
Sign up to save your podcasts
Or


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. देशातली ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून ऑक्सिजन आयात करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. रेल्वे, विमानामार्फत ऑक्सिजनची वाहतूक केली जात आहे. पण मुळात ऑक्सिजनचा तुटवडा का पडला? आरोग्य यंत्रणा बेसावध होती का? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.
कोरोना व्हायरसची विविध म्युटेशन्स म्हणजे उत्परिवर्तनं जगभरात सापडत आहेत. भारतात सापडलेल्या म्युटेटेड कोरोनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत ‘डबल म्युटंट’चा मोठा हात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण आता ट्रिपल म्युटंटबद्दल बोललं जात आहे. तो काय आहे? त्यापासून आपल्याला किती धोका आहे? कोरोनाची आणखी किती म्युटेशन्स पाहायला मिळतील?
कोरोनाचा संसर्ग शोधण्यासाठी कोरोना चाचणी करणं गरजेचं असतं. पण जर लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला तर? असं होण्याची कारणं काय असतात? रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही लक्षणं असतील तर काय करायचं?
18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस 1 मे पासून घेता येणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला अनेक राज्यांनी ही मागणी केली होती, पण तेव्हा केंद्र सरकारने अशाप्रकारच्या मागण्या चिंताजनक आहेत म्हणत खूप टीका केली होती. मग आता दोन आठवड्यांत परिस्थितीत काय बदल झाला? सरसकट प्रौढांचं लसीकरण करण्याचा निर्णय का घेतला गेला? सगळ्यांना देता येतील इतक्या लशी भारताकडे आहेत का? नसतील तर त्या मिळवण्याची योजना काय आहे? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन - सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
गुढी पाडव्यापासून राज्यात कडक निर्बंध आहेत. आठवडा उलटला तरी राज्यातल्या कोरोनाच्या केसेस वाढतानाच दिसत आहेत. अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं अनेक मंत्री म्हणत आहेत. ज्यांनी यापूर्वी लॉकडाऊनचा विरोध केला ते मंत्रीही आता त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे मतपरिवर्तन कसं झालं? कोरोनाचा प्रसार मंदावण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही का? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन - बीबीसी मराठी
भारतात कोरोनाची परिस्थिती आता इतकी बिकट झालीये की, दिवसाला 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतेय. त्यातच एक चिंतेची गोष्ट म्हणजे, मुंबईत लहान मुलांमध्ये कोव्हिड होण्याचं प्रमाण तब्बल 65%नी वाढलंय. खासकरून महानगरांमध्ये मुलांमधल्या कोव्हिडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि यात पाच वर्षांच्या आतल्या मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशावेळी लहान मुलांमध्ये कोव्हिडची दिसणारी लक्षणं नेमकी काय आहेत? त्यावर काय उपचार आहेत? आणि मुलांसाठी नेमकी काय खबरदारी घ्यायची? याचबद्दल बोलूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - अमृता दुर्वे, ऋजुता लुकतुके
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात 24 तासांत 2 लाख रुग्णांची विक्रमी नोंद झालीये. आणि महत्त्वाचं म्हणजे यातले किमान 25% रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात हॉस्पिटल बेड्स, औषधं, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवतोय. अनेक जणांना रेमडेसिविर मिळत नाहीये. अनेकांना ऑक्सिजन मिळत नाहीये तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवायलाही झगडावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊनसारखेच कडक निर्बंध लावलेत. पण महाराष्ट्रावर ही वेळ का आली? आज सोप्या गोष्टीमध्ये जाणून घेऊया राज्य सरकारकडून महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यात झालेल्या 7 संभाव्य चुका...
संशोधन - सरोज सिंह
‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कडक निर्बंध पुढच्या पंधरा दिवसांसाठी लागू केले आहेत. पण, त्यांचं भाषण संपल्या संपल्या सोशल मीडियावर आणि बीबीसीच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरही सगळ्यांचे धडधडा प्रश्न यायला लागले. कलम 144, संचारबंदी म्हणजे नेमकं काय? आम्हाला कुठल्या कामासाठी बाहेर पडता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. अशाच महत्त्वाच्या 7 प्रश्नांची उत्तर सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एक वर्ष उलटून गेलंय, संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलंय. पहिली लाट जात नाही तोच दुसऱ्या लाटेनं कहर केलाय. तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. आणि त्यामुळेच आपल्याला अधिक काळजी घ्यायला सांगितल जातंय. लस आहे पण ती आपला 100% बचाव करू शकते का? तर नाही... आणि म्हणूनच आपल्याला कोरोनासोबत आणि आपली काळजी घेत जगावं लागणार आहे. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोरोनासोबत जगण्याचे 9 फंडे…आणि ते ही स्वीत्झर्लंडमधल्या मऊ, लुसलुशीत चीजच्या तुकड्यांबरोबर...
लेखन - ऋजुता लुकतुके
एकीकडे रेमडेसिविर या औषधासाठी कोव्हिड रुग्णांचे नातेवाईक जीवाचं रान करताना दिसतायत. महाराष्ट्रभर
संशोधन - बीबीसी टीम
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,570 Listeners

1,045 Listeners

5,519 Listeners

1,807 Listeners

1,799 Listeners

1,025 Listeners

1,977 Listeners

3,223 Listeners

728 Listeners

1,006 Listeners

1 Listeners