
Sign up to save your podcasts
Or


देशात हुंडाविरोधी कायदा 1961पासून अस्तित्वात असूनही 95% लग्नांमध्ये अजूनही हुंडा स्वीकारला जातो आणि दिला जातो. हा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेनं दिला आहे. त्यासाठी बँकेच्या एका गटाने 27 राज्यांमधली 40,000च्या वर लग्नांमध्ये झालेल्या खर्चाचा अभ्यास केला आहे. काही ठिकाणी थेट हुंडा न देता त्याचं स्वरुप बदललंय. त्यामुळे आज पुन्हा वेळ आलीय हुंडा या दुष्ट आणि महिलांसाठी अन्यायकारक सामाजिक प्रथेबद्दल बोलण्याची. हुंड्याची प्रथा आणि तिचे सामाजिक दुष्परिणाम याविषयी बोलूया सोपी गोष्टमध्ये….
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
कोरोना परिस्थितीमुळे थांबलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी होणार अशी चर्चा सर्वत्र आहे. आणि यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हीना गावित यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, नरेंद्र मोदी आताच का मंत्रिमंडळ विस्तार करत आहेत? यामागे राजकीय समीकरणं आहेत की प्रशासकीय सोय? पाहूया आजची सोपी गोष्टमध्ये...
कोरोनाच्या काळात MPSC स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसलाय. 2019पासून ही परीक्षा नियमित होत नाहीए, झाली तर नियुक्ती होत नाहीए आणि मुख्य स्पर्धा झाली तर मुलाखती होत नाहीएत. त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुण मुलांचा मात्र कोंडमारा होतोय. पण, MPSC परिक्षांच्या गोंधळाला नेमका जबाबदार कोण, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - ऋजुता लुकतुके
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे.
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये...
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये...
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
मुंबईत एप्रिल-जून महिन्यात झालेल्या एक सीरो सर्व्हेत 18 वर्षांखालील 51% मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज् तयार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आधीच्या महिन्यात हे प्रमाण 39% होतं. याचा अर्थ एकतर या मुलांना आधी कोरोना संसर्ग होऊन गेला आहे. किंवा ते कोरोना संसर्गग्रस्तांच्या संपर्कात आले आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा सगळ्यात जास्त धोका आहे असं बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल चांगलाच म्हणायला हवा. पण, त्याचं वैद्यकीय दृष्ट्या विश्लेषण आणि विश्वसनीयता समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये….
संशोधन - ऋजुता लुकतुके
ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाला विरोध आणि समर्थन का केलं जात आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मिरी नेत्यांबरोबर 24 जून या दिवशी दिल्लीत बैठक घेतली. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यापूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे, पण प्रादेशिक पक्षांना हे मान्य नाही. काश्मिरी पक्ष 370 च्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहेत, केंद्राच्या लेखी तो विषय संपला आहे. जर गेल्या दोन वर्षांत कुणाच्यात भूमिकेत बदल झाला नसेल तर ही बैठक घेतल्याने काय साध्य झालं? यामागे अजून काय गणितं आहेत? ऐकू आजच्या सोपी गोष्टमध्ये.
महाबळेश्वरच्या एका गुहेत काही वटवाघुळांमध्ये निपाह व्हायरस सापडला. या व्हायरसचा यापूर्वी चार वेळा भारतात उद्रेक होऊन गेला आहे. केरळमध्ये 2018 साली या व्हायरसमुळे 18 लोकांचा मृत्यू झाला होता. निपाहवर अजूनही कोणतीही लस नाही किंवा ठोस उपचारपद्धतीही नाही. वटवाघुळांमधून निपाहचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता किती असते? या व्हायरसपासून सुरक्षित कसं राहायचं? या सगळ्याची उत्तरं देणारी आजची ही सोपी गोष्ट.
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,570 Listeners

1,045 Listeners

5,519 Listeners

1,807 Listeners

1,799 Listeners

1,025 Listeners

1,977 Listeners

3,223 Listeners

728 Listeners

1,006 Listeners

1 Listeners