सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • इस्रायलने जेव्हा 6 दिवसांच्या युद्धात गाझा काबीज केलं BBC News Marathi

    इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष नवीन नाही. 1948 साली स्थापना झालेल्या इस्रायलने आजवर अनेकदा आपल्या शेजाऱ्यांशी लढाई केली आहे. 1967 साली झालेल्या लढाईत इस्रायलने निर्णायक विजय मिळवला होता. फक्त 6 दिवसांत इस्रायलने सीरिया, जॉर्डन आणि इजिप्तचा भूप्रदेश काबीज करत विजय मिळवला होता. काय होतं हे युद्ध? पाहा.

    निवेदन - सिद्धनाथ गानू

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष होतोय ती गाझा पट्टी आहे तरी काय? BBC News Marathi

    मासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीतून आधी इस्रायलवर हल्ला झाला आणि त्यानंतर इस्रायलने गाझावर बॉम्बहल्ले सुरू केले. आकाराने मुंबईपेक्षा लहान असणारा हा भाग या युद्धात एवढा महत्वाचा का आहे? तिथे राहणाऱ्या सामान्य लोकांची परिस्थिती नेमकी काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये

    निवेदन - सिध्दनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • इस्रायल की पॅलेस्टाईन? भारत नेमका कुणाच्या बाजूने? BBC News Marathi

    भारताच्या फाळणीच्या काळातच इस्रायलचा जन्म होत होता. त्या दरम्यान गांधीजींनी इस्रायलच्या स्थापनेलाच विरोध केला होता, त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर बराच काळ गांधींचा प्रभाव राहिला.

    मात्र मागील तीन दशकांमध्ये भारत इस्रायलचा मित्र बनला आहे. नेमके भारत इस्रायल संबंध आणि पॅलेस्टाईनबद्दलची भारताची भूमिका कशी बदलत गेली?

    पाहा ही सोपी गोष्ट

    निवेदन - सिध्दनाथ गानू

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • राज ठाकरेंचं टोल आंदोलन, पण टोल कुठे, कसा आकारला जाऊ शकतो? BBC News Marathi

    आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा टोलमुक्तीचा प्रश्न चर्चिला जातोय. पण मुळात टोल का घेतात? टोलचे नियम काय आहेत? रोड आणि टोल टॅक्स वेगळाय का? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न

    निवेदन - सिध्दनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • इस्रायल हमास संघर्षाचा आपल्यावर काय परिणाम? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi

    हमास या सशस्त्र कट्टरतावादी संघटनेने इस्रायलवर 7 ऑक्टोबरला मोठमोठे मिसाईल हल्ले केले. प्रत्युत्तरात इस्रायलने गाझा पट्टीसह पॅलेस्टिनी गडांवर हल्ले केले आहेत.

    आतापर्यंत शेकडो मृत्यू झालेत, हजारो विस्थापित झालेत, आणि कित्येक जण अजूनही या संघर्षात अडकलेत. पण जगात आणखी एक युद्ध का पेटलंय? आणि त्याचे आता आपल्यावर काय परिणाम होतील? पाहा तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    वार्तांकन - टीम बीबीसी

    लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • महादेव बेटिंग ॲप काय आहे? बॉलिवूडशी या सगळ्याचं काय नातं आहे? BBC News Marathi

    सोशल मीडियावरून लोकप्रिय झालेलं हे ॲप देशभर पसरलं. बघता बघता काही महिन्यांतच 12 लाखांहून अधिक सट्टेबाज 'महादेव बुक'मध्ये सामील झाले. हजारो प्रकारच्या बँक खात्यांमधून पैशांचे व्यवहार सुरू झाले, क्रिकेटपासून ते निवडणुकांपर्यंत सगळ्याच गोष्टीवर सट्टा लावला जाऊ लागला. ईडीने तपास हाती घेतल्यानंतर काही सिने आणि टीव्ही अभिनेत्यांनाही समन्स पाठवलं आहे.

    लेखन - आशय येडगे

    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • जागतिक बँक म्हणते ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा वेग कमी झाला BBC News Marathi

    : स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणेनंतर भारतातील शौचालयांमध्ये वाढ झाली पण बांधलेल्या शौचालयांचा वापर किती होतोय याबाबत जागतिक बँकेचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे. भारतात शौचालये वापरणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? अनुसूचित जाती जमातींमध्ये शौचालय वापरण्याचं प्रमाण कमी होत आहे का? देशातील श्रीमंत आणि गरीब राज्यांची परिस्थिती काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

    लेखन : आशय येडगे
    निवेदन - सिध्दनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • बिहारप्रमाणे जातीनिहाय जनगणना महाराष्ट्रात करता येऊ शकेल का? BBC News Marathi

    बिहार सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये ही मागणी जोर धरू लागली आहे. ही आकडेवारी काय आहे? बिहारने ही जनगणना नेमकी कशी केली? महाराष्ट्रातील राजकारणावर या घोषणेचा काय परिणाम होणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे समाजातील वंचित घटकांना फायदा होऊ शकतो का? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

    लेखन : आशय येडगे
    निवेदन - सिध्दनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • मालदीवच्या निकालामुळे भारताचं नुकसान आणि चीनला फायदा होईल? BBC News Marathi

    मालदीवच्या निवडणुकांमध्ये 'इंडिया आऊट'ची घोषणा देणारे मोहम्मद मुइज्जू निवडून आले. गुंतवणूक आणि सामरिकदृष्ट्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मालदीववर खूप लक्ष केंद्रित केलं आहे. हे निवडणूक निकाल काय बदल घडवून आणू शकतील का? मोहम्मद मुइज्जू कोण आहेत? आता मालदीव कुणाच्या बाजूने असेल? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

    लेखन : आशय येडगे
    निवेदन - सिध्दनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • झिलँडिया पृथ्वीवरचा आठवा खंड बनू शकेल का? BBC News Marathi

    पृथ्वीवर शास्त्रज्ञांना एक नवीन खंड सापडल्याचा दावा 2017 मध्ये करण्यात आला. झिलँडिया नावाचा हा खंड नेमका कुठे आहे? तो किती मोठा आहे? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,591 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,039 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,515 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,800 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,031 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,994 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

721 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners