सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे?। BBC News Marathi

    भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर यातून आरोग्याच्या नव्या समस्या उभ्या राहतील असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

    संशोधन – गीता पांडे

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट प्रकरणी शिक्षा होऊ शकते का? BBC News Marathi सोपी गोष्ट

    आपल्या न्यूड फोटोग्राफीमुळे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या वादात सापडलाय. त्याच्यावर मुंबई पोलीसांकडे तक्रारही दाखल झाली आहे. अमेरिकन मासिकासाठी काढलेले फोटो रणवीर सिंह यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले होते. हे फोटो अश्लील असल्याचा आरोप होतोय. पण, अश्लीलतेविषयीचा भारतीय कायदा काय सांगतो? त्यानुसार रणवीरला शिक्षा होऊ शकते का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - प्रियंका झा

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात जाणाऱ्यांची संख्या का वाढतेय? BBC News Marathi सोपी गोष्ट

    दरवर्षी दीड लाखांच्या वर उच्चशिक्षित, कुशल भारतीय तरुण भारतीय नागरिकत्वाचा त्याग करतात. अर्थात, भारत सोडून ते अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशांचा आसरा घेतात. तिथलं राहणीमान, शिक्षण - नोकरीच्या संधी यांची भुरळ तरुणांना पडते. पण, त्यामुळे भारतात ‘ब्रेनड्रेन’ सारखी परिस्थिती उद्भवते. तरुण स्थलांतराची ही समस्या आणि त्याची कारणं पाहूया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - शुभम किशोर

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • कोरोना विषाणूचा उद्रेक वुहान मांस बाजारातूनच झाला - अहवाल | BBC News Marathi सोपी गोष्ट

    2019च्या डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहानमधल्या मांस विक्री बाजारातूनच झाला असे निष्कर्ष आता ताज्या अहवालातूनही निघाले आहेत. संशोधकांच्या दोन वेगवेगळ्या गटांनी उपलब्ध डेटा आणि माहितीच्या आधारे तसे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं आहे. हे अहवाल कोरोना विषाणूविषयी आणखी काय माहिती सांगतात, कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आला आहे का, पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 650…

    लेखन - ऋजुता लुकतुके

    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • म्यानमारमध्ये खरंच नागरी युद्ध सुरू होईल का? । BBC News Marathi

    आपला शेजारी देश श्रीलंका सध्या आर्थिक अडचणी सापडलाय. तर दुसरीकडे, म्यानमारमध्येही यादवी युद्धा सदृश परिस्थिती आहे. परिस्थिती वेळोत आटोक्यात आली नाही तर तिथे नागरी युद्ध सुरू होईल असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानेच दिलाय. असं नेमकं तिथं काय घडतंय? लष्कराच्या उठावानंतर परिस्थिती कशी चिघळली, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - बीबीसी बर्मीज्

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती करण्यामागे भाजपची रणनिती काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट 648

    द्रौपदी मूर्मू यांनी देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. त्याचबरोबर त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. हीच त्यांची ओळख सध्या राजकीय दृष्ट्या चर्चेची बनलीय. भारतीय जनता पार्टीने आदिवासी महिलेला मुख्यमंत्री करून नेमकं काय साध्य केलं, यामागे पक्षाची काय रणनिती आहे यावर चर्चा सुरू आहे. सोपी गोष्टमध्ये शोधूया याच प्रश्नांची उत्तरं…

    संशोधन - सरोज सिंह

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • भारत श्रीलंकेला इतकी मदत का करतोय? । BBC News Marathi

    श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्यानंतर यावर्षी भारताने श्रीलंकेला चीनपेक्षा जास्त आर्थिक मदत केली आहे. पण, श्रीलंकेतल्या एका गटाकडून या मदतीवर टीकाही होतेय. काही आंदोलनकर्त्यांनी ‘देश अमेरिका, भारताकडे गहाण टाकू नका,’ सूर लावला आहे. तर काही नागरिकांनी भारताच्या मदतीचं कौतुकही केलंय. मूळात भारताबद्दल श्रीलंकन नागरिकांचं नेमकं मत काय आहे, तिथे चीनवर भारत वरचढ ठरेल का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - अनबरासन एथिराजन

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min
  • इम्रान खानना पंजाबमधील विजयामुळे संजीवनी । BBC News Marathi

    पाकिस्तानचं पंतप्रधानपद गमावल्यावर इम्रान खान बॅकफूटवर गेले होते. पण नुकतंच पंजाब प्रांतातल्या पोटनिवडणुका जिंकून त्यांच्या पक्षानं कमबॅक केलं आहे. पाकिस्तानसाठीच नाही तर दक्षिण आशियासाठीही हा विजय महत्त्वाचा कसा आहे ?

    संशोधन – टीम बीबीसी
    निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • संजय पांडे अडचणीत का आले? BBC News Marathi

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी प्रभारी महासंचालक संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयानं मंगळवारी 19 जुलैला अटक केली होती. दिल्लीतील कोर्टानं त्यांना 9 दिवस ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे. शेअर बाजारासंदर्भातील एका प्रकरणात अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप संजय पांडे यांच्यावर आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे?

    निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • ऋषी सुनक आणि युकेच्या पंतप्रधानपदाची शर्यत BBC News Marathi

    बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ठरू शकतात. पण ऋषी सुनक ही शर्यत जिंकू शकतात का? त्यांची आजवरची वाटचाल कशी होती? हे जाणून घेण्याआधी मुळात ब्रिटिश पंतप्रधानांची निवड कशी होते, त्याची माहिती करून घेऊयात.

    संशोधन – टीम बीबीसी

    निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners