
Sign up to save your podcasts
Or


7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापासून इस्रायलने गाझाला लक्ष्य केलं आणि हमासविरोधात कारवाया तीव्र केल्या. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात इस्रायली सैन्याने वेस्ट बँक भागावर मोठा हल्ला चढवला. इथला बराचसा प्रदेश आधीपासूनच इस्रायलच्याच ताब्यात आहे.
रिपोर्ट - टीम बीबीसी
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन गेलेलं बोईंग स्टारलायनर अंतराळ यान आता या दोन अंतराळवीरांशिवायच पृथ्वीवर परतणार आहे. या यानात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ते अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येण्यासाठी सुरक्षित आहे का, याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर हे दोन अंतराळवीर आणखी काही महिने स्पेस स्टेशनलाच मुक्काम करून स्पेस एक्सच्या यानाने परततील, असं नासाने जाहीर केलं. आता बोईंग स्टारलायनर यान परतीचा प्रवास मानवरहित करणार आहे. बोईंग स्टारलायनर पृथ्वीवर कधी आणि कसं परतेल? बोईंगसाठी हे महत्त्वाचं का आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
पावसाचा अंदाज वर्तवताना त्यामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचा नेहमी उल्लेख होतो. काय असतो हा कमी दाबाचा पट्टा? त्याचा पाऊस पडण्याशी काय संबंध असतो?
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
रिलायन्स आणि डिस्नी इंडिया यांच्या विलिनीकरणला मान्यता मिळाल्याने भारतातल्या मीडिया इंडस्ट्रीतली अनेक गणितं बदलणार आहेत.
विलिनीकरणातून तयार होणारी कंपनी ही 70,350 कोटी रुपयांचं मूल्यांकन - Valuation असणारी भारतातली मीडिया क्षेत्रातली अवाढव्य कंपनी असेल. आणि या नवीन कंपनीच्या वाढीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज यात रु.11,500 कोटींची गुंतवणूक करेल.
नेमका कोणता करार झालाय रिलायन्स आणि डिस्ने मध्ये? Jio Cinema आणि Disney+ Hotstar हे दोन्ही OTT प्लॅटफॉर्म एकत्र होणार का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
नासाच्या संशोधकांना मंगळावर पृष्ठभागाखाली खोल पाण्याचे साठे सापडले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाणी असेल तर त्यामुळे मंगळावर पृष्ठभागाखाली जीवसृष्टी असण्याची शक्यताही निर्माण होते. पृथ्वीवर पृष्ठभागाखाली एक प्रचंड मोठं जैविक विश्व असल्याचं गेल्या काही दशकांमध्ये अभ्यासातून समोर आलंय आणि मंगळावरही कदाचित हीच परिस्थिती असू शकते. मंगळावर जीवसृष्टी असलीच तर ती पृष्ठभागाखाली असण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट - मायकल मार्शल
लहान कर्जं घेणाऱ्या, ग्रामीण भागातल्या ग्राहकांना कर्ज मिळणं सोपं जावं म्हणून रिझर्व्ह बँक एका नवीन प्रणालीवर काम करत असल्याचं RBI चे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केलंय. Unified Lending Interface. Lending म्हणजे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी - सुरळीत करण्यासाठीची ही प्रणाली आहे. गेल्यावर्षी या ULI ची चाचणी सुरू करण्यात आली आणि त्यातल्या निष्कर्षांवरून ही प्रणाली देशभरात लाँच कधी करायची, हे रिझर्व्ह बँक ठरवेल. ही नवी प्रणाली कशासाठी आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
केंद्र सरकारने UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलीय. जुनी पेन्शन योजना (Old pension Scheme) पुन्हा लागू करावी यासाठी काही राज्यांत आंदोलनं झाली, काही राज्यांनी ही Old Pension Scheme लागू केली. आणि अचानक ही नवीन - एकीकृत पेन्शन योजना जाहीर झाली. युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे? जुनी पेन्शन योजना म्हणजेच Old Pension Scheme आणि NPS पेक्षा यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत?
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
चंद्रावर पाणी आहे का, बर्फ आहे का अशी अनेक कोडी उलगडण्याचा प्रयत्न गेला बराच काळ सुरू आहे. पण आता चंद्रावर वितळलेल्या लाव्हाचा समुद्र होता का याचं काही प्रमाणात उत्तर मिळालेलं दिसतंय. भारताच्या चंद्रयान 3 ने चंद्राची जमीन कशी तयार झाली याबाबत महत्त्वाचा शोध लावलाय. त्याबद्दलच जाणून घेऊया, आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - जॉर्जिना रन्नार्ड, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाले.
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये मान्यता मिळालेली औषधं आता भारतात चाचण्या झाल्या नसल्या, तरी मिळू शकणार आहेत. औषध कंपन्यांची भारतातील नियामक - ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने आता एका महत्त्वाच्या ऑर्डरद्वारे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली औषधं भारतात येण्याचा मार्ग मोकळा केलाय. एखाद्या औषधाला जगात इतरत्र मान्यता मिळालेली असली, तरी आतापर्यंत भारतामध्ये क्लिनिकल टेस्टिंग करून, मान्यता मिळाल्यानंतरच हे औषध फार्मा कंपन्यांना भारतामध्ये विकता येत होतं. पण ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने काही विशिष्ट आजार आणि उद्दिष्टांसाठीच्या औषधांच्या भारतातल्या विक्रीच्या नियमांत बदल केले आहेत.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,591 Listeners

1,039 Listeners

5,515 Listeners

1,805 Listeners

1,800 Listeners

1,031 Listeners

1,994 Listeners

3,223 Listeners

721 Listeners

1,006 Listeners

1 Listeners