
Sign up to save your podcasts
Or


कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातली रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. वाशिम, सातारा, सोलापुरात जवळपास 300 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी कोव्हिड पॉझिटिव्ह झाले. कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होतच नाही असा अनेकांचा ग्रह आहे. लहान मुलांची कोरोनाच्या काळात काळजी कशी घ्यायची? शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय करायला हवे? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमधून.
संशोधन- टीम बीबीसी
मोदी सरकारने या बजेटमध्येच बँकांच्या खाजगीकरणासंबंधी घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी बुधवारी दिलेल्या एका भाषणाने सरकार नेमक्या किती बँकांचं खाजगीकरण करणार याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खाजगीकरणाने बँकांचा, ठेवीदारांचा आणि सरकारचा फायदा होणार की तोटा? जाणून घ्या.
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
तुम्ही फेसबुक, गुगल किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर बातम्या पाहत असाल. त्या फुकट असतात. पण ही ॲप्स चालवण्यासाठी पैसे लागतातच. या कंपन्यांना हा पैसा कुठून मिळतो? त्या पैशाच्या वाटपावरूनही वाद आहेत. मग या कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्म्सवर बातम्या दाखवणं थेट बंद करू शकतात का? जाणून घ्या सोपी गोष्ट च्या या भागात.
संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
योग गुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेलं कोरोनिल औषध लाँच केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये, हे औषध कोरोनावर परिणामकारक असण्याचा दावा करण्यात आला. तर या औषधाला WHO, IMF आणि इतरांकडून मान्यता मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोरोनिलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. कोरोनिलविषयी काय दावे करण्यात आले? आणि त्यावर कोणी काय प्रतिक्रिया दिलेली आहे? जाणून घेण्यासाठी ऐका ही सोपी गोष्ट
एका ऐवजी 2 मास्क एकावेळी वापरणं अधिक सुरक्षित असल्याचं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटलंय. कोव्हिड 19 पसरवणाऱ्या Sars –CoV2 या मूळ विषाणूच्या तुलनेत त्याचे नवीन व्हेरियंट्स हे अधिक Transmissible म्हणजे पसरण्याजोगे असल्याचं म्हणत डॉ. अँथनी फाऊची यांनी लोकांना डबल मास्किंगचा सल्ला दिलाय. असं करावं का, त्यामुळे कोव्हिडपासून डबल संरक्षण मिळतं का? त्यामुळे गुदमणार नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे डबल मास्किंगसाठी कोणते मास्क वापरायचे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
संशोधन : अमृता दुर्वे
निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अशी अवेळी गारपीट का झाली?
एखाद्या व्यक्तीने लस घेतल्यानंतरही तिच्यामार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो का?
पेट्रोलने गाठली शंभरी, इंधन दरवाढीवर केंद्रसरकार काय पावलं उचलणार?
२२ वर्षीय पर्यावरणवादी नेत्या दिशा रवी यांना ‘टूलकिट प्रकरणी’ दिल्ली पोलिसांनी काल अटक केली आहे. ग्रेटा थुनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना केलेल्या ट्विटच्या टूलकिट एडिटर दिशा रवी होत्या. आणि या टूलकिटच्या माध्यमातून खलिस्तानी चळवळीशी संबंधित भारताविरोधात द्वेष पसरवणारा संदेश पसरवण्याचा त्यांचा उद्देश होता, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणामुळे टूलकिट हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आज सोपी गोष्टमध्ये तेच समजून घेणारोत. शिवाय जाणून घेणार आहोत टूलकिट प्रकरणाविषयी...
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,570 Listeners

1,045 Listeners

5,519 Listeners

1,807 Listeners

1,799 Listeners

1,025 Listeners

1,977 Listeners

3,223 Listeners

728 Listeners

1,006 Listeners

1 Listeners