सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : बीटीएस हा के-पॉप बँड लोकप्रिय का आहे?

    बीटीएस हा जगप्रसिद्ध दक्षिण कोरियन बँड लवकरच सक्तीच्या सैन्यसेवेसाठी दाखल होणार आहे. हा बँड इतका लोकप्रिय का आहे आणि त्यांना सैन्यात सेवा का करावी लागते आहे, जाणून घेऊयात.

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • शी जिनपिंग चीनमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    चीनमध्ये शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत. चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल. पण जिनपिंग पुन्हा सत्तेत आले, तर त्याचा भारतावर कसा परिणाम होईल?

    संशोधन – टीम बीबीसी

    निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर
    अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/international-63285315

    6 min
  • भारत खरंच भुकेला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    सलग दुसऱ्या वर्षी भारताची जागतिक भूक निर्देशांकात घसरण झाली आहे. एकीकडे सरकार हा निर्देशांक म्हणजे देशाची प्रतीमा मलिन करण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे कुपोषण ही देशातली मोठी समस्या असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.

    संशोधन – टीम बीबीसी

    निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिक्षकांनी मुलांना मारहाण केली तर..

    नोएडामध्ये घडलेल्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत. पण त्यामुळे शिक्षकांच्या शिक्षेच्या पद्धती चर्चेत आल्या आहेत.

    संशोधन – सुशीला सिंह

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    दिल्लीमध्ये एका धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

    त्यातल्या आपण हिंदू देवीदेवतांची पूजा करणार नाही, अशा आशयाच्या प्रतिज्ञेवरून भाजप आणि आम आम आदमी पक्षामध्ये राजकारण सुरू झालं. आपच्या मंत्र्याला राजीनामाही द्यायला लागला.
    नेमकं काय झालंय? आणि मुळात आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय सांगतात?
    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/india-63217207

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवसेनेचा निवडणूक चिन्हांचा इतिहास

    शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरीतल्या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही. शिवसेनेनं दुसऱ्या एखाद्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान पक्षातल्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली आहे तर शिंदे गटानं त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांची मागणी केली आहे.

    संशोधन – टीम बीबीसी

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : महात्म गांधींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही?

    विज्ञानाच्या जगात नोबेल मिळणं म्हणजे तुमच्या कामगिरीवर, यशावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं मानलं जातं. पण हे पुरस्कार सुरू करणारे आल्फ्रेड नोबेल कोण होते? त्यांनी हे पुरस्कार का सुरू केले ? गणितासारख्या विषयात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? महात्मा गांधींना नोबेल कधीच का मिळालं नाही जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    संशोधन – टीम बीबीसी

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • दसरा मेळावा का सुरू झाला? दसऱ्याला राजकीय महत्त्व का आलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दसरा साजरा केला जातो, विशेषतः महाराष्ट्रात. इथे नागपूरपासून ते भगवानगड ते मुंबईपर्यंत, वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्ष आपापल्या परंपरेनुसार दसरा साजरा करतात. खूप आधीपासून दसऱ्याकडे राजकीय शक्तिप्रदर्शनाचा दिवस म्हणूनही पाहिलं जातं.

    हा दिवस इतका का महत्त्वाचा आहे? आणि याला राजकीय रंग कसा आला? पाहू या दसऱ्याची ही सोपी गोष्ट.

    वार्तांकन - टीम बीबीसी मराठी
    लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - निलेश भोसले

    5 min
  • टोकनायझेशन ऑनलाईन बँकिंगमुळे सुरक्षित होणार आहे का? BBC News Marathi

    तुम्हाला गेल्या काही दिवसांत बँकेचा मेल, मेसेज आलं असेल. तुमच्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी टोकन तयार केलंय असं काहीतरी. सध्या ऑनलाईन शॉपिंगसाठी जोरदार सेल सुरू आहेत. तुम्ही UPI वापरून सहज सटासट ही खरेदी करताना ती अधिक सुरक्षित व्हावी म्हणून ही नवी प्रणाली आलीय – टोकनायझेशन. टोकनायझेशनसाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या २ वर्षांत अनेकदा मुदतवाढ दिली. पण आता मात्र हे करणं आवश्यक असणार आहे..

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: मॅरिटल रेप आणि गर्भपाताबद्दल सुप्रीम कोर्ट काय महत्त्वाचं बोललंय?

    महिलेचं लग्न झालेलं असो वा नसो, गर्भधारणा तिच्या इच्छेने झाली असो वा नसो, 24 आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याचा तिला अधिकार आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. भारतातल्या गर्भपाताच्या कायद्याचा इतिहास पाहता, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पण यामुळे नेमकं काय बदलणार? यात मॅरिटल रेपबद्दलही सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?

    पाहूया आजची सोपी गोष्ट

    संशोधन – टीम बीबीसी

    निवेदन – गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,586 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,043 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,514 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,804 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,034 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,990 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,226 Listeners

Americast by BBC News

Americast

724 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners