
Sign up to save your podcasts
Or


भारत सरकारने मंगळवारी (14 जून) लष्करातील अल्पकालीन नियुक्तीची अग्निपथ योजना जाहीर केली. जगात असे अनेक देश आहेत जिथं सैन्यात अल्प कालावधीसाठी भरती करण्यात येते. पण इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशांमध्ये लष्करात सेवा करणं सक्तीचं आहे. अशा योजनांचा काय परिणाम होतो?
नेपाळ सरकारने माऊंट एव्हरस्टचा बेस कँप दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतलाय. आता जिथं कँप आहे ती जागा ग्लेशियरवर आहे. आणि तिथला बर्फ झपाट्याने वितळतोय. आणि ठिसूळही झालाय. कसा आहे नवा बेस कँप? आणि नेपाळ सरकारवर ही वेळ का आली? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या मुस्लीम प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद अजूनही देशभर उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात धार्मिक द्वेष विरोधी एक विधेयक संमत होण्याची मागणी होत आहे. 17 तारखेला या विधेयकाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मुंबईत एक मोर्चाही आयोजित केला आहे. ‘महम्मद पैंगबर विधेयक’ या नावाने चर्चा होत असलेलं हे विधेयक नेमकं काय आहे आणि राज्यात ते संमत होऊ शकतं का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - दीपाली जगताप
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
केंद्रसरकारने येत्या 18 महिन्यांमध्ये 10 लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली आहे. यात रेल्वे, गृहखातं आणि संरक्षण खात्यातल्या नोकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सरकारने घोषणा तर केली. पण, एवढ्या नोकऱ्या सरकार आणणार कुठून? आणि सरकारी नोकऱ्यांमधून बेरोजगारीचा खरा प्रश्न सुटेल का? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संकलन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची दोन दिवस चौकशी झाली. वर्तमानपत्राची 2000 कोटी रुपये किमतीची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर काँग्रेसनं राजकीय सूडबुद्धीने गांधी कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय. 2012मध्ये समोर आलेलं हे नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संकलन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या मृत्यूबद्दल काही दिवसांपूर्वी अफवा पसरली होती. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी एक पत्रक काढून ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर मुशर्रफ यांना नेमकं काय झालंय याचीही माहिती दिली. मुशर्रफ यांना बरा न होण्यासारखा एक दुर्धर आजार झालाय अँमीलॉयडॉसिस. हा आजार अमेरिकेतही दोन लाख लोकांमागे एखाद्यालाच होतो. असा हा दुर्मीळ आजार नेमका काय आहे आणि परवेझ मुशर्रफ सध्या कसे आणि कुठे आहेत जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
संकलन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
आपला फोन वापरून UPI च्या माध्यमातून तुम्ही आपल्या बँक अकाउंटमधले पैसे खर्च करत असाल. पण आपल्याकडे नसलेले पैसे खर्च करायचे असले तर? म्हणजे क्रेडिट कार्डवरचे पैसे तुम्ही UPI मधून खर्च करू शकलात तर? Reserve Bank ने तशी घोषणा केलीय. पण यामुळे काय साध्य होणार आहे? यातून तुमचा फायदा होईल का?
राज्यसभेच्या निवडणुकांकडे आपलं सहसा लक्ष तजात नाही. पण यावेळी महाराष्ट्रात होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत आणि दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केलाय. राज्यसभा निवडणुकीचं गणित अत्यंत किचकट असतं. हे खासदार कसे निवडले जातात? पाहा ही सोपी गोष्ट.
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित पैगंबराबद्दल काही उद्गार काढले आणि मोठा वाद झाला. पैगंबरांबद्दल बरंच काही लिहीलं गेलंय. पण त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती कधीच का पाहायला मिळत नाही? इस्लाममध्ये अल्लाह आणि प्रेषितांच्या प्रतिमा रेखाटण्यावर बंदी आहे का? जेव्हा जेव्हा अशाप्रकारे प्रेषितांच्या प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इतकी तीव्र प्रतिक्रिया का उमटली? पाहा ही सोपी गोष्ट
संशोधन - जॉन मॅकमेनॉस, संकलन – जान्हवी मुळे
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये प्रेषित पैगंबराबद्दल काही वादग्रस्त उद्गार काढले. यावरून अरब, आखाती आणि हळुहळू अनेक मुस्लीम देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपने या प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पण अजूनही टीका थांबलेली नाही. प्रश्न हा आहे की भारतातून प्रतिक्रिया उमटली तेव्हा भाजपने कारवाई केली नाही, पण मुस्लीम देशांच्या विरोधानंतर चक्रं फिरली. असं का झालं? पाहा ही सोपी गोष्ट
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners