सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठीचं 'मिशन मौसम' काय आहे? BBC News Marathi

    11 सप्टेंबरला कॅबिनेटने मिशन मौसम नावाच्या योजनेची घोषणा केली. 5 वर्षांमध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवलं जाईल.

    यासाठी पुढच्या दोन वर्षांत 2000 कोटींचा निधी दिला जाणार आहे. Ministry of Earth Science - म्हणजेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या मिशन मौसमद्वारे हवामानाबद्दल काम करणाऱ्या देशातल्या 3 मोठ्या संस्थांमधल्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार आहे. India Meteorological Department (IMD) म्हणजेच हवामान खातं, National Centre for Medium Range Weather Forecasting म्हणजे शेतीसाठी फायदयाचा मध्यम पल्ल्याचा राष्ट्रीय हवामान अंदाज मांडणारी संस्था आणि Indian Institute of Tropical Meteorology (IITM) म्हणजे भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विज्ञान संस्थान या तीन संस्थांमध्ये हवामान अभ्यासासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान या मिशन मौसमद्वारे आधुनिक करण्यात येईल.

    लेखन, निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

    उपग्रह आधारित नव्या टोल आकारणीमुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि कोंडी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून GNSS आधारित टोलची अंमलबजावणी होण्याचा अंदाज आहे आणि कालांतराने ही यंत्रणा Fastag ची जागा घेईल आणि Fastags बंद होतील.

    कदाचित यापुढे टोलनाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला टोलची ठराविक रक्कम भरावी न लागता तुम्ही जितका प्रवास केलाय तेवढ्यासाठीच पैसे भरावे लागतील.टोल आकारणीसाठी येऊ घातलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टीम - GNSS हे होऊ शकतं.

    काय आहे GNSS ...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - शरद बढे

    6 min
  • इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर राहतात कसे? जेवतात, झोपतात कसे? BBC News Marathi

    पृथ्वीपासून 400 किलोमीटर्स दूरच्या उंचीवर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात - झोपतात कसे? व्यायाम कसे करतात? कपडे धुतात का? आणि...अंतराळस्थानकात वास असतो का कसला?

    इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अंतराळवीरांचं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्यासाठी पहा, हा व्हीडिओ

    रिपोर्ट : जॉर्जिना रेनर्ड

    निवेदन : सिद्धनाथ गानू
    एडिटिंग : अरविंद पारेकर

    7 min
  • डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस US निवडणुकीतले 9 महत्त्वाचे मुद्दे | BBC News Marathi

    5 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्याच्या डेमोक्रॅटिक उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चढाओढ आहे.

    कोणते मुद्दे आहेत जे अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये महत्त्वाचे ठरतायत? आणि त्याबद्दल राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांची मतं काय आहेत?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - शरद बढे

    7 min
  • स्पेसएक्स पोलारिस डॉन मिशन काय आहे? अंतराळ पर्यटन सुरू होणार? BBC News Marathi

    खासगी पैशांतून स्पेसवॉकसाठी स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने 10 सप्टेंबरला झेप घेतली. अब्जाधीश जेरर्ड आयझॅकमन हे अंतराळवीर नसूनही स्पेसवॉक करणारे पहिले व्यक्ती ठरण्याची शक्यता आहे.

    या मोहीमेचं नावं आहे पोलारिस डॉन. जेरर्ड आयझॅकमन यांच्या Shift4 या उद्योगाने निधी दिलेल्या तीन अंतराळ मोहीमांपैकी ही पहिली मोहीम आहे. फाल्कन 9 च्या या पोलारिस डॉन मोहीमेत जेरर्ड आयझॅकमन यांच्यासोबत त्यांचा जवळचा मित्र असणारे निवृत्त एअर फोर्स पायलट स्कॉट 'किड' पोटीट आणि स्पेस एक्सचे दोन इंजिनियर्स अॅना मेनन आणि सारा गिलीस सहभागी आहेत. अंतराळात जाणाऱ्या या यानाचं नाव आहे रिझीलियन्स (Resilience). हे अंतराळयान या चार प्रवाशांना पृथ्वीपासून तब्बल 1400 किलोमीटर्स (870 मैल) उंचीवर घेऊन जाईल. यापूर्वी 1970च्या दशकामध्ये नासाच्या अपोलो अंतराळ मोहीमांमधली यानं इतक्या उंचीवर अंतराळवीरांना घेऊन गेली होती.
    कशी होणार आहे ही मोहीम? यादरम्यान कोणते प्रयोग करण्यात येणार आहेत?
    रिपोर्ट - पल्लब घोष
    निवेदन - गुलशन वनकर
    एडिटिंग - शरद बढे

    7 min
  • स्लीप प्निया म्हणजे काय? या आजारातले धोके काय आहेत?

    Sleep Apnea म्हणजे झोपेमध्ये श्वसनक्रियेत अडथळा येऊन श्वास थांबणं. यात मेंदू सतर्क होऊन आपल्याला जागं करतो आणि श्वासोच्छवास पुन्हा सुरू होतो. पण यामुळे शांत झोप लागत नाही. दीर्घकाळ असं झालं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. स्लीप अॅप्नियाची लक्षणं कोणती? याचे धोके कोणते आहेत? आणि यावर उपचार काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • शत्रू संपत्ती कायदा म्हणजे काय ज्याद्वारे जनरल मुशर्रफ यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला? BBC News Marathi

    पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशरर्फ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या उत्तर प्रदेशच्या बागपतमधल्या जमिनीचा लिलाव नुकताच शत्रू संपत्ती कायद्यानुसार करण्यात आला.

    पण हा शत्रू संपत्ती कायदा काय आहे? यामध्ये कोणत्या संपत्तीचा समावेश होतो? आणि ती कधी विकता येते?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - शरद बढे

    5 min
  • डोळ्यांत ड्रॉप्स टाकून चष्मा जाऊ शकतो का? हे ड्रॉप्स किती सुरक्षित आहेत? BBC News Marathi

    एका नवीन औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI ने मान्यता दिलीय. हे आहेत PresVu नावाचे डोळ्यांत टाकायचे ड्रॉप्स. जवळचं वाचण्यासाठी चष्मा वापरावा लागणाऱ्यांना या आयड्रॉप्समुळे दिलासा मिळू शकतो.

    पण काय आहेत हे PresVu आयड्रॉप्स? त्यात नेमकं काय आहे? याचा खरंच फायदा होतो का? आणि या ड्रॉप्सचा वापर किती सुरक्षित आहेत?

    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये...

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    7 min
  • जगातल्या 99% जनतेला होतोय या गोष्टीचा त्रास | BBC News Marathi

    जगामध्ये अशी एक गोष्ट आहे जिचा जगभरातल्या 99% जनतेला त्रास होतोय... आणि दरवर्षी जवळपास 40 लाख लोक याला बळी पडतात.

    ही गोष्ट आहे - वायू प्रदूषण - Air Pollution
    7 सप्टेंबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज म्हणून पाळण्याचं 2020 मध्ये युनायटेड नेशन्सने जाहीर केलं.
    हवेच्या प्रदूषणाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात? जगभरात यामुळे कोणते आजार भेडसावतायत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये आणलेलं अपराजिता विधेयक काय आहे? BBC News Marathi

    ममता बॅनर्जींनी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अपराजिता विधेयक आणलं आहे. कोलकात्यातल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा बलात्कार आणि खून झाल्यानंतर मोठी निदर्शनं झाली. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजिता नावाचं एक विधेयक मंजूर केलं. पण काय आहे हे विधेयक? समजून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - शरद बढे

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,591 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,039 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,515 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,800 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,031 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,994 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

721 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners