सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • US निवडणुकीत इलॉन मस्क, टेलर स्विफ्ट हे ट्रंप, कमला हॅरिस यांना जिंकवणार? BBC News Marathi

    प्रसिद्ध व्यक्तींकडून दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातली व्यक्ती, वस्तू, सेवा वा उत्पादनाविषयी सांगितलं जाणं वा त्याची जाहिरात करणं, ही पद्धत जगभर प्रचलित आहे. आणि हे राजकारणातही केलं जातं. म्हणजे भारतात होताना तर आपण पाहिलंच आहे.

    पण सध्या अमेरिकेत त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि तिथेही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या बाजूने अनेक सेलिब्रिटी मैदानात उतरलेयत. याचा ट्रम्प वा हॅरिस यांना किती फायदा होतोय?
    समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • महाराष्ट्रातून मान्सून परतला, पण अजूनही पाऊस का पडतोय? | BBC News Marathi

    देशातून मान्सून परतला, असं हवामान विभागाने 15 ऑक्टोबरला जाहीर केलं होतं. पण असं असलं तरी राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस भरपूर पाऊस पडलेला आहे.

    हा पाऊस कशामुळे पडतोय? हा अवकाळी पाऊस आहे का? राज्यात थंडी कधी येईल?
    समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    4 min
  • व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवायला पैसे लागत नाहीत, मग ते पैसे कसे कमवतं? | BBC News Marathi

    व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲप Meta य़ा कंपनीच्या मालकीचं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामही याच मेटा कंपनीच्या मालकीचे आहेत.

    व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. भारतामध्ये व्हॉट्सॲपचे दरमहा 50 कोटींपेक्षा अधिक ॲक्टिव्ह युजर्स आहेत. मग व्हॉट्सॲप पैसे कसे कमवतं?
    समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • NASA Europa Clipper निघालंय गुरू ग्रहाच्या चंद्रावरची जीवसृष्टी शोधायला | BBC News Marathi

    गुरू ग्रहाच्या (Jupiter) युरोपा (Europa) नावाच्या चंद्राच्या दिशेने नासाचं युरोपा क्लिपर (Europa Clipper) हे अंतराळ यान झेपावलंय.

    ही फक्त युरोपावर आयुष्याच्या खुणा शोधणारी ही मोहीम नाही. तर युरोपावर जीवसृष्टी निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे का, हे याद्वारे शोधलं जाईल.

    गुरूचा हा युरोपा नावाचा चंद्र कसा आहे? आणि त्याकडे जाणारं हे यान कसं आहे?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • THAAD: US इस्रायलला अँटी-मिसाईल सिस्टिम का देतंय? | BBC News Marathi

    1 ऑक्टोबरला इराणने इस्रायलवर 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं डागली होती. यातली बहुतेक आकाशातच नष्ट करण्यात आल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं होतं पण त्यातली अनेक मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये पडली. या हल्ल्याला अजून इस्रायलने प्रत्युत्तर दिलेलं नाही. आणि आता इस्रायलला त्यांची हवाई हल्ल्यांपासूनची सुरक्षा वाढवण्यासाठी High Altitude Anti - Missile System म्हणजे अधिक उंचीवरून येणारी क्षेपणास्त्रं रोखणारी यंत्रणा आणि त्यासाठीचं लष्करी पथक पुरवणार असल्याचं अमेरिकेने जाहीर केलंय. अमेरिकेने इस्रायलला दिलेली Thaad मिसाईल रोधक यंत्रणा काय आहे? अमेरिकेने आता इस्रायलला अशी यंत्रणा का पुरवली आहे?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - टीम बीबीसी
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • खलिस्तानच्या मुद्द्यावरून 40 वर्षांपूर्वीही जेव्हा तणाव निर्माण झाला होता... | BBC News Marathi

    भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपल्या देशातील मुत्सद्द्यांना परतण्याचे आदेश दिले आहेत. पण या दोन देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. जस्टिन ट्रुडो यांचे वडील पिएर ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान असतानाही दोन देशांत तणाव निर्माण झाला होता.

    भारत - कॅनडा संबंधांमध्ये आजपर्यंत काय - काय घडलंय?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

    7 min
  • रूप कंवर: भारतातलं शेवटचं सती प्रकरण पुन्हा चर्चेत का आलंय? | BBC News Marathi

    राजस्थानच्या दिवरालामध्ये 4 सप्टेंबर 1987 रोजी 18 वर्षांची रूप कंवर तिच्या पतीच्या चितेवर सती गेली. आणि देशभर गदारोळ झाला. ती स्वतःहून सती गेली की तिला असं करण्यास भाग पडलं गेलं यावरून वाद झाले. याचे सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर पडसादही उमटले. भारतातलं हे सतीचं शेवटचं प्रकरण होतं. रूप कंवरच्या मृत्यूनंतर काय घडलं होतं? आता 37 वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा का चर्चेत आलंय?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • हे यान लघुग्रह पृथ्वीवर धडकण्यापासून वाचवेल | BBC News Marathi

    पृथ्वीच्या दिशेने जर एखादा लघुग्रह येत असेल तर तो पृथ्वीवर आदळण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, हे शोधणारं हेरा आंतरराष्ट्रीय मिशन नुकतंच झेपावलं. दोन वर्षं प्रवास करून हे यान Dimorphos नावाच्या एका अंतराळातल्या लघुग्रहापर्यंत पोहोचेल. हे यान काय करणार आहे? कोणत्या लघुग्रहाच्या दिशेने ते चाललंय?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. a

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • अंटार्क्टिकातली वाढणारी हिरवळ ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा का आहे? BBC News Marathi

    अंटार्क्टिकाचं हवामान पृथ्वीवरच्या इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा कोरडं, वादळी, बर्फाळ आणि थंड आहे. पण अंटार्क्टिकामधली वाढत जाणारी ही हिरवळ मात्र पृथ्वीसाठी धोक्याची घंटा आहे. अंटार्क्टिका प्रदेश हा पृथ्वीचा Thermostat म्हणजे तापमान नियंत्रक मानला जातो. आणि म्हणूनच या भागात होणारे हवामान बदलाचे परिणाम तुमच्या - आमच्या आयुष्यावरही परिणाम करणारे असतील.

    अंटार्क्टिकात नेमकी कोणती हिरवळ वाढली? त्याचे परिणाम काय होतील?

    आजची सोपी गोष्ट याचबद्दल

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं? BBC News Marathi

    जेफ्री हिंटन यांना 2024 साठीचं भौतिकशास्त्राचं नोबेल AI मध्ये पायाभूत संशोधन करणारे जॉन हॉपफील्ड यांच्यासोबत विभागून मिळालंय. जेफ्री हिंटन यांना AIचे जनक का म्हटलं जातं? आणि ज्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांचा इतका मोठा वाटा आहे, तेच त्यांना धोकादायक का वाटतं?

    आजची सोपी गोष्ट याचबद्दल

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,582 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,040 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,510 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,803 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,026 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,992 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

720 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,007 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners