सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : पवारांनी राष्ट्रीय आघाडीची घोषणा करणं का टाळलं?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काल राष्ट्रमंचची बैठक झाली आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं की, पवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इतर पक्षांची एकत्र आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत का? काल त्याविषयी काही घोषणा होईल असंही वाटलं होतं. पण, प्रत्यक्षात मोदी विरोधात अशा राष्ट्रीय आघाडीबद्दल काहीच बोललं गेलं नाही. अशावेळी सोपी गोष्टमध्ये बघूया शरद पवार यांनी अशी घोषणा करणं का टाळलं? सध्या नाही तरी भविष्यात अशी आघाडी उभी राहील का? तिचं नेतृत्व कोण करेल?

    संशोधन - ऋजुता लुकतुके

    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : शरद पवारांची पंतप्रधान होण्याची संधी कशी हुकली?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशातल्या विरोधी पक्षांची एकत्र मोट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल. पण, यातून शरद पवार यांची देशाचा पंतप्रधान होण्याची कित्येक वर्षांची इच्छा पुन्हा वर आली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यापूर्वीही शरद पवार यांनी 1990 च्या दशकांत काँग्रेस पार्टीत असताना दोनदा पंतप्रधान होण्याचा निकराचा प्रयत्न केला होता. जाणून घेऊया याच दोन प्रयत्नांविषयी जेव्हा शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले.

    संशोधन - ऋजुता लुकतुके
    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : राम मंदिराच्या जागा खरेदीवरून घोटाळ्याचा आरोप का होतोय?

    अयोध्येतल्या प्रस्तावित राम मंदिरासाठी जागा खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप एकदा नाही तर दोनदा झालाय. समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीने या मुद्यावरून राम जन्मभूमी न्यास ट्रस्ट आणि पर्यायाने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं म्हटलंय. ट्रस्टने गोळा केलेले बहुतेक पैसे हे जनतेच्या वर्गणीतून गोळा केलेत. त्यामुळे इथे लोकांच्या विश्वासाचा प्रश्न आहेच. शिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार हे नक्की. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया राम मंदिर जमिनीचे हे दोन वाद आणि त्याचे उमटणारे राजकीय पडसाद…

    संशोधन - बीबीसी टीम

    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे महिनाभरात येणार का?

    राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. गर्दी वाढली आणि लोकांनी आरोग्याचे नियम पाळले नाहीत तर महिन्या दोन महिन्यांतच राज्यात तिसरी लाट येऊ शकते अशा बातम्या आल्या पण यावर स्पष्टीकरण देताना कोव्हिड टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी अशी कोणतीही कालमर्यादा दिली नव्हती. वेगाने पसरणारा डेल्टा आणि नव्याने आलेला डेल्टा प्लस व्हेरियंट, तसंच इतर कारणांमुळे राज्यात पुढची लाट लवकर येईल का? त्याचा जास्त फटका कुणाला बसेल? या सगळ्याबद्दलची ही सोपी गोष्ट.

    संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोका कोला, पेप्सी सारखी पेयं आरोग्यासाठी वाईट असतात का?

    फुटबॉलर रोनाल्डोने कोकची बाटली सरकवून लोकांना पाणी प्या असं सांगितलं आणि नेहमी चर्चा होणारा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्‍ड ड्रिंक्स पिणं आरोग्यासाठी हानीकारक असतं का? कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतर प्रसन्न वाटतं, मग ती शरीरात जाऊन अपाय कसा करू शकतात? त्यांचं व्यसन लागू शकतं का? या सगळ्याची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन- टीम बीबीसी

    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : सोन्याच्या हॉलमार्किंगमुळे ग्राहकांचा काय फायदा होणार?

    भारतात सोन्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे आणि सोन्याचे दागिने, इतर कलात्मक वस्तूंसाठी या धातूचं श्रृंगारिक मूल्यही मोठं आहे. आता 16 जून पासून केंद्रसरकारने सोन्याचे दागिने आणि वस्तूंचं हॉलमार्किंग अनिवार्य केलंय. हॉलमार्कचं प्रमाणपत्र असेल तरंच या वस्तू सोनार विकू शकेल. शिवाय सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकणार आहेत. घाबरू नका, हॉलमार्किंग ग्राहकांच्या भल्यासाठीच आहे. पण, त्याचा नेमका फायदा काय? आता तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवर हॉलमार्कचा शिक्का नसेल तर काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - ऋजुता लुकतुके

    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : गौतम अडाणी - डीलमेकर आणि तितकेच वादग्रस्त उद्योगपती

    14 जून रोजी अडाणी एंटरप्राईजेस् कंपन्यांचे शेअर कोसळल्यामुळे गौतम अडाणी यांची नरेंद्र मोदींशी मैत्री, मागच्या दहा वर्षांत त्यांच्या कंपन्यांची झालेली भरभराट हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया देशातले दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्याविषयी आणि त्यांच्याभोवतीच्या वादांविषयी, आजच्या सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - ऋजुता लुकतुके

    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - शरद बढे

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : इस्त्रायलमध्ये नेफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान

    इस्त्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांची बारा वर्षांची राजवट उलथून आठ पक्षांचं आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. रविवारी तिथल्या संसदेत झालेल्या बहुमत चाचणीत नेतन्याहू यांच्या पक्षाचा एका मताने निसटता पराभव झाला. आता आठ पक्षांची एकत्र मोट बांधण्याचं अवघड काम नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांना करायचं आहे. पण नेतन्याहू यांच्या पराभवासाठी हे आठ परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष कसे एकत्र आले? आणि या सत्ता बदलामुळे भारत आणि इस्त्रायल यांच्या मैत्रीवर काही परिणाम होईल का, जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - ऋजुता लुकतुके

    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - शरद बढे

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : शालेय विद्यार्थ्यांनी करायचा हा ब्रिज कोर्स कुठला?

    महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाचं नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल. यंदाही सुरुवात ऑनलाईनच होणार आहे. आणि यावेळी मुलांना पहिले पंधरा दिवस एक खास ‘ब्रिज कोर्स’ पूर्ण करायचा आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत मुलांना मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम किती समजला आहे हे शिक्षकांना कळावं आणि मुलांचीही काही संकल्पनांची उजळणी व्हावी यासाठी हा पाठ्यक्रम SCERT मंडळाने ठरवला आहे. हा ब्रिज कोर्स कुणाला करायचा आहे, तो अनिवार्य आहे का, कधी करायचा याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - दीपाली जगताप

    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : ‘होल्डिंग पाँड्स’ मुंबईला पूरापासून वाचवू शकतील का?

    मुंबई शहरात पावसाळ्यात निर्माण होणारा पूराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं टोकयोच्या धर्तीवर जमिनीखाली पाणी वाहून नेणारे बोगदे खणण्याचं ठरवलं आहे. या भूमिगत तळ्यांना होल्डिंग पाँड्स म्हणतात. आणि असा पहिला प्रकल्प येत्या दहा दिवसांत मुंबईच्या हिंदमाता परिसरात कार्यान्वितही होणार आहे. सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया होल्डिंग पाँड्स प्रकल्पाविषयी आणि या प्रकल्पामुळे तरी मुंबईची पूरस्थिती आटोक्यात येईल का याविषयी...

    संशोधन - मयांक भागवत, ऋजुता लुकतुके

    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,570 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,045 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,519 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,807 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,799 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,977 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

728 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners