
Sign up to save your podcasts
Or


दूध हा अनेक भारतीयांसाठी रोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक आहे. पण गेल्या काही दिवसांत दुधाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामागची कारणं काय आहेत?
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले
माणसाला पुन्हा चंद्रावर नेणारी मोहीम म्हणून नासाच्या आर्टेमिस प्रकल्पाकडे पाहिलं जातंय. यातला पहिला टप्पा म्हणजे आर्टेमिस-1. तांत्रिक कारणामुळे आर्टेमिस-1चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. ही मोहीम नेमकी काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे?
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच बेनामी संपत्ती (प्रतिबंधक) सुधारणा कायदा 2016 मधल्या काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या आहेत. या तरतुदींचा उपयोग सत्ताधारी पक्ष राजकीय सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप होत होता. या नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत? मूळात बेनामी संपत्ती म्हणजे काय? अशी कायद्याची गरज काय होती, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
कोरोनाचा उद्रेक, मंदी सदृश वातावरण आणि रशिया, युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाई वाढलीय. तसंच अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत, जगाला अन्न टंचाईचा मुकाबला करावा लागतोय. जगभरात नेमकी काय परिस्थिती आहे? त्या मागची कारणं काय? आणि ही परिस्थिती किती काळ राहील पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
रशिया आणि युक्रेन मधील युद्धाला म्हणता म्हणता सहा महिने झाले. 24 ऑगस्टला खरंतर युक्रेनचा स्वातंत्र्यदिन आहे. पण, हा देश सध्या आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी लढतोय. दुसरीकडे रशियाचंही युद्धात मोठं नुकसान झालंय. तरीही दोन्ही देश मागे हटण्याचं नाव घेत नाहीएत. त्यामुळे युद्ध चिघळतंय. रशिया - युक्रेन युद्धात सध्या नेमकं काय सुरू आहे? संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाश्चात्य देशांची नेमकी भूमिका काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
बँकांच्या खाजगीकरणाचा मुद्दा अधून मधून कायम गाजतो. केंद्रसरकारने दोन सरकारी बँकांच्या खाजगीकरणाची तयारी सुरू केलेली असतानाच अलीकडे रिझर्व्ह बँकेनं आपल्या वेबसाईटवर एक संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध केला. आणि यात चक्क सरकारी बँकांचं महत्त्व सांगताना खाजगीकरणासाठी अधिक व्यापक दृष्टिकोण ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आलीय. देशाच्या मध्यवर्ती बँकेनं अशाप्रकारे लेख प्रसिद्ध केल्यामुळे हा सरकारला ‘घरचा आहेर’ आहे का, यावरही चर्चा रंगली. आणि दुसऱ्याच दिवशी रिझर्व्ह बँकेला एक स्पष्टीकरणही प्रसिद्ध करावं लागलं? असं या लेखात नेमकं काय म्हटलंय आणि सरकारी बँकांच्या खाजगीकरणाचा व्यापक दृष्टिकोण नेमका काय असावा, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
चीनचं एक हेरगिरी करणारं जहाज मागचे काही दिवस श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात तैनात आहे. तिथं ते युद्धाभ्यास करणार आहे. पण, त्यामुळे भारताची चिंता मात्र वाढलीय. या जहाजात अत्याधुनिक रडार यंत्रणा आहे, ज्यामुळे चीन भारतीय क्षेपणास्त्रांची अचूकता आणि टप्पा यांचा माग काढू शकेल. आणि दुसरं म्हणजे चीन हंबनटोटा या लंकन बंदाराचा लष्करी कारवायांसाठी वापर करेल अशी भीती भारताला वाटतेय. तर चीन दक्षिण चिनी समुद्रात आपलं वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ही एक धोक्याची घंटा आहे. भारत - चीन संबंध यामुळे बिघडू शकतील का? भारताने चीनला घाबरायला हवं का? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडेझ सध्या भलत्याच अडचणीत सापडली आहे. दोनशे कोटी रुपयांच्या खंडणीच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने तिच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. या खंडणी प्रकरणाबद्दल तिला माहिती होती. पण, तिने ती तपास यंत्रणेला वेळेवर दिली नाही, असा तिच्यावर आरोप आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि जॅकलिनशी याचा संबंध कसा आला पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या अकरा दोषींची अलीकडेच सुटका करण्यात आली. गुजरात सरकारच्या 1992मधल्या शिक्षा माफी धोरणाला अनुसरून हे निर्देश देण्यात आले. पण, सामूहिक बलात्कार आणि सात जणांची हत्या असे गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा माफी मिळावी का? आणि जुन्या शिक्षा माफी धोरणात बदलाची आवश्यकता आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात आणि गुजरातमध्येही सत्तेत असलेल्या गुजरात सरकारवर टीका होतेय. ज्या शिक्षा माफी धोरणामुळे या अकरा गुन्हेगारांची सुटका झालीय ते धोरण समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - राघवेंद्र राव, तेजस वैद्य
2047 पर्यंत देशाला पुन्हा विकसित देश बनवा, सामर्थ्यशाली बनवा अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिली. भारत हा विकसनशील देश आहे, तर अमेरिका, जर्मनी यासारखे देश म्हणजे विकसित देश, असं आपण ऐकत आलो आहोत. पण, मूळात विकसित देश आणि विकसनशील देश कुठले हे कसं ठरतं? जीडीपीचा आकार गृहित धरला तर भारत जगात पाचव्या स्थानावर आहे. तरीही आपण विकसनशील कसे? संयुक्त राष्ट्रसंघाने विकसित आणि विकसनशील देशांची केलेली वर्गवारी कशावर आधारित आहे? या सगळ्या गोष्टी समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners