
Sign up to save your podcasts
Or


जुलै महिन्यापासून नवीन कामगार कायदे प्रत्यक्षात आणण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे. आणि तसं झालं तर आपली कामाची पद्धत आणि आपल्याला हातात मिळणारा पगार असे मूलभूत बदल आपल्या प्रोफेशनल आयुष्यात होणार आहेत. काय आहेत हे नवे कामगार कायदे आणि मूळ कायद्यांमध्ये नेमके काय बदल झाले आहेत हे समजून घेऊया…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्यासमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही, असे शिंदे समर्थक आमदार वारंवार करत आहेत. पण आता ते भारतीय जनता पक्षात विलीन होणार की आणखी कोणतं पाऊल उचलणार? त्यांच्यासमोर कोणते पर्याय आणि अडचणी आहेत?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61994342
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या विधानसभेतली बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागेल. पण या बहुमत चाचणीत एखादा ट्विस्ट पाहायला मिळाला तरी आश्चर्य वाटायला नको.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचा संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. पण या सुनावणीदरम्यान वारंवार एका खटल्याचा दाखला देण्यात येत होता, तो म्हणजे नबाम रेबिया प्रकरण. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? महाराष्ट्रातील आत्ताच्या राजकीय परिस्थितीत या प्रकरणाला नेमकं का महत्त्व आलंय? आणि त्याच्या आधारे कोर्टात काय युक्तीवाद झाला आहे?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517
अमेरिकेतल्या गर्भपाताच्या कायद्यासंदर्भातला एक निर्णय, म्हणजे रो विरुद्ध वेड खटला सध्या जगभर चर्चेत आहे आणि अमेरिकेचा जगावरचा प्रभाव पाहता या घटनेचा जगातल्या प्रत्येक स्त्रीशी संबंध आहे.
नेमका हा निर्णय काय आहे? गर्भपाताच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे का?
लेखन – अनघा पाठक, मानसी दास
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा :
https://www.bbc.com/marathi/international-58761820
https://www.bbc.com/marathi/international-61938721
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामध्ये त्यांच्याकडे दोन तृतियांश आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आपण खरे शिवसैनिक आहोत, अशी त्यांची भूमिका कायम आहे. अशावेळी ते शिवसेनेवरच दावा करतील का? आणि पुढे जाऊन पक्ष चिन्ह म्हणजे धनुष्य-बाण आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील का? किंबहुना ते तसं करू शकतील का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं राज्यातले भाजपचे नेते सतत म्हणत होते. पण आता सरकार खरंच पडायला आलेलं असताना मात्र हीशिवसेनेतली अंतर्गत समस्या आहे, असा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. पण हा खरंच 'शिवसेनेचे अंतर्गत विषय' आहे का? की या बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे?
विश्लेषण – आशिश दीक्षित
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61905235
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील काही आमदारांसह सुरत गाठलं आणि ते भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. पण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात असं थेट जाता येतं का? शिंदेंनी हे पाऊल उचललं, तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होईल का? शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार पक्ष बदलून आपली आमदारकीही कायम ठेवू शकतात का?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61862782
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners