सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी ही 7 राज्यं ठरणार निर्णायक | BBC News Marathi

    अमेरिकेतल्या बहुतेक राज्यांचे कल हे दोनपैकी कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे हे गेल्या काही वर्षांतल्या निवडणुकांमधून स्पष्ट झालंय. रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने कल असणाऱ्या राज्यांना Red States म्हटलं जातं. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने असणाऱ्या पक्षांना Blue States म्हटलं जातं.

    पण जी राज्यं या दोनपैकी कुठल्याही बाजूने झुकू शकतात..किंवा फिरू शकतात, त्यांना Swing States म्हटलं जातं.
    ही राज्य कोणती आहेत? आणि या राज्यांमध्ये असं काय आहे की ज्यामुळे निवडणुकीचा निकाल फिरू शकतो?
    आजची सोपी गोष्ट याचबद्दल
    रिपोर्ट - टीम बीबीसी
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • इस्त्रायल - इराण संघर्षात जगातले कोणते देश कुणाच्या बाजूने?

    7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर एक मोठा - सुनियोजित हल्ला केला. तेव्हापासून इस्रायलचा गाझा पट्टीत हमाससोबत संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.यामुळा गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेलाय. लेबनॉनमधल्या हिजबुल्लासोबतच्या संघर्षाची तीव्रता एकीकडे वाढतेय. इस्रायलने जमीनवरूनही लेबनॉनवर हल्ला केलाय. असतानाच इराणने 1 ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागली. लेबनॉन - इस्रायल - इराण संघर्षात जगातले कोणते देश यापैकी कुणाच्या बाजूने आहेत?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min
  • माशीच्या मेंदूचा अभ्यास मानवी मेंदू समजून घेण्यासाठी कसा मदत करेल? BBC News Marathi

    माश्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. पण या माशा चालू शकतात, उडू शकतात, आणि नर माशी मादीला आकृष्ट करण्यासाठी गाणीही म्हणते... मुळातच लहानशा कीटकाच्या शरीरातला टाचणीपेक्षा लहान आकाराचा मेंदू हे सगळं करू शकतो. माशीच्या मेंदूचा अभ्यास करून पहिल्यांदाच या मेंदूतल्या जाळ्याचं चित्र प्रसिद्ध करण्यात आलंय आणि ही न्यूरोसायन्समधली मेंदूबद्दलच्या संशोधनातली प्रचंड मोठी घडामोड असल्याचं म्हटलं जातंय. माशीच्या मेंदूचा अभ्यास का केला? आणि त्याचा माणसाच्या मेंदूशी काय संबंध?

    आजची सोपी गोष्ट याचबद्दल
    रिपोर्ट - टीम बीबीसी
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • आदिवासी म्हणजे नेमकं कोण? धनगर - धनगड वाद काय आहे?

    राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय.

    सध्या धनगर समाजाचा समावेश भटक्या जमातीत होतो. पण आपल्याला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी या समाजाकडून केली जातेय. मात्र आदिवासी नेत्यांचा याला विरोध आहे.
    मग आदिवासी म्हणजे नेमकं कोण? कोणत्याही समुदायाला आदिवासी समूहात समाविष्ट करण्याचे निकष कोणते? भटक्या जमाती आणि आदिवासी यांच्यात फरक काय आहे?
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - गुलशन वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट: हिमालयातल्या नदीमुळे वाढतेय एव्हरेस्टची उंची?

    जगातलं सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टचीही उंची वाढतेय आणि अशी उंची वाढण्यामागचं कारण असू शकतं एक नदी. एव्हरेस्टची उंची जितकी असायला हवी, त्यापेक्षा 15 ते 50 मीटर्स जास्त आहे आणि अरुण नदीमुळे हे घडत असल्याची शक्यता असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. अरुण नदी कुठून वाहते? शिखरांची उंची वाढण्यात नदीचा काय संबंध? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट - टीम बीबीसी
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • संतोष हा हिंदी सिनेमा युकेची अधिकृत ऑस्कर एन्ट्री कसा ठरला? BBC News Marathi

    'लापता लेडीज' हा सिनेमा या वर्षी भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येतोय. पण यावर्षी ऑस्करच्या स्पर्धेत आणखी एक हिंदी सिनेमा आहे.

    आणि युनाटडेट किंग्डमची ऑफिशियल ऑस्कर एन्ट्री आहे. यावर्षी 'संतोष' हा सिनेमा त्यांची ऑस्करसाठीची ऑफिशियल एन्ट्री असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
    क हिंदी सिनेमा युकेकडून ऑस्करचा दावेदार कसा ठरतोय?
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट - अमृता दुर्वे

    निवेदन - गुलशन वनकर
    एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

    4 min
  • इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केलाय? हिजबुल्लाहने प्रत्युत्तर कसं दिलं? BBC News Marathi

    हिजबुल्लाह या सशस्त्र गटावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये एका दिवसात जवळपास 500 जण मारले गेले तर हजारो जखमी झाले. हा गेल्या काही दशकांमधला सर्वात भीषण हल्ला आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रॉकेट्स डागली.

    इस्रायलने लेबनॉनवर हा हल्ला का केला? यामुळे आता मोठ्या युद्धाची स्थिती निर्माण झालीय का?

    रिपोर्ट : टीम बीबीसी

    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : अरविंद पारेकर

    6 min
  • एन्काऊंटर म्हणजे काय? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला का? BBC News Marathi

    एन्काउन्टर म्हणजे काय? पोलीस दलात एन्काउन्टर स्पेशलिस्ट असं पद असतं का?

    बदलापुरातल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या ताब्यात असतानाच मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा एन्काउंटरची चर्चा तापली. एन्काउन्टर म्हणजे नेमकं काय? कायदा याबद्दल काय सांगतो? आणि यापूर्वीची कोणती एन्काऊन्टर्स चर्चेत आली होती?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

    एडिटिंग : अरविंद पारेकर

    7 min
  • पृथ्वीला दोन महिन्यांसाठी मिळणार दुसरा चिमुकला चंद्र | BBC News Marathi

    2024 PT5 नावाचा एक लघुग्रह (Asteroid) सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीचा Mini Moon म्हणजे लहानसा चंद्र बनेल.

    सप्टेंबरच्या अखेरपासून ते नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीला अजून एक छोटा चंद्र - Mini Moon मिळणार आहे. आपल्या चंद्राच्या सोबतीला येणारा हा चिमुकला चंद्र नेमका काय आहे? आणि तो दोनच महिने पृथ्वीच्या कक्षेत का असेल?

    रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

    एडिटिंग : अरविंद पारेकर

    5 min
  • प्रेग्नन्सीदरम्यान बदलतो मेंदू, संशोधनातून झालं सिद्ध | BBC News Marathi

    प्रेग्नन्सीच्या काळात विसराळूपणा वाढणं, गोंधळ होणं, अचानक ब्लँक होणं असं झाल्यास त्याला प्रेग्नन्सी ब्रेन किंवा बेबी ब्रेन म्हटलं जातं. पण ही फक्त एक संकल्पना नसून प्रेग्नन्सीच्या काळात मेंदूत खरंच बदल होतात, हे आता अभ्यासातून समोर आलंय.

    गर्भार राहण्यापूर्वी, गरोदरपणाच्या 9 महिन्यांच्या काळात आणि त्यानंतर मेंदूमध्ये काय बदल होतात याचा पहिल्यांदाच सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्यामध्ये हे बदल दिसून आले.

    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    रिपोर्ट : टीम बीबीसी

    निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : अरविंद पारेकर

    5 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,582 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,040 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,510 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,803 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,026 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,992 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

720 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,007 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners