सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपीगोष्ट पॉडकास्ट : चॅटजीपीटी नव्या जगाचा मंत्र होणार का?

    गेल्या आठवडाभरापासून चॅटजीपीटी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सांगकाम्या बाळूप्रमाणे तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरांसह भाषांतर, कथा अगदी साहित्य रचणारा चॅटबॉट आता आपल्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. माणसाचा हा मित्र भविष्यात माणसालाच रिप्लेस करणार का?

    निवेदन- गुलशनकुमार वनकर

    लेखन-पराग फाटक
    व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोबाईल फोनमधील पेमेंट ॲप्स सुरक्षित ठेवण्याचे सोपे मार्ग माहितीये?

    UPI Apps वापरुन आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो. बहुतेक यूपीआय व्यवहार हे गुगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या थर्ड-पार्टी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने, या माध्यमांमधून होणारे व्यवहार 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, यासाठी काही नियम लागू करण्यात येत आहेत.

    यासाठी RBI ने काय निकष घालून दिलेत? आपली ही ॲप्स सुरक्षित कशी ठेवायची? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    5 min
  • 2023 मध्ये भारतात आर्थिक मंदी येणार का? नोकऱ्या जाणार का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    GDPचे ताजे आकडे आलेत, ज्यात एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत 13.5 टक्क्यांवरून आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत थेट 6.3 टक्क्यांवर आला आहे.

    खरंतर अर्थव्यवस्थेचे आकडे अनेकांच्या डोक्यावरून जातात. कळतच नाही की यामुळे महागाई कमी होणार की आणखी वाढणार? नोकऱ्या राहणार की जाणार? देश नेमका प्रगती करतोय की पुढे आर्थिक मंदी येणार?

    समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    विश्लेषण – आलोक जोशी, ज्येष्ठ पत्रकार

    लेखन, सादरीकरण – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    7 min
  • एड्सची लागण झालीच तर काय? HIVवरच्या 10 प्रश्नांची उत्तरं | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन. दरवर्षी लाखो लोकांना HIVची लागण होऊन एड्स हा आजार झाल्याचं कळतं. आणि उपचार उपलब्ध नसल्यामुळे आजवर जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त लोकांचा बळीही या रोगाने घेतलाय.

    पण एड्स होतो कसा? तो टाळावा कसा? आणि HIVची लागण झालीच तर काय करावं?

    तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं, या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन - टीम बीबीसी मराठी

    लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - शरद बढे

    6 min
  • धारावीची झोपडपट्टी अदानी कशी बदलणार? BBC News Marathi सोपी गोष्ट 739

    धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, असं म्हणतात.

    या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पासाठीचा लिलाव नुकताच अदानी समुहाने जिंकला. 60 हजारहून अधिक झोपड्या आणि 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या धारावीचा पुनर्विकास कसा होणार?
    निवेदन - दीपाली जगताप
    एडिटिंग- अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : आरक्षणाचा फायदा नेमका कोणाला?

    EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. 2019 मध्ये केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आर्थिक निकषांवर खुल्या प्रवर्गातील घटकांना 10 टक्के आरक्षण जाहीर केलं. हे 10 टक्के आरक्षण नेमकं कोणासाठी आहे? या आरक्षणासाठी पात्रतेचे निकष काय आहेत? आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? EWS अंतर्गत सरकारने शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे.

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन विरोधात हजारो लोक रस्त्यावर

    चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीला लोकांचा तीव्र विरोध आहे. चीनच्या उरुमकी शहरात 2 दिवसांपूर्वी एका इमारतीला आग लागली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला. शी यांच्या कडक लॉकडाऊनच्या धोरणांमुळे इथं मदत पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घटनेवरून जे आंदोलन सुरू झालं त्याचं लोण आता देशभरात पसरताना दिसतंय

    5 min
  • पॉलिग्राफ टेस्ट काय असते? आफताब पूनावालाच्या टेस्टमधून काय निघणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, त्याने कुठली हत्यारं वापरली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याचे अनेक तपशील बाहेर येत आहेत. पण अजूनही कोर्टात मांडण्यासाठी ठोस पुरावे कमी पडतायत. त्यामुळेच पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफ टेस्ट्सची मागणी कोर्टाकडे केली होती.

    पॉलिग्राफ टेस्ट नेमकी काय असते? ती का आणि कशी केली जाते? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • गोवरची जगभरात साथ येणार? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    कोरोनाचं आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा WHOने दिला आहे. गोवर, ज्याला measles ही म्हटलं जातं, हा एक वेगाने पसरणारा आजार आहे, आणि तो पूर्ण लसीकरणानेच टाळता येतो.

    जर याची साथ आलीच, तर तुम्ही आम्ही काय करायला हवं, जाणून घेऊ या 10 प्रश्नोत्तरांमधून आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : कर्नाटकने महाराष्ट्राच्या 40 गावांवर दावा का केलाय?

    महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशकं सुरू आहे. तो सोडवण्यासाठी शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या एका विधानाने या वादाला नव्याने तोंड फुटलंय. कर्नाटक सरकार महाराष्ट्राची, सांगलीतली जवळपास 42 गावं ताब्यात घ्यायचा विचार करतंय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय.

    5 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,586 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,043 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,514 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,804 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,034 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,990 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,226 Listeners

Americast by BBC News

Americast

724 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners