
Sign up to save your podcasts
Or


नीमनवर चीटिंगचे आरोप आहेत मात्र त्यानं ते नाकारले आहेत, पण याआधी ऑनलाईन खेळात चीटिंग केल्याचं मान्य केलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्याचा बुद्धिबळावर काय परिणाम होईल?
संशोधन – टीम बीबीसी
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार? याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोग सुरू करेल. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाअंतर्गत बहुमत सिद्ध करावं लागेल.
नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं सोमवारी आपलं एक यान जाणून बुजून एका लघुग्रहावर आदळवलं. नासाच्या डार्ट मोहिमेचाच हा भाग होता. आणि ही मोहीम पृथ्वीला वाचवण्यासाठी आखलेली होती.
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
मागच्या आठवड्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालय यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. देशभरात 15 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे घालून संघटनेच्या शंभरच्या वर कार्यकर्त्यांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आलंय. ही संघटना आणि तिचे कार्यकर्ते देशात फुटीरतावादी कारवाया करत असल्याचा ठपका तपास यंत्रणेनं ठेवलाय. तर पीएफआय संघटनेकडूनही कारवाईचा निषेध होतोय. हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि पीएफआय संघटना नेमकी काय आहे? तिच्यावर कारवाई का होतेय? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्या आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू लागल्या आहेत, जे सकाळच्या शिफ्टला एका ऑफिसमध्ये पूर्णवेळ काम करत आहेत, आणि दुपारहून सुटी झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या एका कामातून पैसे कमावत आहेत.
इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना ताकिद दिली आहे, तर विप्रोने चक्क 300 कर्मचाऱ्यांना याच कारणावरून कामावरून काढून टाकलंय. हा प्रकार आहे मूनलाइटिंग.
संशोधन - टीम बीबीसी मराठी
अलीकडे इराणमध्ये एका 22 वर्षीय महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर तिथे महिलांचं आंदोलन चांगलंच पेटलंय. ही महिला हिजाबसक्तीचा विरोध करत होती. आणि तिला अटक केल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा जनतेचा दावा आहे. इराण हा इस्लामिक रिपब्लिक देश आहे. आणि तिथे सार्वजनिक ठिकाणी महिलांनी काय परिधान करावं यासाठी कडक ड्रेसकोड आहे. त्या विरोधात 2014 पासून महिला तिथं आंदोलन करतायत. पण, या ताज्या हिंसक घटनेनंतर हिजाबविरोधी आंदोलन पुन्हा ऐरणीवर आलंय. यावेळी त्याची व्याप्तीही मोठी आहे. इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि महिलांचा हिजाब विरोधाचा लढा याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
आधीच कोव्हिडमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. किंवा काही कुटुंबांनी घरातल्या कमावत्या व्यक्ती गमावल्या. आणि या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच जागतिक मंदीची भीती घोंघावत आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही तसा अंदाज वर्तवला आहे. खरंच 2023मध्ये मंदीची परिस्थिती उद्भवू शकते का? मंदी आली तर भारतावर त्याचा काय परिणाम होईल, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळतो हे पुन्हा एकदा एका संशोधन अहवालाच्या माध्यमातून उघड झालं आहे. समान पात्रता आणि क्षमता असूनही हे रोजगाराचं प्रमाण पुरुषांमध्ये 41 टक्क्यांनी जास्त आहे. वेतन आणि रोजगाराच्या बाबतीत फक्त स्त्री-पुरुष अशीच असमानता नाही तर अल्पसंख्यांक (मुस्लीम) आणि अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांनाही अशा असमानतेचा मुकाबला करावा लागत आहे. या परिस्थितीची कारणमीमांसा आणि उपाय जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
चित्ता हा सगळ्यात वेगवान आणि चपळ प्राणी. पण, 75 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतातून नामशेष झाला. चित्त्यांचं पुन्हा भारतात पुनर्वसन करण्यासाठी आता केंद्रसरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात मागवले आहेत. आणि त्यातले पहिले आठ चित्ते 17 सप्टेंबरला भारतात दाखल होणार आहे. चित्त्यांचा हा विमान प्रवास कसा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात आणल्यावर ते इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेतली याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - सौतिक बिस्वास
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,586 Listeners

1,043 Listeners

5,514 Listeners

1,804 Listeners

1,802 Listeners

1,034 Listeners

1,990 Listeners

3,226 Listeners

724 Listeners

1,006 Listeners

1 Listeners