सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • पाँझी स्कीम्स : फसव्या योजनांमधल्या या 'धोक्याच्या घंटा' ओळखा | सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi

    अनेक प्रलोभनं दाखवणाऱ्या योजना सध्या आपल्या आजुबाजूला आहेत...आणि यांना बळी पडल्याने लोकांचा कोट्यवधींचा पैसा पळवला जातो. या योजनांना पाँझी स्कीम्स म्हटलं जातं.   

    या योजना काम कशा करतात... आणि यातल्या धोक्याच्या घंटा कशा ओळखायच्या...

    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

    एडिटिंग : शरद बढे

    7 min
  • लहान मुलांना HMPV जास्त धोका आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (Human Metapneumo Virus) अर्थात HMPV हे नाव गेल्या काही दिवसात अचानक सगळीकडे ऐकू यायला लागलंय. चीनमध्ये या आजाराचा संसर्ग फोफावला. त्यानंतर भारतातही या विषाणूनं शिरकाव केला. भारतात आधी कर्नाटकात आणि नंतर महाराष्ट्रातही रुग्ण सापडले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रुग्णांपैकी बहुतेक सगळी लहान मुलं आहेत आणि त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही म्हणजेच ही लहान मुलं कुठूनही दूरचा प्रवास करून आलेली नव्हती.

    मग लहान मुलांना HMPV ची लागण कशी झाली? लहान मुलांना या विषाणूपासून जास्त धोका आहे का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
    एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

    5 min
  • इस्रोच्या SpaDeX मोहिमेत रोबोटिक आर्मचा वापर कसा होईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    Remote Robotic Arm चा वापर करणं हा Indian Space Research Organisation म्हणजे इस्रोच्या सध्या सुरू असणाऱ्या स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे SpaDeX मिशनचा भाग आहे. श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 30 डिसेंबरला ही मोहीम लाँच करण्यात आली होती. या रोबोटिक आर्मच्या वापराचा व्हीडिओ इस्रोने शेअर केलाय. पहिल्यांदाच इस्रोने हे तंत्रज्ञान विकसित केलंय. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या Robotic Arm च्या मदतीने अंतराळामध्ये काय करता येणार आहे? या आर्मची खासियत काय आहे?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

    एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

    5 min
  • पालकांनी सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकणं किती सुरक्षित? सोपी गोष्ट

    शेरेंटिग म्हणजे Share and Parenting ...मुलांबद्दलचे अपडेट्स, फोटो - व्हीडिओ सोशल मीडियाचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात शेअर करण्याची पालकांची सवय. 

    खरंतर हे शेअर करण्यामागे पालकांचा अगदी साधा - कौतुक - अभिमानाचा हेतू असतो...
    पण मुलांच्या भविष्यावर त्यांच्या सोशल लाईफवर याचा परिणाम होण्याची शक्यता असते...
    कशी? नेमकी काय काळजी पालकांनी घ्यायला हवी? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    5 min
  • SIP की एकरकमी मोठी रक्कम? म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक फायद्याची?

    सोशल मीडियावर सध्या फायनान्शियन इन्फ्लुएन्सर्स - ज्यांना हल्ली Finfluencers म्हटलं जातं, त्यांची भरपूर रील्स SIP, Mutual Funds याबद्दल असतात. इतके पैसे गुंतवलेत, तर इतक्या काळाने इतके लाख वा कोटी होतील असं सांगितलं जातं...

    म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एकदाच मोठी रक्कम गुंतवणं चांगलं की SIP करणं?
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये...

    रिपोर्ट - टीम बीबीसी

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे

    5 min
  • PPF खात्यात पैसे गुंतवण्याचे काय फायदे असतात? त्याची प्रक्रिया काय असते? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    गुंतवणूक करताना ती एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या पर्यायांमध्ये विभागून करा असं सगळे गुंतवणूक सल्लागार सांगतात. प्रत्येक पर्यायाचं स्वरूप वेगळं असतं... त्यातली जोखीम वेगवेगळी असते. जोखीम कमी असणारा, स्थिर परतावा देणारा गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणजे PPF - पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. काय आहे ही योजना, यात गुंतवणूक कशी करायची आणि याचे फायदे काय आहेत. समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...

    रिपोर्ट - टीम बीबीसी
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे

    5 min
  • डोनाल्ड ट्रम्प या भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढणार का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    20 जानेवारी 2025 ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होतील, त्यानंतर तब्बल 18,000 भारतीयांवर अमेरिकेतून परत पाठवलं जाण्याची - Deportation ची टांगती तलवार असणार आहे. का करण्यात येणार आहे ही कारवाई? डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इमिग्रेशनबद्दलची धोरणं कशी बदलण्याचा अंदाज आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    7 min
  • प्लास्टिकबद्दलची 'ही' धक्कादायक गोष्ट माहितीये का? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    प्लास्टिक ही गोष्ट अचंबित करणारी आहे. म्हणजे, या प्लास्टिकमुळे जगभरात ताजं अन्नं एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवलं जाऊ शकतं. हे प्लास्टिक आपल्याला ऊब देतं.. किंवा थंड ठेवतं..पावसापासून कोरडं ठेवतं. लशी - औषधांची मोठ्या प्रमाणात अब्जावधी लोकांसाठी जगाच्या एका टोकापासून दुसरीकडे सुरक्षित वाहतूकही प्लास्टिकमुळे शक्य होते. पण जसे फायदे तसे तोटे... याच प्लास्टिकचं आपल्या मातीतलं - आपल्या समुद्रांमधलं - अगदी प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि माशांच्या पोटातलं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. आता पृथ्वीवर असलेल्या जमिनीवरच्या आणि समुद्रातल्या सगळ्या प्राण्यांपेक्षा जास्त वजनाचं प्लास्टिक सध्या पृथ्वीवर आहे. मग प्लास्टिकची ही जागतिक समस्या सोडवता येईल का... आणि कशी? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,582 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,040 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,510 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,803 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,026 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,992 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

720 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,007 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners