापर का नाही केलाय?

    जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

    लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,586 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,043 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,514 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,804 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,034 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,990 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,226 Listeners

Americast by BBC News

Americast

724 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners