
Sign up to save your podcasts
Or


भारतात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर असते.
निवडणूक आयोगाची रचना कशी असते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि निवडणूक आयुक्तांविषयी जाणून घेऊया.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
जामनगरमध्ये शेकडो एकर जमिनीवर अंबानींनी Greens Zoological Rescue and Rehabilitation Centre आणि Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust अशा दोन संस्थांच्या माध्यमातून वनतारा प्रकल्प उभा केलाय. यात विविध दुर्मिळ प्राण्यांचं संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल, पैसे असतील तर त्याला अशा पद्धतीचं प्राणिसंग्रहालय उभं करता येतं का? हा खरा प्रश्न आहे.
शिक्षण, आरोग्य, राजकारण, नोकरी आणि व्यवसायात महिलांची भागीदारी वाढली आहे हे विविध सर्वेक्षणांमधून सिद्ध तर झालंय पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिलांना न्याय मिळाला आहे का? शिक्षणातील महिलांचं प्रमाण वाढत असलं तरी त्यांना पुरुषांएवढाच पगार मिळतो का? भारत याबाबत कसं काम करतो आहे? या आणि महिलांबाबतच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात
सोशल मीडिया आणि नैराश्य यांचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरल्याने 67% किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत नकारात्मक विचार येतात. एका अभ्यासानुसार भारतात एक माणूस दररोज सरासरी 141.6 मिनिटांचा वेळ फेसबुकवर घालवतो.
लेखन – आशय येडगे
संसदेतील सदस्यांनी महिलांना 'स्वातंत्र्याची हमी' या 1958 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी नुकतंच मतदान केलं. संसदेत या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने 780 मतं पडली. तर विरोधात 72 मतं होती. फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात करणं कायदेशीर आहे परंतु देशाच्या 85 टक्के नागरिकांचा कल हा अधिकार राज्यघटनेतून मिळावा याकडे होता.
निवेदन - सिद्धनाथ गानू
खरं तर आजचे पालक नवीन आव्हानांना तोंड देतायत. दोन्ही पालक working असणं, काम संपेल पण कामाचा ताण नाही ही बहुधा प्रत्येकच घरातली परिस्थितीय. अभ्यासासोबतच इतर अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याचा ताण, या सगळ्याचा परिणाम मुलांच्या वागण्यात सुद्धा डोकावतो. कित्येकदा मुलं आपल्यासमोर असतात पण सुसंवादात कमी असतो. अशा परिस्थितीत Safe- Unsafe Touch, Well- being यासारख्या विषयांवर संवाद होणं कठीण असू शकतं.
निवेदन - सिद्धनाथ गानू
उन्हाळ्याची चाहूल लागली की गाव खेड्यात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होतात. या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो - यंदा पाऊस कसा असेल. शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज दिला तर त्यांना त्याचा कसा फायदा होईल? कमी पाऊस झाल्याने होणारं नुकसान कसं टाळता येईल? याविषीय अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने केलेलं संशोधन नुकतंच प्रकाशित झालं. त्यात काय सांगितलं आहे, जाणून घ्या.
लेखन – आशय येडगे
सुरुवातीला लोकप्रिय ठरलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. त्यानुसार आता 15 मार्च 2024 नंतर पेटीम फास्टॅग रिचार्ज किंवा टॉपअप करता येणार नाही. तुम्ही हा फास्टॅग अजूनही वापरत असाल तर तो निष्क्रिय करण्याची प्रक्रिया आणि त्यातल्या पैशांचा रिफंड।मिळवण्याची प्रक्रिया समजून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन – अमृता दुर्वे
एडिटिंग – अरविंद पारेकर
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,591 Listeners

1,039 Listeners

5,515 Listeners

1,805 Listeners

1,800 Listeners

1,031 Listeners

1,994 Listeners

3,223 Listeners

721 Listeners

1,006 Listeners

1 Listeners