सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • क्रेडिट कार्डचं बिल कसं भरताना काय खबरदारी घ्यायची? BBC News Marathi

    क्रेडिट कार्डच्या वापराबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. हे कार्ड वापरण्यात खरंच खूप धोके आहेत का? त्याचा वापर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? रोजच्या व्यवहारात क्रेडिट कार्ड वापरून आपला काही फायदादेखील होऊ शकतो का?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट : टीम बीबीसी

    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

    6 min
  • डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे रुपया घसरला? महागाई वाढणार का? BBC News Marathi

    गेल्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरामध्ये मोठी घसरण होत, रुपयाने निचांक गाठलाय. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्याने रुपयाच्या दरावर त्याचा काय परिणाम झालाय? आणि या गोष्टीचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

    एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

    5 min
  • सुनीता विल्यम्स यांची अंतराळात तब्येत बिघडतेय का? BBC News marathi

    इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या एका फोटोवरून जगभरातल्या लोकांना सुनीता विल्यम्स यांच्या तब्येतीची काळजी वाटली. बोईंग स्टारलायनरमधून 8 दिवसांच्या चाचणी मोहीमेसाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे स्टारलायनरमधल्या बिघाडांमुळे अंतराळ स्थानकातच अडकले. प्रवाशांना परत घेऊन येण्यासाठी स्टारलायनर सुरक्षित न ठरल्याने सप्टेंबर 2024 मध्ये हे यान रिकामंच पृथ्वीवर परत आणलं गेलं. फेब्रुवारी 2024 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेस एक्स्च्या यानाने पृथ्वीवर परततील.

    अंतराळातल्या या प्रदीर्घ वास्तव्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो? सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावरही असेच परिणाम पहायला मिळतायत का?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

    6 min
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा हवामान बदल रोखण्याच्या प्रयत्नांवर काय परिणाम होईल? सोपी गोष्ट BBC News Marathi

    डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाल्याने हवामान बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदल हा एक भ्रम, स्कॅम असल्याचं यापूर्वी म्हटलं होतं. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेचा पॅरिस करारातला सहभाग काढून घेतला होता. यावेळीही ते बाहेर पडतील अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. ट्रम्प यांच्या विजयामुळे काय आणि कसे परिणाम होऊ शकतात? जगभरातल्या पर्यावरण तज्ज्ञांना ही भीती का वाटतेय?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • बिटकॉईनचा शोध लावणाऱ्या सातोशी नाकामोटोंचं गूढ! सोपी गोष्ट BBC News Marathi

    जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बिटकॉईनचं स्थान महत्त्वाचं आहे. अब्जावधींचं मूल्य असणाऱ्या बिटकॉईनचा शोध लावणारी व्यक्ती - सातोशी नाकामोटो, नेमकी कोण आहे, हे अजूनही जगाला माहिती नाही. ही व्यक्ती कशी दिसते, किती वयाची आहे हे स्पष्ट झालं नाही. आजवर अनेकांनी आपणच सातोशी नाकामोटो असल्याचा दावा केलाय. पण हे दावे खरे ठरलेले नाहीत. काय अजून माहिती आहे या सातोशी नाकामोटोंबद्दल...

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • डेंग्यू, झिका या रोगांचा प्रसार ही अचाट पद्धत रोखेल? BBC News Marathi

    डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू, यलो फीव्हर आणि झिकासारख्या आजारांना रोखण्यासाठी संशोधकांनी एक अनोखा मार्ग शोधून काढलाय. नर डासांना बधीर केल्यास त्यांचं मादीसोबत मिलन होऊ शकत नाही आणि परिणामी पैदास होत नसल्याचं संशोधनात आढळलंय. कोणत्या प्रजातीच्या डासांवर हे संशोधन करण्यात आलं? आणि ऐकण्याची क्षमता डासांसाठी इतकी महत्त्वाची का आहे?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट - मिशेल रॉबर्ट्स

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    4 min
  • इस्रोने लेहमध्ये सुरू केलेलं ॲनालॉग स्पेस मिशन काय आहे? BBC News Marathi

    इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने (ISRO) भारताचं पहिलं अॅनालॉग स्पेस मिशन (Analog Space Mission) लेहमध्ये सुरू करत असल्याचं जाहीर केलंय.

    भविष्यातल्या अंतराळ मोहीमांसाठीची तयारी म्हणूनच पृथ्वीवर करण्यात येणारी ही तयारी असते. ह्यूमन स्पेसफ्लाईट सेंटर, इस्रो, AAKA स्पेस स्टुडियो, युनिव्हर्सिटी ऑफ लडाख, IIT मुंबई या सगळ्यांनी मिळून आणि लडाख अटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या मदतीने या मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.
    ॲनालॉग स्पेस मिशन काय आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - निलेश भोसले

    5 min
  • सोपी गोष्ट: 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट होतेय, हा फोन कट करू नका नाहीतर...'

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या ताज्या ‘मन की बात’मध्ये डिजिटल अरेस्टचा उल्लेख केला. आपण पोलीस वा तपास अधिकारी असल्याचं भासवत एखाद्या व्यक्तीला वेठीला धरून पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. डिजीटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? खरंच पोलीस असं कुणाला डिजिटल अरेस्ट करू शकतात का? फ्रॉडचा हा नवा प्रकार काय आहे? त्यापासून सावध कसं रहायचं? आजची सोपी गोष्ट याचबद्दल.

    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धांमधून हे 9 खेळ का वगळण्यात आले? | BBC News Marathi

    कॉमनवेल्थ ही जगभरातल्या देशांची संघटना आहे ज्यातल्या देशांचा ब्रिटीश साम्राज्याशी ऐतिहासिक संबंध आहे वा होता. युनायटेड किंग्डमसह या कॉमनवेल्थमध्ये 54 देश आहेत.

    राष्ट्रकुल स्पर्धा 1930 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात आणि यामध्ये वेगवेगळ्या खेळांचा समावेश असतो. 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगोमध्ये होणार आहेत. आणि हे आयोजन करताना आयोजकांनी 19 पैकी तब्बल 9 खेळ वगळले आहेत.असं का करण्यात आलं?
    भारतीय अॅथलीट्सची यावर प्रतिक्रिया काय आहे? आणि मुळात कॉमनवेल्थ स्पर्धा आता गरजेच्या आहेत का? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • इलॉन मस्क आणि मुकेश अंबानी यांच्यात भारतातल्या इंटरनेटसाठी चढाओढ का? | BBC News Marathi

    भारत ही इंटरनेट क्षेत्रासाठी जगातली एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि भारतातल्या सॅटलाईट ब्रॉडबँड मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सध्या जगातल्या दोन सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये चढाओढ सुरू आहे.

    या दोन व्यक्ती आहेत टेस्ला, एक्स, स्पेस एक्स या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क आणि भारतीय अब्जाधीश, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक मुकेश अंबानी.
    मस्क आणि अंबानींमध्ये नेमकी कोणत्या क्षेत्रात चढाओढ सुरू आहे? हे क्षेत्र इतकं महत्त्वाचं का आहे?

    समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून

    रिपोर्ट - शौतिक बिस्वास

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

    8 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,591 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,039 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,515 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,800 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,031 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,994 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

721 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners