
Sign up to save your podcasts
Or


दर महिन्याला पगारातून प्रॉव्हिडंट फंडची रक्कम कापली जाते. तितकीच रक्कम तुम्ही जिथे नोकरी करता ती कंपनी वा संस्थाही तुमच्या खात्यात भरत असते आणि त्यातून तुमच्या निवृत्तीच्या पेन्शनची तजवीज होते.
पेन्शनची ही रक्कम कशी मोजायची? EPF - म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? या EPFO चे नियम समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमधून
रिपोर्ट : टीम बीबीसी
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेले अंतराळवीर - सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं पृथ्वीवर परतणं पुन्हा लांबणीवर गेलंय. जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या मोहीमेसाठी बोईंग स्टारलायनरमधून गेलेले अंतराळवीर बोईंगच्या यानातल्या तांत्रिक अडचणींमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्येच अडकले आहेत. फेब्रुवारी 2025 हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील असं नासाकडून यापूर्वी सांगण्यात आलं होतं. पण आता या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी जाणाऱ्या यानाचा लाँच पुढे गेलाय.
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
नीलकमल बोटीला अपघात झाला त्यावेळी बचावासाठीच्या कोणत्याही पूर्वसूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, कोणीही लाईफजॅकेट घातलं नव्हतं, बोट बुडायला लागल्यावर जॅकेट्स घातली असं या अपघातातून बचावलेल्यांनी सांगितलंय.
बोटींच्या सुरक्षिततेसाठी काय नियम आहेत? त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची? पाहा, आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
मोबाईल फोनसाठीची ऍक्सेसरी म्हणून सुरुवातीला बाजारात आलेली Wearable Technology म्हणजे तुम्ही अंगावर घालून फिरू शकता अशा गॅजेट्समध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. फिटनेस बँड्स, वॉचेस आणि आता अगदी रिंग्स बाजारात आहेत.
ही टेक्नॉलॉजी काही प्रमाणात फायद्याची ठरतेय. पण यामुळे काही वेगळ्याच गंभीर समस्याही उभ्या राहतायत. आजच्या सोपी गोष्टमध्ये समजून घेऊयात फिटनेस ट्रॅकर्स तुमच्यासाठी धोकादायक कसे ठरू शकतात... आणि त्यासाठी काय करायचं...
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
जीडीपीची ताजी आकडेवारी सांगते की जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा हा दर 5.4% वर आलाय. गेल्या सात तिमाहींमधला हा निचांकी दर आहे आणि रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 7 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा बराच कमी देखील आहे.
भारतीय अर्थव्यवस्था मंदावतेय का? काय कारणं आहेत यामागे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट : टीम बीबीसी
रिटायरमेंट प्लानिंग.. म्हणजे निवृत्तीनंतरची तजवीज... म्हणजे वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर आपल्याकडे किती पैसे असायला हवेत, पैशांचा नियमित स्त्रोत कुठून - कसा सुरू राहू शकतो वगैरे गोष्टी. तज्ज्ञांच्या मते तुम्ही नोकरी करायला सुरुवात करता, तेव्हाच रिटायरमेंट प्लानिंगला सुरुवात करायला हवी. यासाठी अनेक मार्ग आहेत. पण आज आपण जाणून घेऊ यासाठीचा एक मार्ग NPS - म्हणजे National Pension Scheme बद्दल आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - दिनेश उप्रेती
सुनीता विल्यम्स अंतराळात लेट्यूस उगवून पाहतायत. अंतराळात शेती करता येते का? अंतराळात शेती करून काय साध्य होणारे? यापूर्वी असा प्रयोग झालाय का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धाला आता सीरियात नवे वळण मिळाले आहे. असद कुटुंबाची 53 वर्षांपासून असलेली सत्ता उलथून टाकण्यात बंडखोरांना यश आले आहे. सशस्त्र बंडखोर गट हयात-तहरीर-अल-शामच्या नेतृत्त्वात असद सरकारविरोधात मोहीम सुरू झाली होती. एकापाठोपाठ एक अनेक शहरांवर या बंडखोर गटाने ताबा मिळवला.अवघ्या 11 दिवसांत 50 हून अधिक वर्षांची राजवट उद्ध्वस्त झाली. सीरियातील या घडामोडांनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या बदलाचे त्या देशावर, मध्य-पूर्वेतल्या भूभागावर तर परिणाम होतीलच पण सोबतच सीरियापासून 4000 किलोमीटरपेक्षा अधिक दूर असणाऱ्या भारतावर - विशेषतः काश्मीरवर या घडामोडींचे परिणाम होऊ शकतात.... पण कसे? काय आहे भारत - सीरिया संबंधांचा इतिहास? या दोन देशांमधले व्यापारी संबंध कसे आहेत? आणि असाद यांची सत्ता गेल्यानंतर आता पुढे काय?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरून कार कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. गुगल मॅप्सनुसार गाडी चालवत निघालेल्या या लोकांनी मॅपमध्ये दाखवलेला रस्ता निवडला आणि अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.
पहा सोपी गोष्ट
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
म्युच्युअल फंड म्हणजे काय? या म्युच्युअल फंडमध्ये कोणते प्रकार आहेत? त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये धोके कोणते आहेत?
रिपोर्ट : टीम बीबीसी
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,582 Listeners

1,040 Listeners

5,510 Listeners

1,803 Listeners

1,802 Listeners

1,026 Listeners

1,992 Listeners

3,223 Listeners

720 Listeners

1,007 Listeners

1 Listeners