सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना रुग्णांना स्टिरॉईडचा फायदा होतो की तोटा?

    डेक्झामेथेझॉन आणि इतरही काही स्टिरॉईड्स सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारी औषधं म्हणून गौरवली गेली. पण, दुसऱ्या लाटेत स्टिरॉईड्सच्या अतीवापराचे परिणामही बघायला मिळत आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीच्या दिवसांत स्टिरॉईडचा वापर झाल्यामुळे उलट संसर्ग वाढल्याचीही काही उदाहरणं आहेत. म्हणूनच आज कोरोना रुग्णांसाठी स्टिरॉईडचा वापर कसा आणि कुठे करायचा जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - मयांक भागवत

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनानंतर कान, डोळ्यांना येणारी काळी बुरशी

    कोव्हिड19च्या आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांना नंतर काळी बुरशी किंवा म्युकोर मायकोसिसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. आणि त्यामुळे नाक, कान, डोळा किंवा अगदी मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचून अर्धांग वायूचा झटका किंवा डोळे काढण्यापर्यंत वेळ आली आहे. काळी बुरशीचा संसर्ग असलेल्या या आजाराला शास्त्रीय नाव आहे म्युकोर मायकोसिस. या आजाराविषयी आज सविस्तर जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - बीबीसी टीम

    वार्तांकन सहाय्य - निलेश पाटील
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? सरकार काय सांगतं? | सोपी गोष्ट 333

    मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? असा सवाल विचारला जातोय.

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लशीचा डोस मिळायला उशीर झाला तर काय होईल?

    कोरोना लसीचा एक डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दोन आठवड्यात कोरोनापासून

    संरक्षण मिळतं आणि मधल्या वेळेत या व्यक्तीला कोरोना झालाच तरी इतरांना संसर्ग होण्याचा धोका 49%नी कमी होतो, असं युकेमधील एक संशोधन सांगतं. भारतात सध्या लशीच्या तुटवड्यामुळे काहींना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. अशावेळी दुसरा डोस मिळायला उशीर झाला, दुसरा डोस
    मिळालाच नाही तर काय होईल या प्रश्नांची उत्तरं बघूया सोपी गोष्टमध्ये

    संशोधन - मयांक भागवत, बीबीसी आरोग्य टीम

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस 18+ साठी कोविनवर नोंदणी झाली, पण लस कधी मिळणार? सोपी गोष्ट 327

    18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार असं सरकारने जाहीर केलं. त्यासाठी नोंदणीही सुरू झाली. पण लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळत नाही अशीच परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळतेय. असं का होतं आहे? 18 वर्षांच्या वरच्या लोकांना देण्यासाठी राज्यांकडे पुरेशा लशी आहेत का? महाराष्ट्राने याबद्दल काय निर्णय केलाय? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन- बीबीसी मराठी

    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    4 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना ऑक्सिजन व्हेंटिलेटर PM केअर्स फंडमधून किती आले? किती चालले? सोपी गोष्ट 326

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडतेय. कोव्हिडच्या संकटाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या PM केअर्स फंडमधून किती व्हेंटिलेटर घेतले गेले? त्यातले किती प्रत्यक्षात हाती आले आणि किती कार्यान्वित झाले? बीबीसीने सरकारी कागदपत्रं आणि माहिती अधिकारा वापर करून या प्रश्नांचा पाठपुरावा केला. ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन- कीर्ती दुबे, टीम बीबीसी
    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: प्रोनिंगमुळे कोरोना रुग्णांचा जीव वाचतो का?

    प्रोनिंग' म्हणजे पोटावर पालथं झोपणं. श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्या कोव्हिड रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकतं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आणि या पद्धतीला वैद्यकीय मान्यताही दिली आहे. रुग्णामधील ऑक्सिजन पातळी कमी झाली किंवा श्वास घ्यायला त्रास होत असले तर घरच्या घरी प्रोनिंग करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. तेव्हा शास्त्रीय प्रोनिंग कसं करायचं आणि त्याचे फायदे जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये....

    संशोधन - बीबीसी मराठी टीम

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी आणि किती येईल?

    महाराष्ट्रात आणि देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. आताच रुग्णांना ऑक्सिजन

    आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या अहवालानुसार, अजून देशात दुसऱ्या लाटेचा परमोच्च बिंदू म्हणजे पीक आलेलाच नाही. तो मे महिन्याच्या मध्यावर येणार आहे. आणि तोपर्यंत दर दिवसाला रुग्णसंख्या 5 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेली असेल, असा
    अंदाज आहे. अशावेळी आपण नेमकं काय करायचं कोरोनाची ही लाट नक्की कधी ओसरेल जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - ऋजुता लुकतुके

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,570 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,045 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,519 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,807 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,799 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,977 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

728 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners