सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • भारतात लग्नावर इतका खर्च का केला जातो? BBC News Marathi

    जगामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजे 80 लाख ते 1 कोटी लग्नं होतात. कारण भारतामध्ये तरूण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यापैकी 34% लोकसंख्या लग्नाच्या वयाची, 20 ते 39 वयोगटातली आहे.

    भारतापाठोपाठ चीनमध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख लग्नं होतात. तर अमेरिकेत वर्षाला 20 ते 25 लाख लग्नं होतात. भारतामध्ये एखाद्या कुटुंबात शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च लग्नामध्ये होतो, असं एक रिसर्च सांगतो.
    किती मोठी आहे भारतातली वेडिंग इंडस्ट्री? आणि मुळात लग्नांवर इतका खर्च का केला जातो?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    i

    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - शरद बढे

    5 min
  • नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कुणाला मिळतं? BBC News Marathi

    ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक उल्लेख झाला तो त्यांनी 'नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट' वापरल्याचा. काय असतं हे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट? ते कोणाला मिळू शकतं? आणि त्याचे फायदे काय आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - शरद बढे

    3 min
  • जागतिक लोकसंख्या दिन: जगात 800 कोटींपेक्षा जास्त लोक, स्थलांतराचा कसा होतोय परिणाम? BBC News Marathi

    जगाची लोकसंख्या संख्या सध्या 820 कोटी आहे आणि ती वाढून 1030 कोटी होणार असल्याचं युनायटेड नेशन्सच्या ताज्या अहवालात म्हटलंय.

    जगाची लोकसंख्या 2080च्या मध्यात सर्वोच्च असेल आणि त्यानंतर ती कमी होऊ लागेल असं 'वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेटक्ट्स' नावाच्या या अहवालामध्ये म्हटलंय. आज जन्माला आलेल्या मुलांचं सरासरी आयुर्मान 73.3 वर्षांचं असून 1995 पासून हे सरासरी आयुर्मान 8.4 वर्षांनी वाढल्याचंही हा अहवाल सांगतो.
    संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असणाऱ्या देशांच्या जनगणनेचा डेटा, जन्म आणि मृत्यू दर आणि लोकसंख्येशी संबंधित इतर पाहण्यांच्या मदतीने युनायटेड नेशन्स गेल्या 50 वर्षांपासून नियमितपणे जागतिक लोकसंख्येविषयीचे अंदाज मांडत आलेलं आहे.
    जगाची लोकसंख्या कधीपर्यंत वाढत राहणार? लोकसंख्येवर स्थलांतराचा कसा परिणाम होतोय?
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - शरद बढे

    6 min
  • हवामान खात्याचे अंदाज असे का चुकतात? BBC News Marathi

    8 जुलैला मुंबईत धो-धो पाऊस पडला, पाणी तुंबलं, ट्रेन्स बंद झाल्या.

    9 जुलैलाही पावसाचा रेड अलर्ट होता. म्हणून मग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शाळांना सुटी दिली.
    आणि पाऊसच पडला नाही... असं का होतं?
    भरपूर पाऊस पडणार, असं हवामान खातं सांगत असताना, पाऊस न पडणं वा अतिशय कमी पडण्याचं कारण काय?
    भारतातल्या हवामान खात्याकडे खरंच किती अत्याधुनिक यंत्रणा आहेत?
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - शरद बढे

    6 min
  • कृत्रिम मंगळावर राहून हे संशोधक वर्षभर काय करत होते? BBC News Marathi

    मंगळावरच्या भविष्यातल्या कॉलनीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यासाठी मानवाला कोणती कौशल्यं शिकून घ्यावी लागतील, तिथपर्यंतचा मोठा प्रवास लोकांना कसा करता येईल आणि तिथल्या कठीण परिस्थितीत कसं राहता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नासाने एक प्रयोग केला.

    अमेरिकेतल्या टेक्सास राज्यामध्ये ह्यूस्टनमधल्या नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये मंगळ ग्रहासारखंच वातावरण आणि भूभाग असणारी फॅसिलिटी - कृत्रिम मंगळ ग्रह तयार करण्यात आला आणि नासाचे 4 संशोधक तिथे वर्षभर राहिले.
    या काळात या वैज्ञानिकांनी नक्की काय केलं?
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
    रिपोर्ट - टीम बीबीसी
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - शरद बढे

    5 min
  • मेंदू पोखरणारा अमिबा काय आहे? BBC News Marathi

    केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत 3 मुलांचा मृत्यू ब्रेन इटिंग अमिबा म्हणजेच मेंदू पोखरणाऱ्या अमिबाच्या संसर्गामुळे झाला आहे. हा अमिबा कोणता आहे? आणि त्याचा संसर्ग कसा आणि कधी होऊ शकतो? असं झाल्यास मृत्यू अटळ आहे का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - शरद बढे

    4 min
  • Epilepsy वर उपचारांसाठी कवटीवर इम्प्लांट लावणं कितपत यशस्वी? BBC News Marathi

    एपिलेप्सीचा गंभीर त्रास असणाऱ्या मुलाच्या कवटीमध्ये फीट नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच एक उपकरण बसवण्यात आलंय. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार. या आजारात Seizures येतात. म्हणजे फीट किंवा आकडी येणं. यालाच मिर्गी असंही म्हणतात. कवटीमध्ये बसवण्यात आलेला हा न्यूरोसिम्युलेटर मेंदूच्या आतवर इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवेल. ओरान नॉल्सनला दिवसा येणाऱ्या फीटचं प्रमाण यामुळे 80 टक्क्यांपर्यंत कमी झालंय, तो आता अधिक आनंदात असून आयुष्य अधिक चांगल्यारीतीने जगू शकत असल्याचं त्याची आई जस्टिन यांनी सांगितलंय.

    कसं आहे हे उपकरण? ते काम कसं करतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - फर्गस वॉल्श
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे

    6 min
  • युकेमध्ये सत्तापालट: ऋषी सुनक पराभूत, किएर स्टार्मर पंतप्रधान का होणार? BBC News Marathi

    युकेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव करत लेबर पार्टी तब्बल 14 वर्षांनी सत्तेत आलीय. सर किएर स्टार्मर युकेचे नवे पंतप्रधान असतील. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या पराभवाची कारणं काय आहेत? आणि मजूर पक्ष सत्तेत आल्याचा भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट - झुबैर अहमद
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे

    6 min
  • शेअर बाजारात अचानक इतकी तेजी का आली? BBC News Marathi

    3 जुलै 2024 ला मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स निर्देशांकाने 80,000 ची पातळी ओलांडली. सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी सर्वाधिक घसरण झालेला शेअर बाजार महिन्याभराच्या काळात उच्चांकी पातळीवर कसा पोहोचला? स्टॉक मार्केटच्या या घोडदौडीमागे काय कारणं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - शरद बढे

    5 min
  • लोकसभेत माईकचं नियंत्रण कुणाच्या हाती असतं? BBC News Marathi

    लोकसभेत आपण बोलत असताना आपला माईक बंद करण्यात आल्याचा आक्षेप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याला उत्तरही दिलं. सदनामध्ये विरोधकांचे माईक्स बंद करण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधकांनी केलेला आहे. विरोधक भाषण करत असताना त्यांच्या चेहरा टीव्हीवर फारसा दाखवत नसल्याचा आरोपही करण्यात आलेला होता.

    संसदेच्या सभागृहातील माईक आणि कॅमेरा यावर नियंत्रण कुणाचं? विरोधकांची गळचेपी करण्यासाठी या गोष्टी वापरल्या जातायत का? अध्यक्ष आणि विरोधक याबद्दल काय म्हणतायत? यापूर्वी असं घडलं होतं का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट - बीबीसी मराठी

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,591 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,039 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,515 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,800 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,031 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,994 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

721 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners