सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • डाएटमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली पत्नी नवज्योत कौर कॅन्सरमधून पूर्णपणे बरी झाल्याचं जाहीर केलं. हे सगळं पत्नीने पाळलेल्या एका विशेष डाएटमुळे झालं, असा दावा सिद्धू यांनी केलाय. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

    'आपल्या पत्नीची कॅन्सरसाठीची ट्रीटमेंट सुरू होती, किमोथेरपी - रेडिएशन करण्यात आलं होतं, पण बायको वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं, पण डाएटच्या जोरावर तिचा स्टेज 4 कॅन्सर पूर्ण बरा झाला,' असा दावा सिद्धू यांनी केलाय. फक्त डाएटच्या जोरावर कॅन्सर बरा होऊ शकतो का? सिद्धू यांनी म्हटल्याप्रमाणे हळद, कडुनिंब, तुळशी हे कॅन्सरसाठी मारक ठरू शकतात का?

    पाहा सोपी गोष्ट

    रिपोर्ट : टीम बीबीसी

    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : अरविंद पारेकर

    7 min
  • गौतम अदानींनी भारतात लाच दिल्याचा आरोप, अमेरिका कारवाई का करतंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    गौतम अदानींच्या नावे न्यूयॉर्कच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. अझुर पॉवर (Azure Power) आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. SECI सोबतचा करार व्हावा म्हणून लाच देण्याची योजना आखल्याचा आरोप अदानींवर करण्यात आलाय.अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने कर्ज आणि बाँड्सद्वारे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून 3 अब्ज डॉलर्स उभे केले. आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकन गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारताना अदानींनी आपल्या कंपनीच्या लाचविरोधी धोरणांविषयी चुकीची आणि फसवी माहिती दिल्याचाही आरोप अमेरिकेने केलाय. अमेरिकन गुंतवणूकदारांच्या जोरावर हे सगळं करण्यात आलं, असंही अमेरिकेने म्हटलंय.

    पहा सोपी गोष्ट

    रिपोर्ट : टीम बीबीसी

    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : निलेश भोसले

    7 min
  • गृह कर्जाचं गणित नेमकं कसं असतं? कर्ज लवकर कसं फेडायचं? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    घर विकत घेण्यासाठी घेण्यात येणारं कर्ज म्हणजे होमलोन. हे गृहकर्ज घेताना अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? गृहकर्जाचा हप्ता कसा मोजला जातो? आपल्यासाठी योग्य कालावधी कसा ठरवायचा?

    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

    एडिटिंग : निलेश भोसले

    6 min
  • रशियात हल्ले करायला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रं वापरण्याची परवानगी, युक्रेनला काय फायदा होईल? BBC News Marathi | सोपी गोष्ट

    रशियाविरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनला अमेरिका, युकेसारख्या देशांचं पाठबळ मिळतंय. पण आता त्यांना या देशांकडून देण्यात आलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं रशियाच्या भूमीत हल्ला करण्यासाठी वापरता येणार आहेत. शिवाय अमेरिका युक्रेनला Landmines म्हणजे भू सुरुंग पुरवणार आहे.

    यामुळे युद्धामधली बाजी युक्रेन पलटवू शकेल का? जो बायडन यांच्याजागी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काय होईल?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट : टीम बीबीसी

    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : निलेश भोसले

    6 min
  • एक्झिट पोल्सचे अंदाज का चुकतात? ते कसे केले जातात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    निवडणुकीसाठीचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे झळकायला लागतात. विविध संस्थांनी केलेल्या या पाहण्यांच्या अंदाजात अनेकदा मोठी तफावत असते. तर प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरही एक्झिट पोल्सनी मांडलेले अंदाज चुकल्याचं लक्षात येतं. असं का होतं? एक्झिट पोल्स कसे करतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट : टीम बीबीसी

    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : निलेश भोसले

    6 min
  • समुद्राखाली ज्वालामुखी कसा काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    समुद्राखालीही ज्वालामुखी आहेत - हे तुम्हाला माहित्येय का? यातले काही सक्रीय आहेत. तर काही निद्रिस्त आहेत. संशोधकांना आर्क्टिक समुद्राच्या तळाशी एक प्रचंड मोठा ज्वालामुखी सापडलाय. अमेरिकन कोस्ट गार्डच्या icebraker हीली (Healy) या जहाजावरच्या संशोधकांच्या क्रू ला हा शोध लागलाय.

    जाणून घेऊयात याच ज्वालामुखीबद्दल आजच्या सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

    एडिटिंग : अरविंद पारेकर

    5 min
  • मुलांच्या वाढीवर जातीचा कसा परिणाम होतोय? BBC News Marathi

    लहान मुलांची उंची त्यांच्या वयासाठी अपेक्षित उंचीइतकी नसेल, तर याला Stunting - वाढ खुंटणं म्हटलं जातं. पुरेसं पोषण मिळत नसल्याची ही खूण असल्याचं मानलं जातं. भारतामध्ये आणि आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडच्या देशांमध्ये - म्हणजे Sub Saharan Africa भागामध्ये लहान मुलांची वाढ अशी खुंटण्याचं प्रमाण अधिक आहे. भारतातलं हे प्रमाण सहारा वाळवंटाखालच्या आफ्रिकन देशांपेक्षाही अधिक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असल्या तरी सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतोय - जातीभेद. जातीचा परिणाम लहान मुलांच्या वाढीवर होतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट : सौतिक बिस्वास

    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,582 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,040 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,510 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,803 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,026 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,992 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

720 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,007 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners