
Sign up to save your podcasts
Or


UPSC च्या वेबसाईटवरची नोकऱ्यांसाठीची जाहिरात वादात सापडलीय. Joint Secretary म्हणजे सहसचिव, Director - संचालक आणि Deputy Secretary म्हणजे उप-सचिव पदासाठीच्या Lateral Entry म्हणजे थेट नियुक्तीसाठीची ही जाहिरात आहे. दिल्लीमधील विविध मंत्रालयं आणि खात्यांच्या मुख्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने या नेमणुका होतील. या नेमणुका 3 वर्षांच्या कालावधीसाठी असतील आणि हा काळ 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या डेंग्यूच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली ट्रायल सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलीय. ICMR - इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनेशिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनी मिळून ही लस विकसित करत आहेत. डेंग्यूच्या एका प्रकारावरची लस दुसऱ्या प्रकारापासून संरक्षण देत नाही. हीच गोष्ट लस विकसित करण्यात आव्हान आहे. या प्रक्रियेत आणखी कोणती आव्हानं आहेत?
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये पसरलेली एम् पॉक्स (Mpox) ची साथ ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. या आजाराला पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हटलं जात असे. किती धोकदायक आहे हा संसर्ग?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
6 ऑगस्टला युक्रेनने रशियाच्या भूभागात शिरून हल्ला केला. मॉस्कोच नाही, तर युक्रेनमधले अनेकजण आणि या युद्धावर लक्ष ठेवून असणाऱ्या जगभरातल्या अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.
मंगळावरच्या खडकाळ पृष्ठभागाच्या खोलवर आत वैज्ञानिकांना पाण्याचा साठा सापडला आहे.
नासाच्या मार्स इनसाईट लँडर (Mars Insight Lander) च्या डेटाचा अभ्यास करताना हा शोध लागला आहे. 2018 साली नासाचा हा लँडर मंगळावर उतरला होता. मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेलं पाणी आणि वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेच्या अस्तित्त्वाचे पुरावे यापूर्वीच आढळले आहेत. पण मंगळावर द्रव स्थितीतलं पाणी असल्याचं पहिल्यांदाच आढळलं आहे.
कसा लागला हा शोध? मंगळावर कुठे पाणी आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय आहे? ती काय काम करते? या कंपनीच्या नव्या रिपोर्टमधून अदानी उद्योग समूह आणि सेबी संबंधित कोणते आरोप करण्यात आले आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजुजू यांनी म्हटलंय. 8 ऑगस्टला हे दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून समिती स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलंय.
रिपोर्ट - टीम बीबीसी
दरवेळी कोणत्याही प्रकारच्या विम्याचा - Life Insurance, Medical Insurance, Term Insurance चा हप्ता आपण भरतो, तेव्हा त्यावर GST आकारला जातो.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
बांगलादेशतलं विद्यार्थ्यांचं आंदोलन एवढं चिघळलं की पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन देश सोडून गेल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू झालं होतं, पण त्या आंदोलनानं सरकारविरोधी चळवळीचं रूप घेतलं. त्यानंतर बांगलादेशात बऱ्याच वेगानं घडामोडी घडल्या. नेमकं काय झालं आणि त्यावर नजर ठेवणं भारतासाठी का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन – जान्हवी मुळे
पिंपरी चिंचवड येथे 15 वर्षीय मुलाने ऑनलाइन गेमिंगपायी 14 व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
एका गेमममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही ब्लू व्हेल चॅलेंजची लाट आली, तेव्हा हे घडलं होतं. टाईमपास म्हणून सुरू होणारे व्हीडिओ गेम्स जीवघेणे ठरायला लागतात, तेव्हा काय करायचं?
आपण एका गेमच्या आहारी गेलोय, हे मुलांना जाणवू शकतं का? त्यांच्याबाबतीत असं काही घडू नये, म्हणून पालक काही करू शकतात का?
सोपी गोष्ट - याच विषयाबद्दल
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,591 Listeners

1,039 Listeners

5,515 Listeners

1,805 Listeners

1,800 Listeners

1,031 Listeners

1,994 Listeners

3,223 Listeners

721 Listeners

1,006 Listeners

1 Listeners