सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट : ओमिक्रॉन BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत?

    हे वर्षं संपता संपता कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आलेला आहे. चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे रुग्ण भारतात आढळल्याची माहिती समोर आली आहे.

    BF.7 व्हेरियंटचे भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे.

    हा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षण का आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    5 min
  • औषधं घेऊन थांबवता म्हातारपण लांबवता येतं का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    अनुवंशशास्त्रज्ञ डेव्हिड सिनक्लेअर गेली 20 वर्षं वृद्धत्व याविषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्यामते काही अगदी सोप्या सवयींद्वारे वृद्धत्व लांबवून आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो.

    तरुण दिसण्याच्या उद्योगाची आजची उलाढाल 110 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि 2025 पर्यंत 600 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा एक अंदाज आहे.

    म्हातारपण अपरिहार्य नाही असा संशोधकांचा दावा आहे. सिनक्लेअर यांचं म्हणणं आहे की म्हातारपण अपरिहार्य नाहीये. ते नैसर्गिक नसून एक आजार आहे, त्यातून बरं होता येईल असा विचार करायला हवा.

    लेखन – अनघा पाठक

    निवेदन – गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : सर्व धर्मांच्या मुलींची लग्न एकाच वयात व्हावी अशी मागणी का होतेय?

    दिल्ली हायकोर्टात एक केस आली होती. एका अल्पवयीन मुस्लीम मुलीने आपल्या पतीसोबत राहण्याचं स्वातंत्र्य आणि त्यासाठी सुरक्षा मागितली होती. यावर निकाल देताना कोर्टाने त्या मुलीचं लग्न वैध ठरवलं होतं.

    राष्ट्रीय महिला आयोगाने आता याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि सगळ्या धर्मांच्या महिलांसाठी लग्नाचं वय समान असावं अशी याचिका दाखल केली आहे.

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आधीच मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 21 करण्यासाठी लोकसभेत विधेयक घेऊन आल्या आहेत. पण त्या विधेयकावर सध्या स्थायी समिती विचारमंथन करतेय.

    5 min
  • कोटामधले विद्यार्थी आत्महत्या का करतात? त्यांचे मृत्यू रोखायचे कसे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    कोटा शहर – देशभरातल्या IITमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांसाठीची पंढरी. याच कोटातून आता तीन विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची बातमी येतेय.

    ही बातमी धक्कादायक आहेच, पण ही काही पहिली वेळ नाहीय, जेव्हा कोटा या बातमीमुळे चर्चेत आलंय. काय आहे कोटाचं कोचिंग विश्व?
    आणि इथे विद्यार्थी आत्महत्या का करतात? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    वार्तांकन - मोहर सिंग मीणा, बीबीसी हिंदीसाठी

    लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • ‘कृत्रिम सूर्य’ तयार करण्याचा हा प्रयोग - न्युक्लिअर फ्युजन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    ऊर्जेचा एका नवा स्रोत म्हणजे न्यूक्लियर फ्युजन विकसित करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतायत. सूर्य आणि बाकीच्या ताऱ्यांनाही प्रकाशित करणारं हे न्यूक्लियर फ्युजन म्हणजे नेमकं काय आहे? गेली शंभर वर्ष शास्त्रज्ञ त्यावर काम का करत आहेत?

    उर्जेचा हा स्रोत माणसाचं जगणं कसं बदलू शकतो आणि त्यात भारत काय योगदान देतो आहे?

    जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : म्हैसाळ सिंचन योजना काय आहे?

    महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमावादाला पाणी प्रश्नाचीही किनार आहे. सांगलीत गेली कित्येक वर्ष पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या 42 गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी दावा केला आणि हा वाद पुन्हा उफाळून आला.

    त्यानंतर या गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेचं टेंडर काढायचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं आहे. पण ही योजना नेमकी काय आहे?

    अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/articles/cjq7pgnxw41o

    संशोधन – सरफराज सनदी

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : निर्भया फंडचा योग्य वापर होतो आहे का?

    निर्भया फंड सध्या पुन्हा चर्चेत आहे. या निधीतून आणलेल्या गाड्या महिलांच्या नाही, तर VIP नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी वापरत असल्याचा आरोप होतो आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातले आमदार आणि खासदारांसाठी या गाड्या वापरत असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून ही चर्चा सुरू झाली.
    सरकारनं याविषयी अजून कोणतं स्पष्टीकरण जाहीर केलेलं नाही. पण निर्भया फंडच्या वापरावर यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

    संशोधन – टीम बीबीसी

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला अक्षय कुमार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. अक्षय कुमार महाराजांसारखा अजिबात दिसत नाही, अशी टीका होते आहे.

    पण मग शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, असा प्रश्नही पुन्हा विचारला जातो आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,586 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,043 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,514 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,804 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,034 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,990 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,226 Listeners

Americast by BBC News

Americast

724 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners