सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा का निर्माण झाला?

    कोरोनाची दुसरी लाट देशभरात सुरू झाली आणि १ एप्रिलपासून केंद्रसरकारने ४५ वर्षांवरच्या वयोगटातल्या

    सगळ्यांसाठी लसीकरण मोहीम खुली केली. लसीकरणाची व्याप्ती तर वाढली. पण, देशातल्या वाढलेल्या गरजेला पुरे पडतील इतक्या लशी देशात उपलब्ध आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. केंद्रसरकारने वारंवार हे नाकारलं असलं तरी देशात लशींचा तुटवडा भासतोय असं उत्पादक कंपनी
    सिरम इन्स्टिट्यूटनेही म्हटलंय. लस पुरवठ्याच्या बाबतीत नेमकी परिस्थिती काय आहे? लसीचा तुटवडा का झालाय, जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके

    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का?

    ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस घेतल्यावर शरीरात रक्ताची गुठळी तयार होणं हा अगदीच क्वचित आढळणारा साईड इफेक्ट आहे, असं काल युरोपीयन युनियनच्या औषध नियामक संस्थेनं स्पष्ट केलं. आणि युरोपातल्याच काय जगातल्या सगळ्याच देशांमध्ये लोकांना हायसं वाटलं असणार. कारण, भारतातही ज्या दोन लसींना मान्यता मिळालीय त्यातली एक ऑक्सफर्ड - अँस्ट्राझिनिकाची लस आहे, जिला आपण कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो. भारतात रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या फारशा घटना समोर आल्या नव्हत्या. पण, धास्ती तर वाटतेच. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया खरंच अँस्ट्राझिनिका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात का, आणि आता त्यावर तज्ज्ञांचं काय मत आहे, आजच्या सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - बीबीसी आरोग्य टीम
    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात सरसकट लसीकरण शक्य आहे का?

    भारतात कोरोनाची सुरुवात होऊन आता एक वर्ष उलटून गेलंय. पण पहिली लाट जाते ना जाते तोच दुसरी लाट धडकलीये. गेल्या 24 तासात देशात एकूण 1,15,436 रुग्णांची नोंद झालीये. गेल्या वर्षभरातील देशातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. तर त्यातले 55,469 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडलेत. म्हणजे देशातील रुग्णसंख्येच्या जवळपास 50% रुग्ण महाराष्ट्रात सापडतायत. हे आकडे सांगण्याचं कारण म्हणजे, एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय की, राज्यात कोरोनाचा इतका कहर आहे मग सरसकट लसीकरण का केलं जात नाहीये? लसीकरणासाठीची वयोमर्यादा पाळणं खरंच गरजेचं आहे का? महाराष्ट्र सरकारनं तशी विनंती केंद्राकडे केलीये. पण त्यावर केंद्र सरकारचं, आरोग्य तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? आणि असं सरसकट लसीकरण योग्य आहे का? याचविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - सरोज सिंह, मयुरेश कोण्णूर
    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: व्लादिमीर पुतिन यांनी रशियन राजकारणावर पकड कशी मिळवली?

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहू शकणार आहेत. एका घटनादुरुस्तीमुळे पुतिन यांना हे शक्य होणार आहे. 36मध्ये पुतिन 83 वर्षांचे असतील. तोपर्यंत ते निवडणुका जिंकत राहिले आणि प्रकृतीनेही साथ दिली तर ते सर्वोच्च पदावर राहू शकतील. आणि त्यांनी तोपर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण केला तर ज्येष्ठ नेते स्टॅलिन यांना मागे टाकून ते रशियातले सगळ्यात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले नेते असतील. आहे ना विलक्षण?

    मूळात पुतिन हे साधंसुधं व्यक्तिमत्व नाहीच आहे मूळी. आंतरराष्ट्रीय राजकारणातला त्यांचा दबदबा आणि रशियातली त्यांची माचोमॅनची प्रतिमा असं सगळंच विलक्षण आहे. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये व्लादिमीर पुतिन या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊया….

    संशोधन - टीम बीबीस, ऋजुता लुकतुके
    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात नक्षलवादी चळवळ कशी फोफावली?

    क्रांती म्हणजे कुठली मेजवानी नव्हे, एखादा सुरेख निबंध लिहिणं नव्हे. तर क्रांती हा सत्ताधाऱ्यांविरोधातला सशस्त्र उठाव आहे. चीनमधल्या कम्युनिस्ट क्रांतीचे आद्य नेते माओ त्से तुंग यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे.

