
Sign up to save your podcasts
Or


भारतातल्या मुलं दत्तक घेण्याच्या कायद्यामध्ये अलीकडेच काही बदल करण्यात आले. त्यानुसार, दत्तक ग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्याची सुनावणी न्यायालयासमोर न होता जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर होईल. न्यायालयांवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. पण, त्यामुळे दत्तक ग्रहणाची प्रक्रिया आधीपेक्षा सुटसुटित आणि लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात या प्रक्रियेच्या अंमलबजावणीचा गोंधळ वाढलेला दिसतोय. कायद्यातले बदल आणि त्यामुळे लोकांचा गोंंधळ का उडायला, समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
कोहिनूर हिरा जगातल्या सगळ्यात मौल्यवान आणि वजनदार हिऱ्यांपैकी एक हिरा मानला जातो. भारतीयांच्या मनात या हिऱ्याचं एक वेगळं स्थान आहे. पण, त्याचबरोबर ब्रिटिशांनी हा हिरा भारताकडून लुटून नेला असा एक समज भारतीयांच्या मनात आहे. त्याचबरोबर या हिऱ्याबद्दल आख्यायिकाही खूप आहेत. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोहिनूरविषयीचे सहा मोठे गैरसमज…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
महाराष्ट्राच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि गडचिरोली इथून तेरा हत्ती गुजरातच्या जामनगरमधल्या खाजगी प्राणी संग्रहालयात पाठवण्याचा निर्णय मे 2022मध्ये वन विभागाने घेतला. या निर्णयाला राज्य आणि केंद्रसरकारनेही परवानगी दिली आहे. पण, प्रश्न हा आहे की, आपल्या नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या प्राण्यांना बंदिस्त प्राणी संग्रहालयात का पाठवायचं? त्यासाठीच प्राणीहक्क संघटना आणि स्थानिक लोकांनीही याला विरोध केला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. आणि वन विभागाने पत्रक काढून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली. अखेर वर्तमानपत्रात आलेली एक बातमी बघून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे. आणि आता कायदेशीर सुनावणी सुरू होणार आहे. हत्तींच्या हस्तांतरणाचा निर्णय आणि त्याविषयीचे कायदे जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटिश साम्राज्यावर 71 वर्षं राज्य केलं. देशाला दुसऱ्या महायुद्धातून सावरताना बघितलं आणि पुढेही अशी अनेक स्थित्यंतरं पाहिली. ब्रिटिश जनतेशी आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश राजघराणं तसंच परंपरांशी त्या प्रामाणिक राहिल्या. आता त्यांच्यावरचे अंत्यसंस्कारही ब्रिटिश परंपरेला धरून आणि शासकीय इतमामात पार पाडण्यात येतील. पुढचे काही दिवस ब्रिटिश जनतेसाठी नेहमीसारखे नसतील. त्यांच्यासाठी काय बदलेल आणि ब्रिटिश परंपरेनुसार, शाही अंत्यसंस्कार नेमके कसे पार पडतात आज जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये
माहिती - बीबीसी न्यूज
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असलं तरी राजकीय हेतूही लपवून ठेवलेला नाही. कारण, 2024 ची सार्वत्रिक निवडणूक आणि काँग्रेस पक्षाला तसंच राहुल यांच्या नेतृत्वाला उभारी देण्यासाठी देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचा हा निकराचा प्रयत्न आहे हे उघड आहे. पण, सध्याचा देशातला सर्वशक्तिशाली पक्ष आणि निवडणूक यंत्रणेत माहीर असलेल्या भाजपला ही पदयात्रा आव्हान देऊ शकेल का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - सौतिक विश्वास, राघवेंद्र राव
राजपथाचं नाव आता कर्तव्य पथ असं केलं जाणार आहे. पण असा निर्णय का घेण्यात आला आहे? या रस्त्याचा इतिहास आणि महत्त्व काय आहे?
पाकिस्तानला गेले काही दिवस भीषण पुराचा सामना करावा लागतो आहे.
संशोधन – जॉर्जिना रेनार्ड
भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत 2 सप्टेंबर 2022ला भारतीय नौदलात दाखल झाली. 262 मीटर लांब, 45 हजार टन वजनी आणि 7500 हजार मैलांची रेंज असलेली ही युद्धनौका तयार व्हायला तब्बल २० हजार कोटी रुपये आणि १३ वर्षं लागली.
आज भारताजवळच्या समुद्रात अनेक आंतरराष्ट्रीय हालचाली पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात INS विक्रांतमुळे भारतीय नौदलाची शक्ती खरंच कशी वाढणारे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन – जुगल पुरोहित
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-62750278
Back link to this SoGo 667 - https://www.youtube.com/watch?v=wGhVaAgcPes
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी 2019च्या जुलैमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे.
वार्तांकन - सरोज सिंग
श्रीगणेशाला मोदकांचा नेवैद्य आवडतो असं वर्णन पुराणापासून चालत आलं आहे. आई पार्वतीने गणेशाला अमृतयुक्त मोदक खायला दिला अशी कथा आहे. पण, ही पुराणातली कथा झाली. आपल्याकडे मोदक नक्की कुठून आले? गणपतीला मोदक दाखवण्याची परंपरा कधी आणि कुठून सुरू झाली? महाराष्ट्राखेरीज इतर कुठल्या राज्यांत मोदक बनवले जातात, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,586 Listeners

1,043 Listeners

5,514 Listeners

1,804 Listeners

1,802 Listeners

1,034 Listeners

1,990 Listeners

3,226 Listeners

724 Listeners

1,006 Listeners

1 Listeners