सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • लिव्ह इन रिलेशनविषयी उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यात काय म्हटलंय? | BBC News Marathi

    उत्तराखंडच्या भाजप सरकारनं राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता 2024 विधेयक पास केलं. पण या कायद्यातल्या लिव्ह इन म्हणजे एकत्र राहणाऱ्या अविवाहित जोडप्यांबाबतच्या नियमाने जास्त लक्ष वेधून घेतलं आहे. या कायद्यात आहे तरी काय? आणि त्यावरून वाद का होतोय?

    पाहा ही सोपी गोष्ट

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह का गेलं? | BBC News Marathi

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे राहील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिला.

    राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
    निवडणूक आयोगानं कोणत्या नियमांच्या आधारे हा निकाल दिला, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये
    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – नीलेश भोसले

    5 min
  • कलम 370 रद्द झाल्यानं लडाखला फटका बसला का? स्थानिक का रागावलेत? | BBC News Marathi

    लडाखची राजधानी लेहमध्ये 3 फेब्रुवारीला हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकही या आंदोलनात सहभागी झाले होते.

    पण हे आंदोलन कशासाठी होतं? लडाखमध्ये काय सुरू आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये
    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – नीलेश भोसले

    6 min
  • पाकिस्तान निवडणुकीचा भारतावर काय परिणाम होईल? | BBC News Marathi

    पाकिस्तानात सलग तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. 8 फेब्रुवारी 2024 रोजी या देशात मतदान होणार आहे. सध्या तिथे सत्तेच्या खेळात नवाझ शरीफ, इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांच्यात त्रिकोणी राजकीय चढाओढ सुरू आहे. नेमकी काय समीकरणं आहेत आणि त्यांचा भारतावर काही परिणाम होईल का, जाणून घ्या.

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – नीलेश भोसले

    6 min
  • प्लॅस्टिकचे कण शरीरात गेल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात? | BBC News Marathi

    जमिनीत मिसळलेल्या प्लॅस्टिकमुळे शेकडो एकर जमीन खराब झाल्याचं एक संशोधन सांगतं. मायक्रोप्लॅस्टिकचे कण पोटात गेल्याने अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. प्लॅस्टिकच्या प्रदूषणापासून स्वतःला कसं वाचवायचं? आणि हे प्रदूषण कमी करण्याचे उपाय काय आहेत? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

    लेखन - आशय येडगे
    निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ठेवणं कितपत सुरक्षित? BBC News Marathi

    भारतात सुमारे 9.3 कोटी लोक पेटीएम वापरतात. पण 31 जानेवारी 2024 ला रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली.

    आता पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांवर याचा नेमका काय परिणाम होईल? रिजर्व्ह बँकेने कोणते निर्बंध लादले आहेत?
    भारतीय डिजिटल पेमेंट क्षेत्रात एकेकाळी पहिल्या नंबरवर असणाऱ्या पेटीएमवर अशी वेळ का आली?
    पाहा या सोपी गोष्ट मध्ये.

    लेखन - आशय येडगे, गुलशनकुमार वनकर

    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • मेंदूत चिप बसवली तर फक्त विचार करून काॅम्प्युटर चालवता येईल का? | BBC News Marathi

    उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीने माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याची माहिती दिलीय. आता मेंदूतल्या विचारांच्या जोरावर मोबाईल, कम्प्युटर किंवा कोणतंही डिजिटल डिव्हाईस चालवता येईल असं मस्क म्हणालेत. नेमका हा प्रयोग काय आहे? शस्त्रक्रिया करून मेंदूत चिप बसवली तर त्याचा माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

    निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – निलेश भोसले

    5 min
  • गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi

    दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात तब्बल ३ लाख महिलांचा मृत्यू होतो. पण एका नवीन लशीमुळे या गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका नव्वद टक्के कमी होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. काय आहे ही HPV लस? कोणत्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देऊ शकते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ही लस घेतली की किती वर्ष संरक्षण मिळू शकतं? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

    लेखन - आशय येडगे

    निवेदन – विशाखा निकम
    एडिटिंग – निलेश भोसले

    4 min
  • कोरोनासारखीच आणखीन एक महामारी येईल का? | BBC News Marathi

    जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी भविष्यात कोरोनापेक्षा गंभीर आजाराची साथ येऊ शकते असा इशारा दिलाय. 'Disease X' म्हणजे नेमकं काय? यामुळे आणखीन एक जागतिक साथ येऊ शकते का? आणि भविष्यात असा रोग आलाच तर त्यासाठी काय तयारी केली जात आहे? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

    लेखन - आशय येडगे
    निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – निलेश भोसले

    5 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,591 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,039 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,515 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,800 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,031 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,994 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

721 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners