
Sign up to save your podcasts
Or


गरीबांना कोरोनाचे उपचार ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोफत मिळणार असल्याची घोषणा सत्यात उतरली का?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरण हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे असं जगभरातल्या जाणकारांचं सांगणं आहे. सध्या भारतात लहान मुलांना लस दिली जात नाही पण जगातल्या काही देशांमध्ये हे केलं जातं. लहान मुलांना लस देण्याचे काय फायदे आहेत? त्यादृष्टीने भारतात काय हालचाली सुरू आहेत? ऐका आजची ही सोपी गोष्ट
कोव्हिड काळात काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी टूलकिटचा वापर करत असल्याचं उघड झाल्याचा दावा भाजपने केलाय. #CongressToolkitExposed असा हॅशटॅग वापरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं पण हे टूलकिट फेक असल्याचं अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं. भाजप खोटारडा पक्ष असल्याचं काँग्रेस म्हणते तर हे खोटं असल्यास खुशाल काँग्रेसने या सगळ्याची चौकशी करावी असं भाजप म्हणतो. नेमकं प्रकरण काय आहे? कोव्हिड काळात हे राजकारण का सुरू आहे? ऐका आजची सोपी गोष्ट.
कोरोनाची टेस्ट म्हटली की डोळ्यासमोर येतो स्वॉब आणि पीपीई किट घातलेले लोक. पण आता घरच्या घरीच कोरोना टेस्ट करता येणार आहे. पुण्याच्या माय लॅब या कंपनीने विकसित केलेलं घरच्या घरी टेस्ट करण्याच्या किटला ICMR ने मान्यता दिली आहे. तसंच नागपूरच्या नीरी या संस्थेने विकसित केलेल्या सलाईनच्या पाण्याची गुळणी करून सँपल घेण्याच्या तंत्रालाही मान्यता मिळाली आहे. काय आहेत या टेस्ट आणि त्यांचा कसा फायदा होईल? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.
मुस्लिमबहुल प्रदेशात इस्रायल हा ज्यूंचा देश कसा जन्माला आला?
कोरोना : DRDO 2 DG हे कोव्हिडवरील भारतीय औषध किती प्रभावी आहे?
इस्रायल आणि हमास यांच्यात गेले काही दिवस तीव्र संघर्ष सुरू आहे. अनेक लोकांचे यात जीव गेलेत, अनेक बेघर झालेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत आणि इस्रायल यांच्यातले संबंध अधिक दृढ झाल्याचं चित्र आहे. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या. पण तरीही भारताने सध्याच्या संघर्षात इस्रायलची बाजू घेतलेली नाही. उलट पॅलेस्टाईनच्या न्याय्य उद्दिष्टांना भारताचं समर्थन असल्याचं राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांना सांगतलं. मोदी सरकारच्या काळात भारताने इस्रायलची बाजू का घेतली नाही? ऐका आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर आता 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे इतकं वाढवण्यात आलं आहे. याचा अर्थ हा की, पहिल्या डोस नंतर दुसरा डोस तीन ते चार महिन्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उलट लसीची परिणामकारकता वाढते असं संशोधनातून दिसून आलंय. तुमच्यापैकी अनेकांना सध्या दुसरा डोस मिळवताना अडचणी येतायत. कारण, लशीच उपलब्ध नाहीएत. अशावेळी तर या निर्णयाने मोठाच दिलासा मिळाला असेल. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर वाढल्यामुळे काय फायदा होणार आहे…
संशोधन - ऋजुता लुकतुके
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. आणि दोन दिवसांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर हा संघर्ष युद्धाचं रुप घेतो की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानचा मूळ वाद नेमका काय आहे हे समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - बीबीसी टीम
एकीकडे अख्खं जग कोव्हिडचा सामना करत असताना मध्य-पूर्व आशियातल्या गाझा पट्टीत आणि जेरुसलेममध्ये वेगळाच संघर्ष सुरू झालाय. इस्त्राएलनं गाझा पट्टीतली १३ मजली हनाडी टॉवर ही इमारत पाडल्यानंतर हमास या कट्टरतावदी संघटनेनं इस्त्रायलच्या दिशेनं 130च्या वर रॉकेट्स डागली. आणि यात तेल अवीव हे इस्त्रायलचं महत्त्वाचं शहरही त्यांनी सोडलं नाही. या सगळ्यात आतापर्यंत तीसच्यावर नागरिकांचा जीव गेलाय. जेरुसलेम या धार्मिक स्थळावरून ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांमधला वाद पुरातन आहे. त्यातच ऐन ईदच्या सणाला कोणती नवी ठिणगी पडली, सध्या हा परिसर अशांत का आहे, समजून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,570 Listeners

1,045 Listeners

5,519 Listeners

1,807 Listeners

1,799 Listeners

1,025 Listeners

1,977 Listeners

3,223 Listeners

728 Listeners

1,006 Listeners

1 Listeners