सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा नेमका घोळ काय आहे?

    अपक्ष खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नवनीत यांनी सादर केलेलं जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे. यावर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचं हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पण, जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे का, त्यांच्या जात प्रमाणपत्राचा नेमका घोळ काय आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - बीबीसी मराठी टीम
    लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: लैंगिक ओळख जपण्यासाठीचा समलैंगिकांचा लढा

    2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 रद्द केलं. त्यामुळे समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देशात मिळाली. पण, तरीही समलैंगिक लोकांचा लढा अर्धवट होता. कारण, कित्येक घरांमध्ये मुलगा किंवा मुलगी समलैंगिक आहे समजल्यावर ही लैंगिकता स्वीकारली जात नाही. आणि समलैंगिक भावना दडपण्यासाठी कन्व्हर्जन थेरपीचा सल्ला दिला जातो. आता मद्रास हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण खटल्यात अशी थेरपीही कायदेबाह्य केली आहे. समलैंगिकांना सामाजिक समानता बहाल करण्याबरोबरच अशी थेरपी देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याबद्दल कोर्टाने सविस्तर निकाल दिला आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया समलैंगिक मुलगा आणि मुलीसाठी मनस्ताप देणाऱ्या या कन्व्हर्जन थेरपीबद्दल आणि त्याविषयीच्या कायद्यांबद्दल, सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - जान्हवी मुळ्ये, ऋजुता लुकतुके
    लेखन,निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्कम टॅक्स रिटर्न भरणं झालं अधिक सोपं

    यंदा तुम्ही विवरणपत्र ऑनलाईन भराल तेव्हा तुमचा तो अनुभव वेगळा असू शकतो. कारण, सर्वसामान्य नागरिकांना विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं आणि त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी व्हावी यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करवसुली मंडळाने आपल्या वेबसाईटमध्ये (www.incometax.gov.in) काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आणि ही नवी वेबसाईट आजपासून जनतेसाठी खुली झाली आहे. जाणून घेऊया या नवीन वेबसाईटविषयी आणि त्यातील बदलांविषयी, सोपी गोष्टमध्ये...

    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: जुही चावला 5G नेटवर्कवरून का भडकली आहे?

    बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या नेटवर्कमुळे पर्यावरणाची हानी होते. म्हणून ते प्राणी आणि माणसासाठीही सुरक्षित असल्याची ग्वाही कोर्ट देऊ शकतं का, असा सवाल त्यांनी विचारला आहे? त्यानिमित्ताने 5G तंत्रज्ञान, त्याचे फायदे आणि पर्यावरणाची होणारी हानी हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बघूया खरंच 5G अपायकारक आहे का?

    संशोधन- ऋजुता लुकतुके

    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात आत्मनिर्भर भारत योजनेचा लोकांना फायदा झाला की नाही?

    कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा गेल्यावर्षीच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला. आणि याच नावा अंतर्गत कामगार वर्ग आणि लघु, मध्यम उद्योजकांसाठी 20,00,000 कोटींचं एक पॅकेजही त्यांनी जाहीर केलं. आता एक वर्षं उलटलं. या वर्षभरात केंद्रीय आकडेवारी असं सांगते की, देशाचा जीडीपी विकास दर 7.3% नी कमी झाला आहे. मग आत्मनिर्भर भारत योजनेवर खर्च झालेले 20 लाख कोटी रुपये नेमके गेले कुठे? कोरोना काळात सरकारकडून लोकांना नेमकी किती आणि कशी मदत मिळाली? की मिळालीच नाही? पाहूया सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन- सरोज सिंह

    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: जीडीपीच्या परिक्षेत नरेंद्र मोदी पास की, नापास?

    30 मे ला नरेंद्र मोदी सरकारने 7 वर्षांचा कालावधी पूर्ण केला. तर 31 मे ला देशाची वर्षभरातली आर्थिक कामगिरी सांगणारा जीडीपी विकास दर जाहीर झाला. देशाचं हे आर्थिक रिपोर्ट कार्ड असं सांगतंय की, आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर उणे किंवा वजा 7.3% होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था इतक्या टक्क्यांनी घसरली किंवा आकुंचन पावली. पण मग याचा अर्थ काय? याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होणार आहे? आपली कामगिरी इतर देशांच्या तुलनेत कशी होती? हे समजून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन- ऋजुता लुकतुके

    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: मेहुल चोकसी यांची हिरे व्यापारी ते फरार गुन्हेगार होण्यापर्यंतची गोष्ट

    पंजाब नॅशनल बँकेत बनावट कागदपत्रं सादर करून तब्बल 13,600 कोटी रुपयांची कर्ज उचलणारा मेहुल चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. अँटिग्वा देशाने त्यांना नागरिकत्वही दिलं. त्यानंतर दोन वर्षांनी आता त्यांना जवळच्या डॉमनिका बेटांवर अटक झाली आहे.

    भारताने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्याचा आधार घेऊन त्यांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण, या हालचालींनी यश येईल का? मूळात मेहुल चोकसी यांचा प्रथितयश व्यापारी, पीएनबी घोटाळा ते देशातून फरार होणं हा सगळा प्रवास समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन- ऋजुता लुकतुके

    लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड-19 संसर्ग झाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका आहे का?

    आजारातून बरं झाल्यानंतरही अनेकदा त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ सहन करावे लागतात. तशीच काहीशी गत कोव्हिडची. कोव्हिड-19 मुळे नव्याने होणाऱ्या मधुमेहावर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे.

    डायबेटोलॉजिस्ट सांगतात की कोव्हिडमुळे नव्याने मधुमेह होण्याचं प्रमाण 10 टक्के आहे. यामागे काय कारणं आहेत? हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

    संशोधन- मयांक भागवत
    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून पसरला का याचा बायडन सरकार का करतंय तपास?

    कोरोना व्हायरसचा उगम नेमका कसा झाला? तो चीनच्या लॅबमध्ये जन्माला आला होता या दाव्याला आजवर धुडकावलं गेलं. पण आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुप्तचर यंत्रणांना या दाव्याचीही सखोल शहानिशा करण्याचे आदेश दिलेत. अनेक तज्ज्ञांनीही हा व्हायरस प्रयोगशाळेत जन्मलेला असण्याची शक्यता पूर्णतः फेटाळता येणार नाही असं म्हटलंय. नेमकं सत्य काय आहे? ऐका आजची सोपी गोष्ट.

    संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारताला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परत येण्याची चिंता का आहे?

    अमेरिकन सैन्य 20 वर्षं अफगाणिस्तानात राहूनही तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित इतर कट्टरतावादी गटांचं कंबरडं मोडू शकलं नाही. तिथली लोकशाही प्रक्रिया अजूनही पूर्णपणे स्थिरावू शकलेली नाही. त्यामुळेच अमेरिका बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे. लोकशाही सरकार जाऊन तालिबान सत्तेत आलं तर भारतासाठी चिंतेचं कारण ठरेल का?

    संशोधन- टीम बीबीसी
    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,570 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,045 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,519 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,807 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,799 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,977 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

728 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners