सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • रुपया घसरल्यामुळे माझ्या खिशावर काय परिणाम होईल । BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर जाऊन पोहोचलाय. गुरुवारी तो काही सेकंदांसाठी का होईना 80 च्याही पार गेला. आणि तज्ज्ञांचं तर असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात तो आणखी खाली म्हणजे अगदी 81 रुपयापर्यंत घसरू शकतो. असं नुसतं ऐकायला थोडंस किचकट वाटतं ना! आणि याचा माझ्याशी काय संबंध असंही तुम्हाला वाटेल. पण, रोजच्या जीवनात आपल्या खिशावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होतच असतो. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर दूरगामी परिणाम होतो. म्हणूनच सोपी गोष्टमध्ये आज समजून घेऊया रुपया आणि डॉलरच्या किमती कशा ठरतात, सध्या त्या का वाढतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे?

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • उबर फाईल्स प्रकरण काय आहे? । BBC News Marathi

    ओला किंवा उबर टॅक्सी आपल्या सगळ्यांसाठी सोयीची. आणि आरामदायी प्रवासामुळे आपली या सेवांना पसंती असते. पण, अलीकडेच उबर कंपनीतं कामकाज कसं चालतं किंवा कसं बेकायदेशीर पद्धतीने चालतं याचा खुलासा कऱणाऱ्या काही फाईल्स कंपनीच्याच माजी अधिकाऱ्याने उघड केल्या आहेत. त्यावरून जगभर गाजलेली ही सेवा किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झालाय. उबर कंपनीविषयी असं या फाईल्समध्ये नेमकं काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्ये…

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • श्रीलंकेपासून भारताने काय धडा घ्यावा । BBC News Marathi

    श्रीलंका देशावर जशी दिवाळखोरीची वेळ आली आहे, तशीच ती भारतावर येईल का अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काहींनी भारतातल्या महागाईकडेही बोट दाखवलं. आणि अशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली. खरंच भारतात महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते का? आणि श्रीलंकेच्या संकटातून भारताने काय धडा घ्यायला पाहिजे, हे आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया…

    संशोधन - सरोज सिंह

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    7 min
  • K2 हा धूमकेतू पृथ्वीवर आदळेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    येत्या 14 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळून ‘के2’ हा मोठा धूमकेतू जाणार आहे. हा धूमकेतू तब्बल 18 किमी लांब आहे. त्यामुळे साध्या दुर्बीणीला तो दिसू शकणार आहे. त्याच्यापासून पृथ्वीला धोका आहे का? हे धूमकेतू कुठून आणि का येतात? आणि ते आदळले तर काय होऊ शकतं?

    सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया सोपी गोष्टमध्ये…

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • श्रीलंकेचं आर्थिक गणित कुठे फसलं? । BBC News Marathi

    श्रीलंकेतली आर्थिक प्रश्न दिवसेंदिवस चिघळतोय. महागाई आणि वस्तूंच्या तुटवड्यामुळे वैतागलेल्या आंदोलनकर्त्यांनी रविवारी राष्ट्राध्यांच्या सरकारी निवासस्थानावरच हल्ला केला. या आंदोलनामुळे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडावं लागलं. आणि ते पळून गेले. देशात परकीय चलनाचा अभूतपूर्व तुटवडा जाणवतोय. पण, मूळात श्रीलंकेवर ही परिस्थिती काय ओढावली? देशाचं आर्थिक गणित कुठे बिघडलं? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - आयेशा परेरा
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min
  • काँग्रेस पक्षाने तीन वेळा निवडणूक चिन्ह का बदललं? BBC News Marathi | सोपी गोष्ट

    एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटाने वारंवार आपणच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. आणि फक्त पक्षावरच नाही तर पक्षचिन्ह म्हणजे धनुष्य-बाणावरही त्यांनी दावा आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही धनुष्य बाण आपलाच असल्याचं म्हटलंय. यावरून पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह याविषयीही चर्चा होऊ लागलीय. त्या निमित्ताने सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया भारतातल्या सगळ्यात जुन्या पक्षाविषयी ज्यांनी तीनदा निवडणूक चिन्ह बदललंय.

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    8 min
  • 'रॉकेट्री' फेम नंबी नारायण, ज्यांना गद्दारीच्या आरोपात अडकवलं गेलं... सोपी गोष्ट BBC News Marathi

    आर माधवन आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला रॉकेट्री सिनेमा सध्या गाजतोय. इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर तो बेतलेला आहे.

    ही कहाणी खरंच थरारक आहे. रॉकेट तंत्रज्ञान परस्पर पाकिस्तानला विकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. देशाने त्यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. पण, शेवटी गुन्हे अन्वेषण विभागाने चार वर्षांनी त्यांना क्लिनचिट दिली. आता आपल्याविरोधात बनावट कट रचणाऱ्यांचा तपास व्हावा अशी नारायणन यांची इच्छा आहे. त्यांचं हे सिनेमालाही लाजवेल, असं कथानक समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - सौतिक बिस्वास

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • सेक्स स्कँडलमुळे पडणार युकेमध्ये बोरीस जॉन्सन सरकार? BBC News Marathi सोपी गोष्ट

    महाराष्ट्रात जसं मागचे पंधरा दिवस एक सत्तानाट्य घडून आलं, तसंच वातावरण सध्या युकेमध्ये आहे. पंतप्रधान बोरिस बेकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार नाराज आहेत. आणि त्यातून मागच्या एका महिन्यात दुसऱ्यांदा त्यांच्यावर पंतप्रधानपद गमावण्याचं संकट घोंघावतंय. यावेळी केंद्रस्थानी आहेत त्यांचे निकटचे सहकारी आणि खासदार ख्रिस पिंचर. असं नेमकं काय घडतयं युकेमध्ये? पाहूया सोपी गोष्ट…

    संशोधन - टीम बीबीसी

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • रेस्टॉरंटकडून बिलामध्ये आकारला जाणारा सर्व्हिस चार्ज कसा रद्द कराल?। BBC News Marathi

    आपल्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटच्या बिलामध्ये सर्व्हिस चार्ज आकारला जातो. सर्व्हिस चार्ज म्हणजेच सेवाशुल्क. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एकप्रकारची 'टिप' असते जी ग्राहकांकडून सक्तीने वसूल केली जाते. पण आता सर्व्हिस चार्ज रद्द करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकारणाने दिले आहेत.

    संशोधन, लेखन - दीपाली जगताप

    निवेदन - सिद्धनाथ गानू

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    4 min
  • एकनाथ शिंदे आणि चंद्राबाबू यांच्या बंडातील साम्य । BBC News Marathi

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि 27 वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देसममध्ये झालेलं एक बंड यामध्ये राजकीयदृष्ट्या भरपूर साम्य आहे. तिथेही बंडखोर नेते चंद्राबाबू नायडू यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आणि पुढे जाऊन पक्षाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आलं. याबाबतीत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर दावा असला तरी तो मुद्दा न्यायालयात जाणार आहे. पण, आंध्रमधलं ‘ते’ बंड उद्धव ठाकरेंसाठी भीती वाढवणारं तर शिंदे गटासाठी दिलासा देणारं ठरू शकतं. पाहूया सोपी गोष्ट…

    संशोधन - नीलेश धोत्रे
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners