
Sign up to save your podcasts
Or


31 जुलैला राजधानी दिल्लीमध्ये काही तासांत 228 मिलीमीटर पाऊस पडला. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं, घरांमध्ये शिरलं. मुंबईमध्येही अनेक भागांत 21 जुलैला दोन तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आणि पाणी साचलं.
कमी काळामध्ये असा धो - धो पाऊस पडण्याचं प्रमाण का वाढलंय?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - जान्हवी मुळे, अमृता दुर्वे
ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या शार्क्सच्या शरीरात कोकेनचे अंश कसे सापडले याचा तपास सध्या संशोधक करतायत.
रिओ दी जानेरोच्या किनारपट्टीजवळच्या 13 शार्कची तपासणी ओस्वाल्ड क्रूझ फाऊंडेशनच्या जीवसंशोधकांनी केली आणि त्यात त्यांना या शार्क्सचे स्नायू आणि यकृतात मोठ्या प्रमाणात कोकेन सापडलं.
पहिल्यांदाच असं शार्क्सच्या शरीरात कोकेन सापडलंय आणि इतर समुद्रीय प्राण्यांत आढळलेल्या कोकेनपेक्षा हे प्रमाण 100 पटींनी अधिक आहे. आणखी काय सांगतं हे संशोधन?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - फिलीप सुझा आणि लिअँड्रो मचाडो
हिजबुल्लाहने गोलन हाईट्सवर डागलेल्या रॉकेटमुळे 12 मुलं आणि तरुणांचा जीव गेल्याचं इस्रायलने म्हटलंय. गेले नऊ महिने इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये दररोजच्या चकमकी सुरू आहेत. हिजबुल्लाहवर अनेक वर्षांपासून बॉम्बस्फोट तसंच इस्रायल आणि अमेरिकन तळांवर लक्ष्य करणारे कट रचल्याचा आरोप आहे. पाश्चात्य देश, इस्रायल, अरब आखाती देश आणि अरब लीग हिजबुल्लाहला 'दहशतवादी' संघटना मानतात. हिजबुल्लाह नेमके कोण आहेत? लेबनॉन - इराण - इस्रायल या समीकरणात हिजबुल्लाहची काय भूमिका आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास असणाऱ्या फ्रिज टोपी ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा मॅस्कॉट म्हणजेच बोधचिन्ह आहे. एखादा प्राणी द्योतक न करता या टोपीची निवड का करण्यात आली? ही टोपी कशाची खूण आहे? इतिहासात असं काय घडलं होतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
अर्थसंकल्पामध्ये टॅक्सचे स्लॅब्स बदलले, तुमच्यातल्या काही लोकांना कदाचित याचा फायदा होईल. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स मध्ये बदल केल्याचंही तुम्ही वाचलं - ऐकलं असेल. पण या बजेटमध्ये आणखी एक बदल झालाय, ज्याचा परिणाम तुम्ही घर विकत असताना होणार आहे आणि त्यासाठी 2001 हे वर्षं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मालकीचं घर विकलंत, तर तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागणार का, हे या 2001 वर अवलंबून असेल.
काय बदललंय नेमकं...जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाला वेगवेगळे कंगोरे आहेत. लोकसभा निवडणुकीत जे जे मुद्दे महत्वाचे ठरले त्या मुद्द्यांशी संबंधित घटकांविषयी घोषणा करण्याची विशेष काळजी या अर्थसंकल्पात घेतल्याचं दिसतंय. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आले होते. त्याचे पडसाद या बजेटमध्ये कसे पहायला मिळाले...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं अखेर जाहीर केलं. त्यांनी हा निर्णय घ्यावा असं आवाहन अनेकांकडून गेल्या काही आठवड्यांमध्ये करण्यात आलं होतं. बायडन हे आता त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करतील. राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाद्वारे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यासही त्यांनी समर्थन जाहीर केलंय.
डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन महिन्याभरावर आलेलं असताना बायडन यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला आता एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जो बायडन यांनी जाहीर केल्यानंतर आता पुढे काय होईल?
गुजरात राज्यात आतापर्यंत चांदीपुरा व्हायरसचे 12 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं गुजरात सरकारने म्हटलंय. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासासाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजीकडे (NIV) पाठवण्यात आलेयत. 1965 साली नागपुरातल्या एका परिसरातल्या रुग्णांच्या रक्तामध्ये एक व्हायरस आढळला.
लेखन - अमृता दुर्वे
पृथ्वीचा केंद्रबिंदू जमिनीपासून साधारण 5000 किमी खोल आहे. त्यापैकी 12 किमी खोल भागाबद्दलच आपल्याला माहिती मिळाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसने शोध लावला आहे की, पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत विरुद्ध दिशेला फिरतो.
वैज्ञानिकांच्या एका टीमच्या असं लक्षात आलं आहे की, पृथ्वीच्या गाभ्याचा परिवलनाचा वेग 2010 पासून म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून कमी झाला आहे. आता या परस्पर विरोधी दिशांना फिरण्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
निवेदन - सिद्धनाथ गानू
वैज्ञानिकांना पहिल्यांदाच चंद्रावर गुहा सापडली आहे. किमान 100 मीटर खोली असणारी ही गुहा कदाचित माणसांना राहण्यासाठी योग्य असू शकते.
कशी आहे ही चंद्रावरची गुहा? ती किती मोठी आहे? कोणी आणि कशी शोधली ?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - जॉर्जिना रेनार्ड
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,591 Listeners

1,039 Listeners

5,515 Listeners

1,805 Listeners

1,800 Listeners

1,031 Listeners

1,994 Listeners

3,223 Listeners

721 Listeners

1,006 Listeners

1 Listeners