    आज मला आठवलं कारण, याच विचारांनी प्रेरित झालेल्या देशातल्या नक्षली गटांनी ३ एप्रिलला बिजापूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाबरोबर केलेला संघर्ष आणि यात २२ जवानांचा झालेला मृत्यू. १९६७ पासून भारतात नक्षलवादी गट सक्रिय आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या का आहेत, सरकारबरोबर त्यांचा संघर्ष अशा वारंवार का होतो, आज समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
    संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके
    लेखन,निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लॉकडाऊनशिवाय दुसरे पर्याय काम करत नाहीत का?

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. जगात इतरही अनेक देशांनी अनेकदा लॉकडाऊन लावले आहेत. पण तसं न करताही कोरोनाचा संसर्ग दूर ठेवता येतो का?

    एकीकडे काही देश कोरोनाचं संकट थोपवण्यासाठी अनेकदा लॉकडाऊन लावतायत तर दुसरीकडे एकदाही लॉकडाऊन न केलेले देश आहेत. यातला नेमका कोणता उपाय अधिक चांगला? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    संशोधन- सिद्धनाथ गानू
    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: इलेक्टोरल बाँड्स काळा पैसा राजकारणापासून दूर ठेवू शकतात का?

    2017 मध्ये मोदी सरकारने अर्थसंकल्पात इलेक्टोरल बाँड्स किंवा निवडणूक रोखे घोषित केले. हे बाँड्स राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठीचं एक साधन आहे.

    पण राजकीय पक्षांना या बाँड्समार्फत मिळालेल्या देणग्या घोषित न करण्याचं बंधन नाही. तसंच या बाँड्समार्फत कोण देणगी देतंय ते सुद्धा गुप्त ठेवलं जातं. या सगळ्यामुळे राजकारणतील पारदर्शकतेला तडा जातो असा अनेकांचा दावा आहे.
    यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो का? सामान्य माणसांवर या सगळ्याचा काय परिणाम होतो? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न.
    संशोधन - सिद्धनाथ गानू
    लेखन,निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- अरविंद पारेकर

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: सुएझ कालव्यात अडकलेलं 'एव्हर गिव्हन' जहाज कसं बाहेर निघालं?

    दोन लाख टन वजनाचं ‘एव्हरग्रीन’ नावाच्या तैवानी मालवाहतूक कंपनीचं ‘एव्हरगिव्हन’ हे जहाज सोमवारी अखेर सुएझ कालव्यातून मोकळं झालं. साधारण आठवडाभर हे जहाज काव्याच्या दक्षिणेकडच्या टोकाशी अडकून पडल्याने या कालव्यात अक्षरशः ट्रॅफिक जाम झाला होता. या बोटीच्या दोन्ही बाजूने 350 पेक्षा जास्त जहाजं आणि बोटी अडकून पडल्या.

    मधल्या काळात जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं. अधिक तपास केल्याशिवाय ही बोट मुळात अडकलीच कशी याचा उलगडा होणार नाही. ही बोट सोडवण्यासाठी काय काय करावं लागलं? यात कुणी महत्त्वाची भूमिका बजावली? पाहूया सोपी गोष्टमध्ये...
    संशोधन - टीम बीबीसी, सिद्धनाथ गानू
    लेखन,निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: सुएझ कालव्यात कशी अडकली महाकाय बोट?

    दोन लाख टन वजनाचं तैवानी कंपनीचं ‘एव्हरग्रीन’ हे जहाज मंगळवारी जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात अडकलं. आणि त्यामुळे या कालव्यात चक्क ट्राफिक जाम झाला आहे. पर्यायी कालव्यातून तात्पुरती वाहतूक सुरू झाली असली तरी सध्या तीसच्यावर जहाजं अजून अडकून पडली आहेत. आशियाला युरोपशी जोडणारा हा महत्त्त्वाचा जलमार्ग आहे. आणि तिथेच ट्राफिक जाम झाल्यामुळे जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान होतंय. पण, बोटीचा हा अपघात घडला कसा, त्याचे काय परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत, पाहूया सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके
    लेखन,निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,570 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,045 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,519 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,807 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,799 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,977 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

728 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners