सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशाचे आगामी सरन्यायाधीश एन रमण्णा नेमके कोण आहेत?

    देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून नुतलापट्टी वेंकट रमण्णा यांच्या नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे.

    पण त्याचवेळी रमण्णा यांच्या विरोधात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिक न्यायालयाने फेटाळली आहे. किंबहुना ही याचिका फेटाळल्यावरच रमण्णा यांच्या शिफारसीचं पत्र बोबडे यांनी पाठवलं.
    पण, सरन्यायाधीश पगासाठी नाव सुचवलेले रमण्णा त्यांच्याच राज्यात वादग्रस्त का ठरलेत? त्यांच्या विरोधातले वाद काय आहेत? आणि त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या खटल्यात न्यायनिवाडा केलाय? म्हणजे, थोडक्यात आपल्या आगामी सरन्यायाधीशांविषयी आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया…
    संशोधन - ऋजुता लुकतुके, बाला सतीश
    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात खरंच पुन्हा लॉकडाऊन लागेल का?

    एकीकडे देशात पहिला राष्ट्रीय लॉकडाऊन लागला त्याला २४ मार्चला एक वर्ष होतंय. आणि त्याचवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊन पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी चर्चा सुरू झालीय. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशभर सरासरी चाळीस हजार नवीन रुग्ण सापडतायत. आणि त्यातले साठ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून लोकांच्या मनात भीती वाढतेय की, पुन्हा लॉकडाऊन लागेल का? तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया खरंच लॉकडाऊनची शक्यता किती आहे. आणि मूळात लॉकडाऊनचा निर्णय घेताना कोणते निकष राज्यसरकार लावत असतं.

    संशोधन - ऋजुता लुकतुके, राहुल गायकवाड
    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- शरद बढे

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारला जोडलं का?

    तुमचं पॅनकार्ड आणि तुमचं आधारकार्ड ही तुमची दोन महत्त्वाची सरकारी ओळखपत्रं आहेत. आणि आता ती ऑनलाईन जोडणं किंवा एकमेकांना लिंक करणं केंद्रसरकारने अनिवार्य केलंय. त्यासाठी शेवटची मुदत आहे ३१ मार्च पर्यंतची. तोपर्यंत तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमचं पॅनकार्ड इनअँक्टिव्ह किंवा तात्पुरतं स्थगित होऊ शकतं. तुमच्या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्त्वाचं आहे बरं का! म्हणूनच आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल?

    संशोधन - ऋजुता लुकतुके
    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- शरद बढे

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाकला का करायची आहे भारताशी मैत्री?

    भारत पाकिस्तान दरम्यान सीमेवर होणाऱ्या चकमकी अलीकडे कमी झाल्यात असं वाटतं का? कारण न्यूजपेपर आणि वेबसाईटवर तशा बातम्या तरी कमी झाल्यात. अधिकृत बातमी असं सांगते की, मागच्या तीन आठवड्यात सीमेपलीकडून असा कुठलाही मोठा गोळीबार झालेला नाही.

    उलट, भारत आणि पाकिस्तानने २००३च्या युद्धविराम कराराचं पुन्हा पालन करायचं ठरवलं आहे अशी बातमी तुम्हाला बघायला मिळेल. आणि भर म्हणून मंगळवारी दोन देशांमधला सिंधू नदी पाणी वाटपाच्या प्रश्नावरही दोन्ही देशांदरम्यान चर्चा होणार आहे. यावेळी शांततेचा आणि युद्धविरामाचा प्रस्ताव पाकिस्तानकडून आलाय. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया पाकिस्तानला भारताशी पुन्हा शांतता का प्रस्थापित करायचीय. आणि भारताचा त्याला प्रतिसाद कसा आहे, सोपी गोष्टमध्ये….
    संशोधन - बीबीसी उर्दू टीम, ऋजुता लुकतुके
    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- शरद बढे

    7 min
  • कोरोना लस, कोविन अॅप आणि इतर प्रश्नांची उत्तरं (BBC News Marathi)

    कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला खरा पण त्यातही अनंत अडचणी येतायत. अनेकांनी तांत्रिक बिघाडांबद्दल तक्रार केलीय. पण त्यापलीकडेही अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत. कोरोना लसीकरणाबद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तज्ज्ञांकडून मिळवली. ऐका ही सोपी गोष्ट.

    संशोधन- मयांक भागवत

    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285 (BBC News Marathi)

    मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये अचानक काही तास लाईट गेले आणि कधीही न झोपणारं शहर ठप्प झालं. यात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय. पण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात?

    संशोधन- बीबीसी मराठी
    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    5 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,570 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,045 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,519 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,807 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,799 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,977 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

728 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners